________________
२७६)
महापुराण
(३४-१८७
स्वाध्याययोगसंसक्ता न स्वपन्ति स्म रात्रिषु । सूत्रार्थभावनोद्युक्ता जागरूकाः सदाप्यमी ॥१८७ पल्यथेन निषण्णास्ते वीरासनजुषोऽथवा । शयाना वैकपार्वेन शर्वरीरत्यवाहयन् ॥ १८८ त्यक्तोपधिभरा धीरा व्युत्सृष्टाङ्गा निरम्वराः। नैष्किञ्चन्यविशुद्धास्ते मृक्तिमार्गममार्गयन् ॥१८९ निाक्षेपा निराकाडक्षा वायुवीथ्यनुगामिनः । व्यहरन्वसुधामेनां सग्रामनगराकराम् ॥ १९० विहरन्तो महीं कृत्स्ना ते कस्याप्यनभिद्रुहः । मातृकल्पा दयालुत्वात्पुत्रकल्पेषु देहिषु ॥ १९१ जीवाजीवविभागज्ञा ज्ञानोद्योतस्फुरदृशः । सावधं परिजन्हुस्ते प्रासुकावसथाशनाः ॥ १९२ स्याद्यत् किञ्चिच्च सावधंतत्सर्वं त्रिविधेन ते । रत्नत्रितयशुद्धयर्थ यावज्जीवमवर्जयन् ॥ १९३ प्रसान्हरितकायांश्च पृथिव्यप्पवनानलान् । जीवकायानपायेभ्यस्ते स्म रक्षन्ति यत्नतः ॥ १९४ ।।
ते मुनिवर्य स्वाध्याय व ध्यानात तत्पर राहत असत. त्यामुळे रात्री ते झोपत नसत. आचारांगादि सूत्रार्थाच्या चिन्तनात तत्पर राहत असत. त्यामुळे नेहमी जागरुक असत ॥१८७।।
पल्यङ्कासनाने बसून किंवा वीरासनाने युक्त होऊन अथवा शरीराच्या एका बाजूने झोपून ते मुनि सर्व रात्री घालवीत असत ।। १८८ ॥
ज्यानी परिग्रह त्यागले आहेत, जे धैर्यवन्त, शरीरावरील ममत्वाचा त्याग केलेले, वस्त्ररहित, परिग्रहाच्या त्यागामुळे परिणामात अतिशय विमलता धारण केलेल्या त्या मुनीनी मुक्तीच्या मार्गाचा शोध करणे सतत चालू ठेवले ।। १८९ ॥
__ कशाचीही ज्याना अपेक्षा राहिली नाही असे निरिच्छ, आकाशपंक्तीचे अनुसरण करणारे अर्थात् आकाशाप्रमाणे निर्लेप राहणारे असे ते मुनि गाव, शहर यानी युक्त या पृथ्वीवर विहार करीत असत ॥ १९० ॥
कोणाशीही द्वेष न करणारे व दयाळू असल्यामुळे पुत्रासारखे अशा सर्व प्राणिमात्रावर मातेप्रमाणे असलेले ते यतिराज सम्पूर्ण पृथ्वीवर पर्यटन करीत असत ।। १९१ ॥
जीवद्रव्य व अजीवद्रव्य यांची चांगली माहिती ज्याना आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशाने ज्यांचा सम्यग्दर्शनगुण निर्मल झाला आहे व ज्यांचे निवासस्थान व अन्न प्रासुक आहेत अर्थात् वसतिका व आहार सर्व दोषानी रहित आहेत अशा त्या मुनिवरानी पापसहित क्रियांचा सर्वथा त्याग केला होता ।। १९२ ।।
आपल्या रत्नत्रयाची शुद्धि व्हावी म्हणून जे कांहीं पापयुक्त असेल ते सर्व ते मुनि मनवचनकायेने रत्नत्रयाच्या शुद्धीसाठी आजन्म त्यागीत असत ।। १९३ ॥
द्वीन्द्रियादिक त्रसजीव, वनस्पतिकायिकजीव, पृथ्वी, जल, वायु, अग्नि, अशा षटकाय जीवाना ते मुनि त्याना आपणापासून बाधा होऊ नये म्हणून त्यांचे यत्नाने रक्षण करीत असत ।। १९४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org