________________
२५६)
महापुराण
(३४-२०
किमसाध्यो द्विषत्कश्चिदस्त्यस्मद्भुक्तिगोचरे । सनाभिः कोऽपि किं वास्मान्द्वेष्टि दुष्टान्तराशयः॥२० यः कोऽप्यकारणद्वेषी खलोऽस्मान्नाभिनंदति । प्रायः स्खलन्ति चेतांसि महत्स्वपि दुरात्मनाम् ॥२१ विमत्सराणि चेतांसि महतां परवृद्धिषु । मत्सरीणि तु तान्येव क्षुद्राणामन्यवृद्धिषु ॥ २२ अथवा दुर्मदाविष्टः कश्चिदप्रणतोऽस्ति मे । स्ववर्यस्तन्मदोच्छित्त्य नूनं चक्रेण वक्रितम् ॥ २३ खलूपेक्ष्य लघीयानप्युच्छेद्यो लघुतादृशः । क्षुद्रो रेणुरिवाक्षिस्थो रुजत्यरिरुपेक्षितः ॥ २४ बलादुद्धरणीयो हि क्षोदीयानपि कण्टकः । अनुद्धृतः पदस्थोऽसौ भवेत्पीडाकरो भृशम् ॥ २५ चक्रं नाम परं देवं रत्नानामिदमनिमम् । गतिस्खलनमतस्य न विना कारणाद्भवेत् ॥ २६ । ततो नाल्पमिदं कार्य यच्चक्रेणार्य, सूचितम् । सूचिते खलु राज्याङ्गे विकृति ल्पकारणात् ॥ २७ तदत्र कारणं चिन्त्यं त्वया धीमन्निदन्तया । अनिरूपितकार्याणां नेह नामुत्रसिद्धयः ॥ २८
..........................
आम्ही ज्याचा उपभोग घेत आहोत त्या आमच्या देशातच कोणी असाध्य शत्रु आहे काय? किंवा ज्याच्या मनात दुष्ट आशय आहे असा कोणी आमचा गोत्रज आमच्याशी द्वेष करीत आहे काय ? ॥ २० ॥
जो कोणी विनाकारण द्वेष करणारा दुष्ट मनुष्य आमच्याविषयी आनंद मानीत नसेल तर न मानो. कारण दुष्ट मनुष्यांची अन्तःकरणे बहुतकरून मोठ्या लोकाविषयीही मत्सर करीत असतात ॥ २१ ॥
मोठ्या लोकांची मने दुसन्यांच्या वैभवाच्या भरभराटीविषयी मत्सररहित असतात पण क्षुद्रमनुष्यांची मने दुसन्यांच्या उत्कर्षाविषयी मत्सर करतात, जळफळतात ।। २२ ।।
अथवा आमच्यातीलच कोणी दुरभिमानाने भरलेला दुष्ट मनुष्य मला नमस्कार करीत नसेल. त्याची मस्ती नष्ट करावी या हेतूने हे चक्र वक्र झाले असावे अर्थात् याची गति बंद पडली असावी ॥ २३ ॥
__ शत्रु अतिशय लहान असला तरी त्याची उपेक्षा करू नये. त्याला शीघ्र उपडून टाकावे. डोळ्यामध्ये क्षुद्र रेणु गेला तरी त्याची उपेक्षा केली तर तो पीडा करतो ॥ २४ ॥
क्षुद्र काटा असला तरी तो आपल्या सामर्थ्याने उपडून टाकला पाहिजे. पायात घुसलेला तो काटा आपण काढून नाही टाकला तर तो अतिशय पीडा करणारा होतो ।। २५ ।।
हे चक्ररत्न उत्तम देवस्वरूपी आहे व चौदा रत्नात हे मुख्य रत्न आहे. याची गति बंद होणे कारणावाचून शक्य नाही ।। २६ ॥
हे आर्य, या चक्राने जे कार्य सूचित केले आहे ते छोटेसे आहे असे समजणे योग्य नाही. कारण हे चक्ररत्न राज्याचे उत्तम योग्य अंग आहे. यांच्यात अल्पकारणाने विकृति झाली नसती ॥ २७॥
यास्तव हे पुरोहितजी आपण विद्वान् आहात या चक्ररत्नाची गति का रुवली याचा विचार करा. ज्यांनी कार्याचा विचार केला नाही त्याना इहलोकी व परलोकीही कार्याची सिद्धि होत नसते ॥ २८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org