Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-८८)
अद्यैव च प्रहेतव्याः समं लेखर्वचोहराः । गत्वा ब्रूयुश्च तानेत चक्रिणं भजताग्रजम् ॥ ८० कल्पानोकहसेवेव तत्सेवाभीष्टदायिनी । गुरुकल्पोऽग्रजश्चक्री स मान्यः सर्वथापि वः ॥ ८१ विदूरस्थैर्न युष्माभिरैश्वयं तस्य राजते । तारागणैरनासन्नैरिव बिम्बं निशापतेः ॥ ८२ साम्राज्यं नास्य तोषाय यद्भवद्भिर्विना भवेत् । सहभोग्यं हि बन्धूनामधिराज्यं सता मुदे ॥ ८३ इदं वाचिकमन्यत्तु लेखार्थादवधार्यताम् । इति सोपायनेर्लेखैः प्रत्यय्यास्ते मनस्विनः ॥ ८४ यशस्यमिदमेवार्य कार्यं श्रेयस्यमेव च । चिन्त्यमुत्तरकार्यं च साम्ना तेष्ववशेषु वं ॥ ८५ बिभ्यता जननिर्वादादनुष्ठेयमिदं त्वया । स्थायुकं हि यशो लोके गत्वर्यो ननु सम्पदः ॥ ८६ इति तद्वचनाच्चकी वृत्तिमारभटीं जहाँ । अनुवर्तनसाध्या हि महतां चित्तवृत्तयः ॥ ८७ आस्तां बाहुबली तावद्यत्नसाध्यो महाबलः । शेषैरेव परीक्षिष्ये भ्रातृभिस्तद्विजिह्मताम् ॥ ८८
महापुराण
व आजच पत्रासह दूताना पाठवा व ते जातील आणि आपला वडील भाऊ जो चक्रवर्ती आहे त्याच्याकडे जा आणि त्याची सेवा करा असे बोलतील ॥ ८० ॥
( २६३
तुमच्या वडील भावाची तुम्ही सेवा केली तर ती कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित फल देणारी आहे. हा तुमचा वडील भाऊ चक्रवर्ती आहे व तो तुम्हाला पित्याप्रमाणे आहे व त्याचा तुम्ही सर्व प्रकारे आदर केला पाहिजे ।। ८१ ॥
तुम्ही त्यांचे बंधु आहात. तुम्ही दूर राहिल्यास त्याच्या ऐश्वर्याला शोभा येणार नाही. तारांचा समुदाय दूर राहील तर चन्द्राच्या बिम्बाला शोभा येईल काय ? ॥ ८२ ॥
आपणावाचून त्याला प्राप्त झालेले साम्राज्य त्याला आनंददायक होणार नाही. कारण बंधूसह उपभोगात येणारे राज्य हे सज्जनाना आनंदित करणारे होते ॥ ८३ ॥
हे तोंडाने सांगावयाचे झाले. लेखात लिहिलेल्या अभिप्रायावरून बाकीचे समजा. याप्रमाणे बोलून नजराण्यासह लेखानी मानी असलेल्या आपल्या बंधूना हे राजन् आपण विश्वासात घ्या ॥ ८४ ॥
हे राजन्, ज्येष्ठ बंधु अशा तुझे हे कर्तव्य कीर्ति कारणारे आहे व कल्याण करणारे आहे व आपल्या ताब्यात नसलेल्या त्या तुझ्या बंधूविषयी इतर जे उत्तर कर्तव्य आहे तेही साधावे - खेळीमेळीने सलोख्याने हे आर्या तू विचार कर ॥ ८५ ॥
लोकापवादापासून भय मानणाऱ्या हे चक्रवर्तिन् तुजकडून हेच कर्तव्य केले जावे. कारण या जगात यश हेच स्थिर राहणारे आहे व संपत्ति नाशवंत आहेत ॥ ८६ ॥
याप्रमाणे पुरोहिताचे वचन ऐकूनच चक्रवर्तीने आपली क्रोधाची वृत्ति त्यागली. बरोबरच आहे की मोठ्यांच्या चित्तवृत्ति अनुकूल भाषणानें साध्य होतात ॥ ८७ ॥
Jain Education International
बाहुबली विषयीचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवावा. महाबाहु तो महाबलवान् आहे त्याला महाप्रयत्नाने जिंकणे शक्य होईल. पण बाकीचे जे भाऊ आहेत त्यांच्या प्रतिकूलपणाची परीक्षा मी करीन ॥ ८८ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org