Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-१०४)
महापुराण
दूतसात्कृत सन्मानाः प्रभुसात्कृतवीचिकाः । गुरुसात्कृत्य तत्कार्यं प्रापुस्ते गुरुसन्निधिम् ॥ ९७ गत्वा च गुरुमद्राक्षुसितोचितपरिच्छदाः । महागिरिमिवोत्तृङ्ग कैलासशिखरालयम् ॥ ९८ प्रणिपत्य विधानेन प्रपूज्य च यथाविधि । व्यजिज्ञपन्निदं वाक्यं कुमारा मारविद्विषम् ॥ ९९ त्वत्तः स्मो लब्धजन्मानस्त्वत्तः प्राप्ताः परां श्रियम् । त्वत्प्रसादैषिणो देव त्वत्तो नान्यमुपास्महे ॥१०० गुरुप्रसाद इत्युच्चर्जनो वक्त्येव केवलम् । वयं तु तद्रसाभिज्ञास्त्वत्प्रसादाजितश्रियः ॥ १०१ त्वत्प्रणामानुरक्तानां त्वत्प्रसादाभिकाङक्षिणाम्। त्वद्वचः किङ्कराणां नो यद्वा तद्वास्तु नापरम् ॥१०२ इति स्थिते प्रणामार्थं भरतोऽस्माञ्जुहूषति । तन्नात्र कारणं विद्मः किं मदः किं नु मत्सरः ॥ १०३ युष्मत्प्रणमनाभ्यासरसदुर्ललितं शिरः । नान्यप्रणमने देव धृति बध्नाति जातु नः ॥ १०४
(२६५
ज्यानी दूतांचा योग्य सन्मान केला आहे व भरतराजाला योग्य उत्तर दिले आहे व भरताने केलेले कार्य ज्यांनी प्रभूला कळविले आहे असे ते भरताचे धाकटे भाऊ प्रभुभगवंतासंनिध गेले ॥ ९७ ॥
अल्प व योग्य सामग्री ज्यांच्याजवळ आहे अशा त्या भरतानुजांनी गुरूना - आदि जिनेश्वराना पाहिले. आदिभगवान् महापर्वताप्रमाणे उन्नत होते व कैलासाच्या शिखरावर ते विराजमान झाले होते ।। ९८ ।।
त्या कुमारानी भगवंताला योग्यविधीने वंदन केले व त्यांचे पूजन करून मदनाचा नाश ज्यानी केला आहे अशा त्याना याप्रमाणे बोलले ।। ९९ ॥
हे प्रभो, आम्ही तुमच्यापासून जन्मलो आहोत व आपणापासून आम्हाला उत्कृष्ट लक्ष्मी प्राप्त झाली आहे व हे प्रभो, तुमच्याच प्रसादाची आम्हाला नेहमी इच्छा आहे व आम्ही आपणाशिवाय इतराची उपासना करणार नाही ॥ १०० ॥
आमच्यावर गुरु फार प्रसन्न झाले असे फक्त लोक बोलतात. परंतु आम्ही परमगुरु अशा आपल्या प्रसादाचा रस चाखत आहोत. त्याचा अनुभव आम्ही जाणत आहोत व हे प्रभो आपल्या प्रसादाने आम्हाला लक्ष्मीची प्राप्ति झाली आहे ।। १०१ ॥
हे प्रभो, आम्ही आपणास वंदन करण्यात अनुरक्त झालेले आहोत. आपल्या प्रसादाची आम्हाला नेहमीच इच्छा आहे व आपल्या आज्ञेचे आम्ही किंकर -नोकर आहोत. आम्हाला जे मिळाले आहे ते असो. आम्हाला इतराची कांहीही अपेक्षा नाही ॥ १०२ ॥
असे असताही आम्ही भरताला नमस्कार करावा म्हणून तो आम्हाला बोलावीत आहे. पण त्याचे कारण आम्हाला समजत नाही. त्याच्या बोलावण्याचे कारण त्याला आलेला गर्व है आहे किंवा मत्सर कारण आहे हे आम्हाला समजत नाही ॥ १०३ ॥
हे प्रभो, आपणास नमस्कार करण्याच्या अभ्यासाचा जो आनंदरस त्यात तत्पर झालेले आमचे मस्तक ते दुसऱ्याला नमस्कार करण्यात केव्हाही व कधीही संतोष धारण करणार नाही ।। १०४ ।।
म. ३४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org