Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३४-१३७) महापुराण
(२६९ --- स्थिताः सामायिके वृत्ते जिनकल्पविशेषिते । ते तेपिरे तपस्तीवं ज्ञानशुद्धयुपवृहितम् ॥ १३० वैराग्यस्य परां काष्टामारूढास्ते युवेश्वराः। स्वसाच्चक्रुस्तपोलक्ष्मी राज्यलक्षभ्यामनुत्सुकाः॥१३१ तपोलक्ष्म्या परिष्वक्ता मुक्तिलक्ष्म्यां कृतस्पृहाः। ज्ञानसम्पत्प्रसक्तास्ते राज्यलक्ष्मी विसस्मरुः ॥ द्वादशाङ्गश्रुतस्कन्धमधीत्यते महाधियः । तपोभावनयात्मानमलञ्चक्रुः प्रकृष्टया ॥ १३३ स्वाध्यायेन मनोरोधस्ततोऽक्षाणां विनिर्जयः । इत्याकलय्य ते धीराः स्वाध्यायधियमादधुः ॥१३४ आचाराङ्गन निःशेष साध्वाचारमवेदिषुः । चर्याशुद्धिमतो भेजुरतिक्रमविजिताम् ॥ १३५ ज्ञात्वा सूत्रकृतं सूत्रं निखिलं सूत्रतोऽर्थतः । धर्मक्रियासमाधाने ते दधुः सूत्रधारताम् ॥ १३६ स्थानाध्ययनमध्यायशतैर्गम्भीरमब्धिवत् । विगाह्य तत्त्वरत्नानामयुस्ते भेदमञ्जसा ॥ १३७
जिनकल्प-दीक्षा धारण करून तपश्चरणात तत्पर राहून संघविरहित एकटे विहार करणे याला जिनकल्प म्हणतात. या जिनकल्पसाधूंचे अभेदचारित्र म्हणजे पहिले सामायिक चारित्रच असते. जिनकल्पाचा विशेषपणा दाखविणाऱ्या सामायिकचारित्रात ते कुमारमनि स्थिर झाले व ज्ञानाच्या अतिशय निर्मल
झालेले तीव्र तप ते करीत असत ।। १३० ।।
राज्यलक्ष्मीत ते अगदीच अनुत्सुक होते. अतिशय विरक्तावस्था धारण करणारे ते तरुण महामुनि वैराग्याच्या परमसीमेवर आरूढ झाले. त्यांनी तपोलक्ष्मीला पूर्ण आपल्या स्वाधीन करून घेतले ।। १३१ ॥
तपोलक्ष्मीने ज्याना गाढ आलिंगिले आहे असे ते कुमारश्रमण मुक्तिलक्ष्मीची इच्छा करीत होते आणि सम्यग्ज्ञानसम्पत्तीमध्ये ते अत्यासक्त झाले आणि राज्यलक्ष्मीला ते पूर्ण विसरले ॥ १३२ ।।
___ हे कुमार मुनि अत्यन्त उत्कृष्टबुद्धीचे धारक होते. त्यांनी द्वादशांग श्रुतस्कंधाचे अध्ययन करून उत्कृष्ट तपोभावनेने आपल्याला सुशोभित केले ॥ १३३ ॥
स्वाध्याय केल्याने मनाला आळा घातला जातो, मन एकाग्र होते, मन ताब्यात राहिले म्हणजे इन्द्रिये जिंकता येतात. असे जाणून त्या धीर मुनिवर्यांनी आपल्या बुद्धीला स्वाध्यायात तत्पर केले ।। १३४ ॥
आचाराङ्गाच्या अध्ययनाने त्यानी सर्व मुनींच्या आचाराना जाणले. त्यामुळे त्यांच्या आचारात अतिचारानी रहित अशी शुद्धि प्राप्त झाली ।। १३५ ।।।
त्यानी सर्व सूत्राङ्ग शब्द आणि अर्थानी जाणून घेतले. त्यामुळे ते धर्मक्रिया धारण करण्यात सूत्रधार झाले अर्थात् धर्म-क्रियाना उत्तम पाळण्यात तत्पर झाले ।। १३६ ॥
स्थानाध्ययन नावाचे तिसरे श्रुतांशशास्त्र शेकडो अध्यायाचे असल्यामुळे समुद्राप्रमाणे गंभीर होते. त्यात त्यानी अवगाहन केले व त्यांच्यातील तत्त्वरत्नांचे भेदप्रभेद त्यानी उत्तम रीतीने जाणले ।। १३७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org