Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७४)
महापुराण
(३४-१७०
यावज्जीवं व्रतेष्वेष ते दृढीकृतसङ्गराः । त्रिविधेन प्रतिक्रान्तदोषाः शुद्धि परां दधुः ॥ १७० सर्वारम्भविनिर्मुक्ता निर्ममा निष्परिग्रहाः । मार्गमाराधयञ्जनं व्युत्सृष्टतनुयष्टयः ॥ १७१ सर्वोपधिविनिर्मुक्ताः स्थिता धर्मे जिनोदिते । नैच्छन्बालाग्रमानं च द्विधाम्नातं परिग्रहम् ॥ १७२ निर्मूस्तेि स्वदेहेऽपि धर्मवद्मनि सुस्थिताः । सन्तोषभावनापास्ततृष्णाः सन्तो विजहिरे।। १७३ वसन्ति स्मानिकेतास्ते यत्रास्तं भानुमानितः । तत्रैकत्र क्वचिद्देशे नै सङग्यं परमास्थिताः ॥ १७४ विविक्तकान्तसेवित्वाद्ग्रामेष्वेकाहवासिनः । पुरेष्वपि न पञ्चाहात्परं तस्थु पर्षयः ॥ १७५ शून्यागारश्मशानादिविविक्तालयगोचराः। ते वीरवसतीभेंजुरुज्झिताः सप्तभिर्भयैः ॥ १७६ तेऽभ्यनन्दन्महासत्वाः पाकसत्त्वैरधिष्ठिताः। गिर्यग्रकन्दरारण्यवसतीः प्रतिवासरम् ॥ १७७
जोपर्यन्त जीवन आहे तोपर्यन्त या व्रतांचे पालन करण्याची त्यांची प्रतिज्ञा दृढ होती व या व्रतात दोष उत्पन्न झाले तर मनाने, वचनाने व शरीराने त्या दोषांचे प्रतिक्रमण करीत असत. त्यामुळे त्यांच्या व्रतात अतिशय शुद्धि उत्पन्न झाली ॥ १७० ॥
ज्यात हिंसा होते अशा सर्व कार्यापासून विरक्त झालेले, कोणत्याही पदार्थात ज्याना ममत्व नाही असे बाह्याभ्यन्तरपरिग्रहांचे त्यागी आणि देहावरच्या उपेक्षाबुद्धीने युक्त असलेले ते मुनि श्रीजिनमार्गाचे सेवन-आराधन करण्यात तत्पर राहिले ॥ १७१ ॥
ते मुनिराज सर्व प्रकारच्या रागद्वेषादि उपाधीपासून मुक्त होते. जिनधर्माचरणात तत्पर राहिले म्हणून बाह्य व अन्तरंग अशा दोन्ही प्रकारच्या परिग्रहांची ते केशाग्रमात्रही इच्छा करीत नसत ॥ १७२ ।।
त्यांचे आपल्या देहावरही ममत्व नव्हते आणि धर्ममार्गात दृढ स्थिर होते. सन्तोषाच्या चिन्तनाने त्यानी आपल्या हृदयातून लोभाला काढून टाकले होते. याप्रमाणे ते विहार करीत असत ।। १७३ ॥
ते मुनि जेथे सूर्यास्त होईल त्या ठिकाणी राहत असत. उत्कृष्ट परिग्रहत्यागवतात नेहमी स्थिर राहणारे गृहत्यागी असे ते मुनि जेथे सूर्यास्त होईल तेथील एका कोणत्याही वनादिक प्रदेशात राहत असत ।। १७४ ।।
लोकसंसर्गरहित अशा एकान्त स्थानी राहणारे ते राजर्षि गावात एक दिवसच राहत असत व नगरात देखिल पाच दिवसापेक्षा अधिक दिवस ते राहत नसत ॥ १७५ ॥
इहलोकभय, परलोकभय, आकस्मिकभय, अत्राणभय, अगुप्तिभय, मरणभय, वेदनाभय अशा सात भयानी रहित असे ते मुनि शून्य घर, श्मशानादिक एकान्तप्रदेशात ज्याना वीरवसती म्हणतात तेथे राहत असत ।। १७६ ॥
हिंस्रप्राणी जेथे राहतात अशी पर्वताची शिखरे गुहा व अरण्य या ठिकाणी ते महाधैर्यशाली मुनि राहत असत. ही स्थाने चांगली आहेत असे ते मानीत असत ।। १७७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org