Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५२)
महापुराण
(३३-१९७
( वसन्ततिलकवृत्तम् ) इत्थं चराचरगुरुं परमादिदेवम् । स्तुत्वाषिराट् धरणिपः सममिद्धबोधः ॥ आनन्दबाष्पलवसिक्तपुरःप्रवेशो । भक्त्या ननाम करकुङमललग्नमौलिः ॥ १९७ श्रुत्वा पुराणपुरुषाच्च पुराणधर्म । कर्मारिचक्रजयलब्धविशुद्धबोधात् । सम्प्रीतिमाप परमां भरताधिराजः प्रायोतिः कृतधियां स्वहितप्रवृत्तौ ॥ १९८ आपृच्छय च स्वगुरुमादिगुरुं निधीशो। व्यालोलमौलितटताडितपादपीठः ॥ भूयोऽनुगम्य च मुनीन्प्रणतेन मूर्ना । स्वावासभूमिमभिगन्तुमना बभूव ॥ १९९ भक्त्यापितां सजमिवाधिपदं जिनस्य । स्वां दृष्टिमन्वितलसत्सुमनोविकासाम् ॥ शेषास्थयेव च पुनविनिवर्त्य कृच्छात् । चक्राधिपो जिनसभाभवनात्प्रतस्थे ॥ २०० आलोकयन् जिनसभावनिभूतिमिद्धां विस्फारितेक्षणयुगो युगदीर्घबाहुः । पृथ्वीश्वररनुगतः प्रणतोत्तमाङ्गः प्रत्यावृतत्स्वसदनं मनुवंशकेतुः ॥ २०१
___ याप्रमाणे स्थावर व त्रसप्राण्यांचे गुरु अशा आदिभगवंतांची सम्राट् भरताने सर्व राजसमूहासह स्तुति केली. ज्याचे ज्ञान प्रकाशमान झाले आहे अशा भरतेशाने आपल्या आनंदाश्रूच्या थेंबानी पुढील प्रदेश भिजविला व हातरूपी कमलांची कळी मस्तकावर ठेवून भक्तीने प्रभूना नमस्कार केला ॥ १९७ ।।
कर्मरूपी शत्रुसमूहावर जय मिळविल्यामुळे ज्यांना निर्मल बोध-केवलज्ञान प्राप्त झाले आहे अशा पुराणपुरुष आदिभगवंतापासून पुरातन जैनधर्माचे स्वरूप ऐकून भरत सम्राटाला अतिशय संतोष आनंद झाला. हे योग्यच झाले. कारण बुद्धिमान् पुरुषांना प्राय आपल्या हितकर कार्यात प्रवृत्त होण्याचीच इच्छा असते. त्यातच त्यांना संतोष वाटतो ॥१९८॥
नम्र होत असता चंचल झालेल्या मस्तकाने व ज्या अग्रभागाने पायाच्या खाली असलेल्या आसनाला ज्याने स्पर्श केला आहे अशा निधिपति भरताने आपले पिता असलेल्या आदिभगवंतांना विचारले आणि नम्रमस्तकाने वृषभसेनादिगणधरादिकांना त्याने विचारले व नन्तर तो आपल्या राहण्याच्या भूमीकडे जाण्यास तत्पर झाला- उत्सुक झाला ॥ १९९ ॥
विकसित झालेली सुंदर फुले अनुक्रमाने जिच्यामध्ये गुंफलेली आहेत व जी श्रीजिनेश्वराच्या पायावर भक्तीने अर्पण केली आहे अशा पुष्पमालेप्रमाणे सुंदर मनाच्या प्रसन्नतेने युक्त अशा आपल्या दृष्टीला शेषेप्रमाणे समजून प्रभूपासून अतिकष्टाने आपल्या दृष्टीला वळवून भरतचक्रीने भगवंताच्या सभाभवनापासून-समवसरणापासून पुढे प्रस्थान केले ॥ २०० ॥
ज्यानी आपली मस्तके नम्र केली आहेत अशा अनेक राजानी ज्याचे अनुसरण केले आहे, ज्याचे बाहु गाडीच्या जूप्रमाणे दीर्घ आहेत, जो मनुवंशाचा ध्वज आहे, अशा भरतचक्रीने आपले दोन डोळे चांगले उघडून जिनेश्वराच्या समवसरणाची खूप वृद्धिंगत झालेली वैभवलक्ष्मी पाहिली व तो आपल्या घराकडे जाण्यास परतला ॥ २०१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org