________________
२५८)
महापुराण
(३४-३७
.............
स्वलच्चिः करालं वो जैत्रमस्त्रमिदं ततः । संस्तम्भितमिवाव्यक्तं पुरद्वारि विलम्बते ॥ ३७ अरिमित्रममित्रं मित्रमित्रमिति श्रुतिः । श्रुतिमात्रे स्थिता देव प्रजास्त्वय्यनुशासति ॥ ३८ तथाप्यस्त्येव जेतव्यः पक्षः कोऽपि तवाधुना । योऽन्तर्गृहे कृतोत्थानः कूरो रोग इवोदरे ॥ ३९ बहिर्मण्डलमेवासीत्परिक्रान्तमिदं त्वया । अन्तर्मण्डलसंशुद्धिर्मनाग्नाद्यापि जायते ॥ ४० जितजेतव्यपक्षस्य न नम्रा भ्रातरस्तव । व्युत्थिताश्च सजातीया विधाताय ननु प्रभोः ॥४१ स्वपक्षरेव तेजस्वी महानप्युपरुध्यते । प्रत्यर्फमर्ककान्तेन ज्वलतेदमुदाहृतम् ॥ ४२ विबलोऽपि सजातीयो लब्ध्वा तीक्ष्णं प्रतिष्कशम् । दण्डः परश्वधस्व निबर्हयति पार्थिवम् ॥४३ भ्रातरोऽमी तवाजय्या बलिनो मानशालिनः । यवीयांस्तेषु धौरेयो धीरो बाहुबली बली ॥ ४४ एकोनशतसङख्यास्ते सोदर्या वीर्यशालिनः । प्रभोरादिगुरोर्नान्यं प्रणमाम इति स्थिताः ॥ ४५
पेटणाऱ्या ज्वालानी भयंकर दिसणारे, जयशाली असे हे तुमचे अस्त्र (चक्ररत्न) अव्यक्त राहून कोणी तरी त्याची गति जणु रोकल्याप्रमाणे नगराच्या वेशीत स्तंभित केल्याप्रमाणे उभे राहिले आहे ॥३७॥
हे राजन्, तू प्रजेचे रक्षण करीत असता शत्रु, मित्र, शत्रूचा मित्र व मित्राचा मित्र हे शब्द केवळ शास्त्रातच ऐकू येतात. व्यवहारात ते फक्त शब्दांनी राहिले आहेत ॥ ३८॥
तरीही कोणी तरी जिंकण्यास योग्य असा पक्ष आहे व क्रूर रोग जसा पोटामध्ये वाढतो तसा तुझ्या घरात हा जेतव्यपक्ष उत्पन्न झाला आहे व त्याने आपले डोके वर काढले आहे ॥ ३९ ॥
हे प्रभो, तू आपल्या बाह्यमंडलालाच जिंकले आहेस. पण अन्तर्मण्डल तुझ्याकडून हे प्रभो, अद्यापि शुद्ध केले गेले नाही. अर्थात् अन्तर्मण्डलात असलेले हे तुझे बंधु वगैरे तुझ्याविषयी शुद्ध अन्तःकरणाचे नाहीत ।। ४० ॥
_हे प्रभो, तू सर्व शत्रूना जिंकले आहेस. पण तुझे सर्व भाऊ तुला नम्र नाहीत, कारण सजातीय लोक जेव्हा विरुद्ध होतात तेव्हा ते राजाच्या नाशाला कारण होतात ॥ ४१ ।।
तेजस्वी मनुष्य जरी मोठा असला तरीही आपल्या सजातीय लोकाकडून पराजित केला जातो. ते त्याच्याशी विरोध करतात. सूर्यकान्तमणि प्रज्वलित होऊन सूर्याबरोबर विरोध करतो हे याचे उदाहरण आहे ॥ ४२ ॥
शक्तिहीन असाही सजातीय मनुष्य बलवान् पुरुषाचा आश्रय मिळवून राजाचा घात करतो, जसे दाण्डा कुन्हाडीचा आधार मिळवून सजातीय वृक्षांचा नाश करतो ।। ४३ ।।
हे प्रभो, हे तुझे भाऊ मानशाली आहेत व बलवान् आहेत. त्यामुळे ते तुजकडून जिंकले जाणे शक्य नाही. त्यात धाकटा धैर्यशाली, बलवान् असा बाहुबली सर्वांत प्रमुख आहे ।। ४४॥
तुझे ते नव्याण्णव भाऊ वीर्यशाली - पराक्रमी आहेत व प्रभु - आदिप्रभुशिवाय इतराला आम्ही नमस्कार करणार नाही असा त्यानी निश्चय केला आहे ॥ ४५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org