________________
३४-१२१)
महापुराण
(२६७
महामाना वपुष्मन्तो वयःसत्त्वगुणान्विताः । कथमन्यस्य संवाह्या यूयं भद्रा द्विपा इव ॥ ११४. भगिना किम राज्येन जीवितेन चलेन किम् । किञ्च भो यौवनोन्मादैरैश्वर्यबलदूषितः ॥ ११५ कि बलैर्बलिनां गम्यैः किं हार्यैर्वस्तुवाहनः । तृष्णाग्निबोधनैरेभिः किं धनरिन्धनैरिव ॥ ११६ भुक्त्वापि सुचिरं कालं यैर्न तृप्तिः क्लमः परम् । विषयस्तैरलं मुक्तविषमिश्ररिवाशनैः ॥ ११७ किञ्च भो विषयास्वादः कोऽप्यनास्वादितोऽस्ति वः । स एव पुनरास्वादः किं तेनास्त्याशितंभवः ॥ यत्र शस्त्राणि मित्राणि शत्रवः पुत्रबान्धवाः । कलत्रं सर्वभोगीणा धरा राज्यं धिगीदृशम् ॥ ११९ भुनक्तु नृपशार्दूलो भरतो भरतावनिम् । यावत्पुण्योदयस्तावत्तत्रालं वोऽतितिक्षया ॥ १२० तेनापि त्याज्यमेवेदं राज्यं भडगि यदा तदा । हेतोरशाश्वतस्यास्य युध्यध्वे बत किं मुधा ॥ १२१
महाअभिमानी, उत्तम शरीरधारक, तारुण्य, सामर्थ्य, धैर्य वगैरे गुणानी युक्त असे तुम्ही भद्रजातीचे उत्तम हत्ती जसे कोणाचे ओझे वाहणारे नसतात तसे तुम्ही इतराचे सेवक कसे व्हाल ? ॥ ११४ ।।
हे पुत्रानो, त्या नाशवंत राज्याचा काय उपयोग आहे ? व हे जीवित ही चंचल आहे व हा तारुण्याचा उन्माद, ऐश्वर्य व शरीरसामर्थ्य यानी दूषित झाले आहे ॥ ११५ ॥
जी बलवन्ताच्याद्वारे जिंकली जातात अशा सैन्याशी काय प्रयोजन आहे ? जें चोरले जातात असे धन, हत्ती, घोडे आदि पदार्थानी काय प्रयोजन सिद्ध होईल. जसे लाकडे अग्नीला वाढवितात तसे ही धने तृष्णारूपी अग्नीला वाढविणारी आहेत म्हणून यांचा काही आत्मकल्याणासाठी उपयोग नाही ॥ ११६ ।।
दीर्घकालपर्यन्त भोगूनही ज्याने आत्म्याला तृप्ति तर होत नाहीच पण उलट खेद परिश्रम मात्र उत्पन्न होतो असे ते भोगपदार्थ विषमिश्रित अन्नाप्रमाणे भोगले असता अधिक दुःखालाच कारण होतात. म्हणून त्याना भोगणे आता पुरे करा. ते भोगपदार्थ सर्व
॥ ११७॥ __ हे वत्सानो, तुम्ही ज्याचा आस्वाद घेतला नाही असा कोणता विषय उरला आहे काय ? तेच तेच पुनः भोगाचे आस्वाद तुम्हाला कशी तृप्ति उत्पन्न करतील बरे ? ॥ ११८ ।।
ज्याला शस्त्रे हेच मित्र आहेत, पुत्र आणि बांधव हे शत्रु आहेत व जिचा सर्वजण उपभोग घेतात अशी पृथ्वी ही पत्नी आहे अशा ह्या राज्याला धिक्कार असो ॥ ११९ ॥
हे कुमारानो, तो नृपश्रेष्ठ भरतराजा या भारतखंडाचे जोपर्यन्त त्याचा पुण्योदय आहे तोपर्यन्त रक्षण करो, उपभोग घेवो. तुम्ही मात्र त्याच्याविषयी मनात कोप धरू नका ।। १२० ॥
तो भरत देखिल हे नश्वर राज्य केव्हा तरी त्यागणारच आहे. म्हणून या नाशवंत राज्यासाठी व्यर्थ का बरे लढता? ही खेदाची गोष्ट आहे ॥ १२१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org