Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७०)
महापुराण
(३४-१३८
समवायाख्यमङ्गं ते समधीत्य सुमेधसः । द्रव्यादिविषयं सम्यक्समवायमयुत्सत ॥ १३८ स्वभ्यस्तात्पञ्चमादङ्गाद्वयाख्याप्रज्ञप्तिसंज्ञितात् । साध्ववादीधरन्धीराः प्रश्नार्थान् विविधानमी॥ ज्ञात्वा धर्मकयां सम्यग्बुद्धवा बोद्धनबोधयन् । धां कथामसंमोहात्ते यथोक्तां महर्षिणा ॥ १४० तेऽधीत्योपासकाध्यायमङ्ग सप्तममूजितम् । निखिलं श्रावकाचारं श्रोतृभ्यः समुपादिशन ॥ १४१ तथान्तकृद्दशादङ्गानमुनीनन्तकृतो दश । तीर्थम्प्रति विदामासुः सोढासह्योपसर्गकान् ॥ १४२ अनुत्तरविमानौपपादिकान्दश तादृशान् । शमिनो नवमादङ्गाद्विदाञ्चक्रुविदांवराः ॥ १४३ प्रश्नव्याकरणात्प्रश्नमुपादाय शरीरिणाम् । सुखदुःखादिसम्प्राप्ति व्याचक्रुस्ते समाहिताः ॥ १४४ विपाकसूत्रनितिसदसत्कर्मपडाक्तयः । बद्धकक्षास्तदुच्छित्तौ तपश्चक्रुरतन्द्रिताः ॥ १४५ दृष्टिवादेन नितिदृष्टिभेदा जिनागमे । ते तेनुः परमां भक्ति परं संवेगमाश्रिताः ॥ १४६
उत्तम बुद्धीच्या ज्ञानी मुनीनी समवायांगाचे अध्ययन करून द्रव्यसमवाय, क्षेत्रसमवाय, कालसमवाय व भावसमवाय यांचे स्वरूप उत्तम जाणून घेतले ।। १३८ ।।
व्याख्याप्रज्ञप्ति नामक पाचव्या अंगाचा त्यानी चांगला अभ्यास केला व त्यात केलेल्या प्रश्नाना व त्यांच्या उत्तराना त्यांनी मनाने चांगले धारण केले ॥ १३९ ।।
धर्मकथा नावाचे सहावे अंग जाणून व त्याचा चांगला निश्चय करून श्रीजिनेश्वरानी जशी धर्मकथा सांगितली तशी असंमोहाने न चुकता न जाणणाऱ्या लोकाना त्यानी सांगितली ॥ १४० ॥
उपासकाध्ययन नावाचे उत्कृष्ट सातवे अंग ज्यात श्रावकाच्या आचारांचे वर्णन आहे ते सर्व श्रोत्याना त्यानी सांगितले ।। १४१ ॥
अन्तकृत्दशनामक अंगापासून त्यानी प्रत्येक तीर्थंकराच्या तीर्थात ज्यानी भयंकर उपसर्ग सहन करून मोक्ष प्राप्ति करून घेतली त्यांची चरित्रे वणिली आहेत त्यांचे स्वरूप त्यानी जाणून घेतले ।। १४२ ।।
___ अनुत्तरोपपादिकदश या नवव्या अंगात प्रत्येक तीर्थात दहा दहा यतीनी दारुण उपसर्ग सहन करून पंचानुत्तरात जन्म धारण केला. त्यांची चरित्रे या मुनिवर्यानी जाणिली।। १४३ ।।
प्रश्नव्याकरण नामक दहाव्या अंगात प्रश्न ग्रहण करून प्राण्याना सुखदुःखादिकांची कशी प्राप्ति होते याचे विवेचन ते मुनिवर्य एकाग्रतेने वर्णन करीत असत ।। १४४ ।।
विपाकसूत्रनामक अंगापासून शुभ व अशुभ कर्मांच्या समूहाचे स्वरूप त्यानी जाणून घेतले व त्या कर्मांचा नाश करण्यासाठी त्यानी कंबर बांधून निरलस होऊन तप केले ॥ १४५ ॥
दृष्टिवाद नावाच्या अंगाने त्यानी जिनागमात मिथ्यामताचे जे भेद सांगितले आहेत ते त्यानी उत्तम रीतीने जाणले व उत्कृष्ट वैराग्याचा आश्रय करून जिनागमात त्यानी उत्कृष्ट भक्ति ठेवली ।। १४६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org