Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-५४)
तदत्र प्रतिकर्तव्यमाशु चक्रधर त्वया । ऋणव्रणाग्निशत्रूणां शेषं नोपेक्षते कृती ॥ ४६ राजन् राजन्वती भूयात्त्वयैवेयं वसुन्धरा । मा भूद्राजवती तेषां भूम्ना द्वैराज्यदुः स्थिता ॥ ४७ त्वयि राजनि राजोक्तिर्देव नान्यत्र राजते । सिंहे स्थिते मृगेन्द्रोक्ति हरिणा बिभृयुः कथम् ॥ ४८ देव त्वामनुवर्तन्तां भ्रातरो धौतमत्सराः । ज्येष्ठस्य कालमुख्यस्य शास्त्रोक्तमनुवर्तनम् ॥ ४९ त्वच्छासनहरा गत्वा सोपायमुपजप्य तान् । त्वदाज्ञानुवशान्कुर्युविगृह्य ब्रूयुरन्यथा ॥ ५० मिथ्यामदोद्धतः कोऽपि नोपेयाद्यदि ते वशम् । स नाशयेद्धतात्मानमात्मगृह्यं च राजकम् ॥ ५१ राज्यं कुलकलत्रं च नेष्टं साधारणं द्वयम् । भुङ्क्ते सार्धं परैर्यस्तन्न नरः पशुरेव सः ॥ ५२ किमत्र बहुनोक्तेन त्वामेत्य प्रणमन्तु ते । यान्तु वा शरणं देवं त्रातारं जगतां जिनम् ॥ ५३ न तृतीया गतिस्तेषामेषैषां द्वितयी गतिः । प्रविशन्तु त्वदास्थानं वनं वामी मुर्गः समम् ॥ ५४
महापुराण
हे चक्रवर्तिन् तू लौकर याविषयी प्रतीकार कर. कारण शहाणा प्रयत्नशील मनुष्य ॠण, व्रण, जखम, अग्नि आणि शत्रु यांच्या थोड्या अंशाची देखिल उपेक्षा करीत नाही ||४६|| हे राजा, ही पृथ्वी तुझ्यामुळेच राजन्वती ( उत्तम राजा जिला आहे अशी ) होवो. पण तुझे भाऊ नव्याण्णव असल्यामुळे ही पृथ्वी राजवती अनेक राजे जिच्यावर सत्ता चालवितांत अशी न होवो, अर्थात् अनेक राजामुळे जिची स्थिति बिघडली आहे अशी ती न होवो ॥ ४७ ॥
(२५२
हे प्रभो, तू राजा असता राजा हा शब्द अन्य ठिकाणी शोभत नाही कारण सिंह असताना मृगेन्द्र हा शब्द हरिण कसे बरे धारण करू शकतील ॥ ४८ ॥
हे देवा, ज्यानी आपल्यातला मत्सर काढून टाकला आहे असे हे तुझे भाऊ तुझ्याशी अनुकूल होऊन राज्य करोत आणि अधिक कालामुळे महत्त्व पावलेल्या वडील भावाशी अनुकूल वागणे हे धाकट्या भावाचे कर्तव्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे ॥ ४९ ॥
हे राजन् आपले दूत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी त्यानी युक्तीने बोलावे व त्याना त्याने आज्ञावश करावे व जर ते आज्ञावश झाले नाहीत तर अन्य प्रकाराने दमदाटीने त्यांच्याशी त्यानी बोलावे ॥ ५० ॥
खोट्या अभिमानाने उद्धत होऊन जर कोणी तुझ्या वश होणार नाही तर तो आपला नाश करून घेईल व स्वतःच्या अधीन असलेल्या राजांचाही नाश करील ।। ५१ ।। राज्य व कुलीन अशी पत्नी हे दोन पदार्थ साधारण नाहीत त्यांचा उपभोग एकाच पुरुषाने करावा. परन्तु या दोन पदार्थांचा जो इतर पुरुषाबरोबर उपभोग घेतो तो मनुष्य नव्हे तो पशुच होय ॥ ५२ ॥
याविषयी अधिक बोलणे नको. ते तुझे बन्धु तुझ्याकडे येऊन तुला ते नमस्कार करोत अथवा जगाचे रक्षण करणाऱ्या आदिभगवन्ताना ते शरण जावोत ॥ ५३ ॥
Jain Education International
या आपल्या भावाना तिसरी गति उपाय नाही. याना हेच दोन उपाय आहेत. त्यानी तुझ्या सभेत प्रवेश करावा अथवा त्यांनी हरिणाबरोबर वनात राहावे ॥ ५४ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org