Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६८)
महापुराण
(३४-१२२
तबलं स्पर्द्धया दध्वं यूयं धर्ममहातरोः । दयाकुसममम्लानि यत्तन्मुक्तिफलप्रदम् ॥ १२२ पराराधनदेन्योनं परैराराध्यमेव यत् । तद्वो महाभिमानानां तपोमानाभिरक्षणम् ॥ १२३ दीक्षा रक्षा, गुणा भृत्या दयेयं प्राणवल्लभा। इति ज्यायस्तपो राज्यमिदं श्लाघ्यपरिच्छदम् ॥१२४ इत्याकर्ण्य विभोर्वाक्यं परं निर्वेदमागताः । माहाप्रावाज्यमास्थाय निष्क्रान्तास्ते गृहाद्वनम् ॥ १२५ निर्दिष्टां गुरुणा साक्षादीक्षां नववधूमिव । नवा इव वराः प्राप्य रेजुस्ते युवपार्थिवाः ॥ १२६ या कचग्रहपूर्वेण प्रणयेनातिभूमिगा। तस्याः पाणिद्वयों प्राप्य सुखमन्तरुपागताः ॥ १२७ तपस्तीव्रमथासाद्य ते चकासुर्नपर्षयः । स्वतेजोरुद्ध विश्वाशा ग्रीष्ममशिवो यथा ॥ १२८ तेऽतितीव्रस्तपोयोगैस्तनुभूतां तनुं दधुः। तपोलक्ष्म्या समुत्कीर्णामिव दीक्षां तपोगुणः ॥ १२९
म्हणून आता ही स्पर्धा सोडून द्या व तुम्ही धर्मरूपी महावृक्षाचे कधीही न कोमेजणारे असे दयारूपी पुष्प धारण करा. हे पुष्प तुम्हाला मोक्षरूपी फलाला देणारे आहे ।। १२२ ।।
दुसऱ्याची सेवा करण्यात जो दीनपणा येतो तो या तपात नसतो, पण अन्यलोकाना हे तप सेवा करावयास लावते. म्हणून महाअभिमानी असलेल्या तुमच्या मनाचे रक्षण करणारे हे तप आहे असे समजा ।। १२३ ॥
हे तपोराज्य फार मोठे आहे. यात दीक्षा ही तपोराज्याचे रक्षण करणारी आहे. या दीक्षेचे महाव्रतादिक गुण हे सेवक आहेत व प्राणिमात्रावर दया ही प्राणप्रिय पत्नी आहे. याप्रमाणे या तपोराज्याचा प्रशंसनीय परिवार आहे. म्हणून भौतिक राज्यापेक्षा हे फारच मोठे आहे ॥ १२४ ॥
याप्रमाणे आदिभगवंताचे वाक्य ऐकून ते सर्व कुमार अतिशय विरक्त झाले. त्यानी घराचा त्याग केला व सर्व परिग्रहाचा त्याग जीत आहे अशी महामुनिदीक्षा धारण करून ते वनात गेले ॥ १२५ ॥
जणु प्रत्यक्ष पित्याने दाखविलेली नवीन नवरी अशा दीक्षेला धारण करून ते तरुण राजे नूतन नवरदेव आहेत की काय असे शोभू लागले ॥ १२६ ॥
या कुमारांची दीक्षा एखाद्या राजकन्येसारखी वाटत होती. जसे राजकन्या केस धरून मोठ्या प्रेमाने जवळ येते तशी ही दीक्षा देखिल कचग्रह- अर्थात् केशलोचपूर्वक त्यांच्याजवळ आली. याप्रमाणे राजकन्येप्रमाणे शोभणाऱ्या त्या दीक्षेचे दोन हात आपल्या हातात धारण करून आपल्या हृदयात ते अतिशय सुखी झाले ॥ १२७ ॥
यानंतर तीव्र तप त्या कुमारानी धारण केले. ग्रीष्मऋतूत आपल्या तेजाने सर्व दिशा ज्यानी व्यापल्या आहेत असे सूर्याचे किरण जसे शोभतात तसे ते तीव्र तप धारण करून सर्व राजर्षि शोभू लागले ॥ १२८ ॥
___ अतिशय तीव्र अशा तपश्चरणानी ते कुमार अतिशय कृश शरीराचे झाले. जणु तपश्चरणाच्या प्रशम, वैराग्य आदि गुणांनी तपोलक्ष्मीने त्याना कोरून ठेवले की काय अशी दीक्षा त्यानी धारण केली ॥ १२९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org