________________
३४-७१)
महापुराण
(२६१
प्रतिशय्यानिपातेन भुक्ति ते साधयन्तु मे । शितास्त्रकण्टकोत्सङ्गपतिताङ्गा रणाङ्गणे ॥ ६४ क्व वयं जितजेतव्या भोक्तव्यासङ्गताश्च ते । तथापि संविभागोऽस्तु तेषां मदनुवर्तने ॥ ६५ न भोक्तुमन्यथाकारं महीं तेभ्यो ददाम्यहम् । कथङ्कारमिदं चक्रं विश्रमं यात्वतज्जये ॥ ६६ इदं महदनाख्येयं यत्प्राज्ञो बन्धुवत्सलः । स बाहुबलिसाह्वोऽपि भजते विकृति कृती ॥ ६७ अबाहुबलिनानेन राजकेन नतेन किम् । नगरेण गरेणेव भुक्तेनापोदनेन किम् ॥ ६८ किं किङ्करैः करालास्त्रप्रतिजितशात्रवैः । अनाज्ञावशगे तस्मिन् नवविक्रमशालिनि ॥ ६९ कि वासुरभटरेभिरुद्धटारभटै रसैः । मयेवमसमा स्पर्द्धा तस्मिन्कुर्वति गविते ॥७० । इति जल्पति संरम्भाच्चक्रपाणावपक्रमम् । तस्योपचक्रमे कर्तुं पुनरित्थं पुरोहितः ॥ ७१
अथवा रणाङ्गणात कठोर तीक्ष्ण अशा शस्त्राच्या काट्यावर ज्यांची शरीरे पडली आहेत असे ते माझे बन्धु वीरशय्येवर पडून आपल्या पृथ्वीची भुक्ति सिद्ध करोत ॥ ६४ ॥
ज्यानी जिंकण्यास योग्य असे जे जे ते सर्व जिंकले आहे असे आम्ही कोणीकडे व भोगण्याच्या पदार्थाकरिता-पृथ्वी भोगण्याकरिता फक्त एकत्र झालेले हे माझे भाऊ कोणीकडे ? तरीही ते माझ्याशी अनुकूल वागतील तर त्यांचाही या राज्यात वाटा आहे हे मी मान्य करीन ।। ६५॥
ते जर माझ्याशी अनुकूलतेने वागणार नाहीत तर मी त्याना पृथ्वी भोगण्यास देणार नाही व त्याना जर मी जिंकले नाही तर हे चक्र कसे विश्रान्ति घेईल ॥६६॥
माझा भाऊ बाहुबलि, तो तर मोठा बन्धुवत्सल आहे. सर्व भावावर त्याचे फार प्रेम आहे आणि तो मोठा चतुर आहे पण तो देखिल विकृतमनाचा झाला आहे. हे त्याचे वागणे निद्य आहे. त्याचे वर्णन करणे मला योग्य वाटत नाही ॥ ६७ ॥
भाऊ बाहुबलि जर नम्र झाला नाही तर सर्व राजसमूह नम्र होऊनही काय उपयोग आहे आणि त्याचे नगर जे पोदनपुर ते जर ताब्यात आले नाही तर त्यावाचून विषासारखे असलेल्या या नगराचा अयोध्येचा तरी काय उपयोग आहे ॥ ६८ ॥
जोमदार अशा पराक्रमाने शोभणारा जो बाहुबलि तो जर आज्ञावश होणार नाही तर भयंकर शस्त्रसमूहानी ज्यानी शत्रुसमूहाला तिरस्कृत केले आहे अशा या माझ्या वीर नोकरांचा तरी काय उपयोग आहे ॥ ६९ ॥
गर्विष्ठ असा बाहुबलि जर माझ्याशी असाधारण स्पर्धा - द्वेष करू लागला तर अतिशय भय उत्पन्न करणारा वीररस ज्यांच्या ठिकाणी आहे अशा देवरूपी सैन्याने तरी माझे काय प्रयोजन सिद्ध होणार आहे ? ॥ ७० ।।।
याप्रमाणे चक्रवर्ती क्रोधाने त्यांच्याशी युद्ध करावे अशी भाषा बोलत असता तो पुरोहित पुनः याप्रमाणे चक्रवर्तीला बोलला ॥ ७१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org