Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१९६)
महापुराण
(२५१
त्वन्नुतेः पूतवागस्मि त्वत्स्मतेः पूतमानसः । त्वन्नतेः पूतदेहोऽस्मि धन्योऽस्म्यद्य त्वदीक्षणात् ॥ १८९ अहमद्य कृतार्थोऽस्मि जन्माद्य सफलं मम । सुनिर्वते दृशौ मेऽन्ध सुप्रसन्नं मनोऽद्य मे ॥ १९० स्वत्तीर्थसरसि स्वच्छे पुण्यतोयसुसम्भृते । सुस्नातोऽहं चिरादद्य पूतोऽस्मि सुखनिर्वृतः॥ १९१ त्वत्पादनखभाजालसलिलैरस्तकल्मषैः । अधिमस्तकमालग्नरभिषिक्त इवास्म्यहम् ॥ १९२ एकतः सर्वभौमश्रीरियमप्रतिशासना । एकतश्च भवत्पादसेवा लोकैकपावनी ॥ १९३ यदिग्भ्रान्तिविमूढेन महदेनो मयाजितम् । तत्त्वसन्दर्शनाल्लीनं तमो नेशं रवेर्यथा ॥ १९४ स्वत्पदस्मृतिमात्रेण पुमानेति पवित्रताम् । किमुत तत्वद्गुणस्तुत्या भक्त्यवं सुप्रयुक्तया ।। १९५ भगवंस्त्वद्गुणस्तोत्राद्यन्मया पुण्यमजितम् । तेनास्तु त्वत्पदाम्भोजे परा भक्तिः सदापि मे ॥१९६
हे जिनदेवा, तुझी स्तुति केल्यामुळे माझी वाणी पवित्र झाली आहे, तुझे स्मरण केल्यामुळे मी पवित्र मनाचा बनलो आहे आणि तुझ्या चरणाला नमस्कार केल्यामुळे माझा देह पवित्र झाला आहे, तुझ्या दर्शनापासून आज मी धन्य झालो आहे ।। १८९ ।।
आज मी कृतार्थ झालो. करण्यायोग्य कार्य मी आज केले आहे. आज माझा जन्म सफल झाला. माझे डोळे संतुष्ट झाले व आज माझे मन प्रसन्न झाले आहे ॥ १९० ॥
पुण्यरूपी पाण्याने जे खूप भरले आहे, अशा आपल्या स्वच्छ तीर्थसरोवरात मी आज पुष्कळ दिवसानी उत्तम स्नान केले आहे. आज मी पवित्र झालो आहे व अत्यन्त सुखी झालो आहे ॥ १९१ ॥
हे प्रभो, तुझ्या पायांच्या नखांच्या कान्तिरूप जलाने सर्व पाप नष्ट होते. त्या कान्तिरूप जलानी हे प्रभो माझे मस्तक धुतले गेले म्हणून मी आज जणु स्नान केले आहे असे मला वाटते ॥ १९२ ॥
हे प्रभो, जिच्यावर कोणाची सत्ता चालत नाही अशी सार्वभौमलक्ष्मी माझ्या एका बाजूला आहे व एका बाजूला एकटीच मुख्य रीतीने लोकाना पवित्र करणारी आपल्या चरणांची सेवा आहे म्हणून मी धन्य झालो आहे ।। १९३ ॥
हे प्रभो, मी दिग्विजयासाठी भ्रमण करीत असता जे महापातक मी उपाजिले आहे ते सूर्यापासून जसा रात्रीचा अंधार नष्ट होतो तसे हे प्रभो तुझ्या दर्शनाने नष्ट झाले आहे ।। १९४ ।।
हे प्रभो, तुझ्या पायांच्या केवळ स्मरणाने मानव पवित्र होतो. मग मनात भक्ति ठेवून तुझ्या गुणांची स्तुति उत्तम प्रकारे केली असता तो पवित्र होणार नाही काय ? अवश्य पवित्र होईल ।। १९५ ॥
- हे भगवंता, तुझ्या गुणांच्या स्तुतीपासून जे पुण्य मी मिळविले आहे, त्या पुण्याचे. फळ मी हे इच्छितो की तुझ्या चरणकमलातच नेहमी माझी उत्कृष्ट भक्ति राहो ॥ १९६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org