Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-२०२)
महापुराण
(२७७
अदीनमनसः शान्ताः परमोपेक्षयान्विता।। मुक्तिसाध्यास्त्रिभिर्गुप्ताः कामभोगेष्वविस्मिताः ॥१९५ जिनाज्ञानुगताः शश्वत्संसारोद्विग्नमानसाः । गर्भवासजरामृत्युपरिवर्तनभीरवः ॥ १९६ श्रुतज्ञानदृशो दृष्टपरमार्था विचक्षणाः । ज्ञानदीपिकया साक्षाच्चक्रुस्ते पदमक्षरम् ॥ १९७ ते चिरं भावयन्ति स्म सन्मार्ग मुक्तिसाधनम् । परदत्तविशुद्धान्नभोजिनः पाणिपात्रकाः ॥ १९८ शङकिताभिहतोद्दिष्टऋयक्रीतादिलक्षणम् । सूत्रे निषिद्धमाहारं नैच्छन्प्राणात्ययेऽपि ते ॥ १९९ भिक्षां नियतवेलायां गृहपङक्त्यनतिक्रमात् । शुद्धामाददिरे धीरा मुनिवृत्ती समाहिताः ॥ २०० शीतमुष्णं विरूक्षं च स्निग्धं सलवणं न वा । तनुस्थित्यर्थमाहारमाजन्हुस्ते गतस्पृहाः ॥२०१ अक्षम्रक्षणमात्रं ते प्राणभृत्य विषष्वणुः । धर्मार्थमेव च प्राणान्धारश्यन्ति स्म केवलम् ॥ २०२
___ त्या मुनींच्या मनात दीनपणा नव्हता, ते शान्त व परमोपेक्षा युक्त, रागद्वेषानी रहित होते, मोक्ष हेच त्यांचे साध्य होते. मनवचनकायेला त्यानी आपल्या ताब्यात ठेवले होते आणि कामभोगाविषयी कधीही त्यांच्या मनात विस्मय- आश्चर्य वाटत नसे ॥ १९५ ॥
जिनेश्वराच्या आज्ञेला अनुसरून वागणारे, ज्यांच्या मनात संसाराचे भय राहत आहे असे, गर्भात राहणे, जन्मणे, मरणे यांच्या फेन्यापासून भिणारे असे ते मुनि होते ॥ १९६ ॥
श्रुतज्ञान- द्वादशांग श्रुतज्ञान हे ज्याना डोळे आहेत व ज्यानी परमार्थाचे स्वरूप जाणले आहे, जे चतुर आहेत असे मुनि ज्ञानरूपी दिव्याने अविनाशी असे स्थान- परमात्मपद साक्षात् पाहू लागले ॥ १९७ ॥
दुसऱ्यानी दिलेल्या शुद्ध अन्नाचाच आहार घेणारे, हात हेच पात्र ज्यांचे आहे असे ते मुनि रत्नत्रयच सन्मार्ग आहे व तोच मुक्तीचे साधन आहे असे दीर्घकालापासून चिन्तन करीत असत ॥ १९८ ॥
____ जो शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे असा संशय ज्याविषयी येतो त्याला शंकित आहार म्हणतात, अभिहृत- जो आहार कोणाकडून तरी आणविलेला आहे तो अभिहृत होय. जो ज्याना द्यावयाचा त्यांच्यासाठीच बनविलेला आहे त्याला उद्दिष्टाहार म्हणतात व विकत आणलेला आहार तो क्रयक्रीत होय. इत्यादिक आहार आचारांगसूत्रात निषिद्ध मानले आहेत. असले आहार प्राण जाण्याची वेळ आली तरी ते मुनि इच्छित नसत ॥ १९९ ।।
मुनिराजांचे चारित्र पालनात तत्पर असे ते धीर मुनि आहाराच्या वेळी गृहपंक्तीला अनुसरून जो शुद्ध आहार मिळत असे तोच घेत असत ।। २०० ॥
___ ज्यांची अभिलाषा नष्ट झाली आहे असे मुनिराज शरीर टिकावे म्हणून थंड, उष्ण, रूक्ष, स्निग्ध, मीठ घातलेला किंवा अळणी जसा मिळेल तसा आहार घेत असत ।। २०१ ॥
गाडीच्या कण्याला जसे वंगण लावतात तसे ते मुनि प्राण धारण करण्याकरिता अल्प आहार घेत असत व त्यानी केवळ धर्मासाठीच प्राण धारण केले होते ॥ २०२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org