Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
चतुस्त्रिंशत्तमं पर्व ।
अथावरुह्य कैलासादद्रीन्द्रादिव देवराट् । चक्री प्रयाणमकरोद्विनीताभिमुखं कृती ॥१ सैन्यैरनुगती रेजे प्रथांचकी निजालयम् । गङ्गौघ इव दुर्वारः सरिवोर्घरपाम्पतिम् ॥ २ ततः कतिपयैरेव प्रयाणेश्चक्रिणो बलम् । अयोध्यां प्रापदाबद्धतोरणां चित्रकेतनाम् ॥ ३ चन्दनद्रवसंसिक्तसुसंमृब्टमहीतला । पुरी स्नावानुलिप्तेव सा रेजे प्रत्युरागमे ॥४ नातिदूरे निविष्टस्य प्रवेशसमये विभोः । चक्रमस्तारिचक्रं च नाक्रस्त पुरगोपुरे ॥५ सा पुरी गोपुरोपान्तस्थितचक्रांशुरञ्जिता धृतसन्ध्यातपेवासीत्कुडकुमापिञ्जरच्छविः ॥ ६ सत्यं भरतराजोऽयं धौरेयश्चक्रिणामिति । धृतदिव्येव सा जज्ञे ज्वलच्चका पुरः पुरी ॥ ७ ततः कतिपये देवाश्चक्ररत्नाभिरक्षिणः। स्थितमेकपदे चक्रं वीक्ष्य विस्मयमाययुः ॥८
यानंतर जसा मेरुपर्वतावरून सौधर्मेन्द्र खाली उतरतो तसे कैलासपर्वतावरून खाली उतरून त्या बुद्धिमान् चक्रवर्तीने अयोध्येकडे तोंड करून प्रयाण केले ॥ १ ॥
ज्याला रोकू शकत नाही असा गंगेचा प्रवाह जसा अनेक नद्यांच्या प्रवाहासह समुद्राला मिळतो तसा आपल्या सैन्यानी अनुसरलेला हा चक्री आपल्या घराकडे जात असता शोभला ।। २ ।।
यानंतर काही मुक्कामानी चक्रवर्तीचे सैन्य जिथे तोरणे बांधली आहेत व नानाविध ध्वज उभारलेले आहेत अशा अयोध्येजवळ आले ॥ ३ ॥
पतीचे आगमन झाले असता स्नान करून अंगाला जिने सुगंधित उटी लाविली आहे अशा स्त्रीप्रमाणे चन्दनाच्या सड्यांनी जिचे भूतल अतिशय स्वच्छ केले आहे अशी अयोध्यानगरी फार शोभू लागली ॥ ४ ॥
प्रवेशसमयी अयोध्येपासून जवळच भरतचक्रवर्तीचा मुक्काम होता त्यावेळी ज्याने शत्रुसमूह नष्ट केले आहेत असे ते चक्र नगराच्या वेशीत प्रवेश न करता बाहेरच थांबले ।। ५ ।।
वेशीच्या जवळ उभे राहिलेल्या चक्ररत्नाच्या किरणानी रंगलेली ती अयोध्यानगरी केशरी रंगाप्रमाणे पिवळी कांति जिची आहे अशा उन्हाची शोभा धारण केलेल्या संध्येप्रमाणे वाटू लागली ।। ६ ॥
" खरोखर हा भरतराजा सर्वचक्रवर्तीचा पुढारी आहे.” जिच्यापुढे ज्वालायुक्त चक्र उभे राहिले आहे अशी ती नगरी दिव्यधारण केल्याप्रमाणे भासली. अर्थात् हा भरत सर्व चक्रवर्तीत श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता तिने आपल्या हातात दिव्य तापलेला लोखंडाचा गोळा जणु धारण केला आहे अशी ती नगरी दिसली ।। ७ ।।
यानंतर या चक्ररत्नाचे सर्व तन्हेने रक्षण करणारे कांही देव ते चक्र एकदम स्थिर झाले हे पाहून आश्चर्यचकित झाले ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org