Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७८)
महापुराण
(२५-९६
न तुष्यन्ति स्म ते लब्धे व्यषीदन्नाप्यलब्धितः । मन्यमानास्तपोलाभमधिकं धूतकल्मषाः ॥ २०३ स्तुति निन्दा सुखं दुःखं तथा मानं विमानताभ् । समभावेन तेऽपश्यन्सर्वत्र समशिनः ॥ २०४ वाचंयमत्वमास्थाय चरन्तो गोचराधिनः । निर्यान्ति स्माप्यलाभेन नाभञ्जन्मौनसङ्गरम् ॥ २०५ महोपवासम्लानाङ्गा यतन्ते स्म तनस्थितौ । तत्राप्यशुद्धमाहारं नैषिषुर्मनसाप्यमी ॥ २०६ गोचराग्रगता योग्यं भुक्त्वान्नमविलम्बितम् । प्रत्याख्याय पुनर्वीरा निर्ययुस्ते तपोवनम् ॥ २०७ तपस्तापतनूभूततनवोऽपि मुनीश्वराः । अनुबद्धात्तपोयोगान्नारेमुर्दृढ़सङ्गराः ॥ २०८ तीवं तपस्यतां तेषां गात्रेषु श्लथताभवत् । प्रतिज्ञा या तु सद्धयानसिद्धावशिथिलैव सा ॥ २०९ नाभूत्परीषहैर्भङ्गस्तेषां चिरमुपोषुषाम् । गताः परीषहा एव भडगं तान्जेतुमक्षमाः ।। २१०
ते मुनि आहार मिळाला असता आनंदित होत नसत व न मिळाला असता खिन्नही होत नसत. ज्यांनी पातक नाहीसे केले अशा त्यानी आहार नाही मिळणे हे अधिक तपोलाभ होण्यास कारण आहे असे मानले ॥ २०३ ॥
ज्यांची दृष्टि सर्वत्र समदर्शी झाली आहे असे ते मुनि स्तुति, निंदा, सुख, दुःख, मान व अपमान यांना समभावाने पाहत असत ।। २०४ ।।
आहाराची इच्छा करणारे ते मुनि भाषणाला बंधन घालून आहारासाठी निघत असत व आहार न मिळाल्यास आपल्या मौनाची प्रतिज्ञा सोडीत नसत ।। २०५ ॥
अनेक दिवसांचे उपवासामुळे ज्यांचे शरीर म्लान झाले आहे असे ते मुनि देह रक्षणाकरिता यत्न करीत असत, आहार घेत असत. पण मनाने देखिल अशुद्ध आहाराची इच्छा करीत नसत. आगमदृष्टीने शुद्ध आहार मिळाला तरच ते घेत असत ॥ २०६॥
गोचरीवृत्ति धारण करणाऱ्या मुनिवर्गात श्रेष्ठ असे ते मुनि योग्य आहार घेऊन शीघ्र प्रत्याख्यान करीत असत अर्थात् दुसरे दिवशी आहार मिळेपर्यन्त मला आहाराचा त्याग आहे असे प्रत्याख्यान ते करीत असत व असे प्रत्याख्यान करून ते मुनि तपोवनाकडे जात असत ॥ २०७॥
तपश्चरणाच्या तापाने ज्यांचे शरीर कृश झाले होते असेही ते मुनिराज दृढ प्रतिज्ञापालक असल्यामुळे आपण प्रारंभिलेल्या तपापासून विराम पावत नसत ।। २०८ ॥
तीव्र तप करणाऱ्या त्या मुनिवर्याच्या शरीरात शिथिलता आलेली होती. पण उत्कृष्ट तपश्चरणाची सिद्धि प्राप्त करून घ्यावी अशी जी त्यांची प्रतिज्ञा होती ती मात्र ढिली झाली नाही, ती दृढच राहिली ॥ २०९ ।।
दीर्घकालपर्यन्त उपवास करणाऱ्या त्या कुमारश्रमणांचा भूक, तहान वगैरे परिषहानी पराभव केला नाही पण ते परिषहच त्याना जिंकण्यासाठी असमर्थ होऊन पराभूत-पराजित झाले ॥ २१० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org