Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५०)
महापुराण
(३३-१८३
नमस्ते परिनिर्वाणकल्याणेऽपि प्रवय॑ति । पूजनीयाय वह्नीन्द्रज्वलन्मुकुटकोटिभिः ॥ १८३ नमस्ते प्राप्तकल्याणमहेज्याय महौजसे । प्राज्यत्रैलोक्यराज्याय ज्यायसे ज्यायसामपि ॥ १८४ नमस्ते नतनाकीन्द्रचूलारत्नाचिताङघ्रये । नमस्ते दुर्जयारातिनिर्जयोपाजितश्रिये ॥ १८३ नमोऽस्तु तुभ्यमिद्ध? सपर्यामर्हते पराम् । रहोरजोऽरिघाताच्च प्राप्ततन्नामरूढये ॥ १८६ जितान्तक नमस्तुभ्यं जितमोह नमोऽस्तु ते । जितानङ्ग नमस्ते स्ताद्विरागाय स्वयम्भुवे ॥ १८७ स्वां नमस्यञ्जननम्रनम्येत सुकृती पुमान् । गां जयज्जितजेतव्यस्त्वज्जयोद्घोषणाकृती ॥ १८८
हे भगवन्ता, जेव्हा आपले मोक्षकल्याण होईल तेव्हा देखील अग्निकुमारेन्द्राकडून ज्वालायुक्त मुकुटाच्या अग्रभागांनी आपली पूजा केली जाईल म्हणून आपणास माझा नमस्कार आहे ॥ १८३ ॥
___ हे प्रभो, आपण पांचही कल्याणांच्या महापूजेला प्राप्त झालेले आहात. आपण महा तेजस्वी आहात. आपणास उत्कृष्ट असे त्रैलोक्याचे राज्य मिळाले आहे. आपण ज्ञानाने श्रेष्ठ व ज्येष्ठ असलेल्या लोकातही श्रेष्ठ व ज्येष्ठ आहात. अशा आपणास माझा नमस्कार असो ॥१८४ ॥
हे प्रभो, आपले पाय नम्र झालेल्या स्वर्गीय इन्द्रांच्या चूडामणिकडून पूजिले गेले आहेत व ज्यांना जिंकणे अत्यंत कठिण आहे अशा मोहादिक शत्रूना जिंकून आपण अन्तरंगलक्ष्मी-केवलज्ञानरूप लक्ष्मी व बहिरंग समवसरणरूप लक्ष्मी याना प्राप्त करून घेतले आहे. अशा आपणास माझा नमस्कार असो ॥ १८५ ॥
हे प्रभो, अनेक ऋद्धि आपल्या ठिकाणी सर्वोत्कर्षाला प्राप्त झाल्या आहेत व आपण महापूजेला प्राप्त झालेले आहात म्हणून आपणास माझा नमस्कार असो. हे प्रभो, रहस्-अन्तराय कर्म, रजस्-ज्ञानावरण व दर्शनावरण कर्म आणि अरि-मोहनीय कर्म यांचा आपण नाश केला असल्यामुळे आपण 'अर्हत्' अशा रुढनामाला प्राप्त झालेले आहात म्हणून आपणास माझा नमस्कार असो ॥ १८६ ।।
__ हे जितान्तक, हे मरणाला जिंकणाऱ्या जिना आपणास नमस्कार असो, मोहाला जिंकलेल्या आपणास नमस्कार असो, आपण मोहाला जिंकले आहे म्हणून आपणास नमस्कार असो. मदनाला जिंकणाऱ्या आपणास नमस्कार असो व आपण विराग-रागद्वेषरहित आहात म्हणून आपणास नमस्कार असो व स्वयम्भू-परोपदेशाशिवाय आपण स्वहिताकडे प्रवृत्त झालेले आहात म्हणून आपणास नमस्कार असो ॥ १८७ ॥
हे जिनदेवा, जो पुण्यवान् पुरुष आपणास नमस्कार करतो त्याला नम्र लोक नमस्कार करतील. हे प्रभो, आपल्या विजयाची जो मानव घोषणा करितो तो पुण्यवान् जिंकण्यास योग्य अशा कर्माना ज्याने जिंकले आहे असा तो पृथ्वीला जिंकतो व वाणी त्याला वश होते ॥ १८८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org