Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-२१८)
महापुराण
(२७९
सपस्तनूनपात्तापादभूतेषां परा द्युतिः । निष्टप्तस्य सुवर्णस्य दीप्तिर्न व्यतिरेकिणी ॥ २११ तपोऽग्नितप्तदीप्ताङ्गास्तेऽन्तःशुद्धि परां दधुः। तप्तायां तनुमूषायां शुद्धचत्यात्मा हि हेमवत् ॥२१२ त्वगस्थिमात्रदेहास्ते ध्यानशुद्धिमधुस्तराम् । सर्वं हि परिकर्मेदं बाह्यमध्यात्मशुद्धये ॥ २१३ । योगजाः सिद्धयस्तेषामणिमादिगुणर्द्धयः । प्रादुरासन्विशुद्धं हि तपः सूते महत्फलम् ॥ २१४ तपोमयः प्रणीतोऽग्निः कर्माण्याहुतयोऽभवन् । विधिज्ञास्ते सुयज्वानो मन्त्रः स्वायम्भुवं वचः॥२१५ महाध्वरपतिर्देवो वृषभो दक्षिणा दया। फलं कामितसंसिद्धिरपवर्गः क्रियावधिः ॥ २१६ इतीमामार्षभीमिष्टिमभिसन्धाय तेऽञ्जसा । प्रावीवृतन्ननूचानास्तपोयज्ञमनुत्तरम् ॥ २१७ इत्यमूमनगाराणां परां सङ्गीर्य भावनाम् । ते तथा संवहन्ति स्म निसर्गोऽयं महीयसाम् ॥ २१८
तपरूपी अग्नीच्या तापाने त्यांच्या शरीरावर अत्युत्कृष्ट कान्ति-तेज प्रकट झाली. बरोबरच आहे की, पुष्कळ तापविलेल्या सोन्याची कान्ति कधी नाश पावत नाही ॥ २११ ।।
तपरूपी अग्नीने सर्व अवयव तापून त्यांचे शरीर फार तेजस्वी झाले, तसेच त्या तपामुळे त्यांच्या आत्म्यात अतिशय निर्मलता उत्पन्न झाली. बरोबरच आहे की शरीररूपी मूस तापली असता त्यातील आत्मा सोन्याप्रमाणे शुद्ध होतोच ॥ २१२ ।।..
तपश्चरणाने त्यांच्या शरीरात कातडे व हाडे एवढेच पदार्थ राहिले. पण त्या तपस्व्यांना ध्यानाने अधिक आत्मशुद्धि प्राप्त झाली. ही अनशनादि बाह्य तपांची सामग्री अध्यात्म शुद्धीला कारण आहे ॥ २१३ ॥
मनवचनकायेच्या एकाग्रतेने केलेल्या तपापासून त्याना आणिमादि गुणांच्या ऋद्धि सिद्धि प्राप्त झाल्या. बरोबरच आहे की, निर्मल तपश्चरण हे फार मोठ्या फलाला उत्पन्न करिते ॥ २१४ ॥
___ या मुनिवर्यानी तपश्चरणरूपी अग्नि पेटविला व त्यात त्यानी ज्ञानावरणादि अष्ट कर्माच्या आहुति टाकल्या, विधि जाणून तप करणारे ते मुनि उत्तम यज्ञकर्ते ऋत्विज होत व स्वयंभू आदिभगवंताचा उपदेश हा मंत्र होय ॥ २१५ ॥
___ या तपश्चरणरूपी महायज्ञाचा आराध्यदेव श्रीवृषभ जिनेश्वर दया ही दक्षिणा होय आणि इच्छित वस्तुप्राप्ति हीच फल होय व मोक्षाची प्राप्ति होणे ही या यज्ञाची मर्यादा होय ॥ २१६ ॥
याप्रमाणे वृषभजिनानी सांगितलेल्या द्वादशांगश्रुतज्ञानाचे ज्यानी अध्ययन केले आहे अशा त्या मुनिराजानी वृषभजिनानी सांगितलेल्या यज्ञाचा संकल्प करून अत्युत्कृष्ट असा तपोयज्ञ केला ॥ २१७ ॥
याप्रमाणे त्या मुनीनी मुनीच्या उत्तम भावनांची प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे सर्व भावनांचे आचरण त्यानी शेवटपर्यन्त धारण केले. बरोबर आहे की, जे मोठे असतात त्यांचे प्रतिज्ञेप्रमाणे वागणे नैसर्गिक असते ॥ २१८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org