Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-१६९)
महापुराण
(२७३
ते स्वभुक्तोज्झितं भयो नैच्छन्भोगपरिच्छदम् । निर्भुक्तमात्मनिःसारं मन्यमाना मनीषिणः॥१६३ फेनोमिहिमसन्ध्याभ्रचलं जीवितमङ्गिनाम् । मन्वाना दृढमासक्ति भेजुस्ते पथि शाश्वते ॥ १६४ संसारावासनिविण्णा गृहावासाद्विनिःसृताः । जैने मार्गे विमुक्त्यङ्ग ते परां धृतिमादधुः ॥ १६५ इतोऽन्यदुत्तरं नास्तीत्यारूढ़दृढभावनाः । तेऽमी मनोवचःकायैः श्रद्दधुर्गुरुशासनम् ॥ १६६ तेऽनुरक्ता जिनप्रोक्ते सूक्ते धर्मे सनातने । उत्तिष्ठन्ते स्म मुक्त्यर्थ बद्धकक्षामुमुक्षवः ॥ १६७ संवेगजनितश्रद्धाः शुद्ध वर्त्मन्यनुत्तरे। दुरापां भावयामासुस्ते महावतभावनाम् ॥ १६८ अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्य विमुक्तताम् । राज्यभोजनषष्ठानि व्रतान्येतान्यभावयन् ॥ १६९
--------------
ते विवेकी विचारवंत मुनि भोगून त्यागिलेल्या भोगोपभोगाच्या पदार्थाना उपभोगलेल्या पुष्पमालेप्रमाणे निःसार मानीत असत. म्हणून त्यानी पुनः त्यांची इच्छा कधीही केली नाही ॥ १६३ ॥
फेस, पाण्याच्या लाटा, गवतावर पडणारे दहिवराचे थेंब व संध्याकाळी जमलेले ढग हे जसे चंचल नाशवंत आहेत तसे हे प्राण्याचे जीवित चंचल नाशवंत आहे असे हे मुनि मानीत असत आणि त्यामुळे अविनाशी अशा मोक्षमार्गात-रत्नत्रयमार्गात ते अतिशय दृढपणे आसक्त झाले ।। १६४ ।।
ते मुनि संसारात परिभ्रमण करण्यापासून विरक्त झाले होते व घरात राहण्याचा त्यानी त्याग केला होता व मोक्ष प्राप्त करून देण्यास कारण अशा भगवान् वृषभदेवानी सांगितलेल्या जैनमार्गात- जिनप्रणीतचारित्रात त्यानी फार संतोष मानला, त्यात ते फार दृढ राहिले ॥ १६५ ॥
भगवंत वृषभेश्वरानी सांगितलेल्या मोक्षमार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग उत्कृष्ट नाही अशी त्या मुनींची दृढ भावना झाली व त्या भावनेत ते दृढ स्थिर राहिले. आदिभगवंतानी सांगितलेल्या मोक्षमार्गावर त्यानी मन, वचन व कायेने दृढश्रद्धान ठेविले ॥ १६६ ।।
जिनेन्द्र भगवंतानी सांगितलेला आणि अनादिकालापासून चालत आलेला अशा दोषरहित जिनधर्मात ते मुनिराज मोक्षासाठी दृढतेने तत्पर झाले ॥ १६७ ।।
त्याना संसारापासून भय उत्पन्न झाल्यामुळे जिनधर्मावर श्रद्धा उत्पन्न झाली आहे, ज्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही अशा निर्दोष मुक्तिमार्गात जिची प्राप्ति होणे कठिण आहे अशा महाव्रतांच्या भावना ते भावू लागले ।। १६८ ।।
अहिंसा, सत्यभाषण करणे, चोरी न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे व बाह्याभ्यंतर परिग्रहांचा त्याग ही पाच महाव्रते आणि सहावे रात्रिभोजनत्याग, अणुव्रत, अशा सहा व्रतांचे पालन ते निरन्तर करीत होते ॥ ॥ १६९ ॥
म. ३५
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org