Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१८२)
महापुराण
जय निजितसंसारपारावार गुणाकर । जय निःशेषनिःपीतविद्यारत्नाकर प्रभो ॥ १७६ नमस्ते परमानन्तसुखरूपाय तायिने । नमस्ते परमानन्दमयाय परमात्मने ॥ १७७ ममस्ते भवनोद्भासिज्ञानभाभारभासिने । नमस्ते नयनानन्दिपरमौदारिकत्विषे ॥ १७८ नमस्ते मस्तकन्यस्तस्वहस्ताञ्जलिकुड्मलैः । स्तुताय त्रिदशाधीशः स्वर्गावतरणोत्सवे ॥ १७९ नमस्ते प्रचलन्मौलिघटिताञ्जलिबन्धनः । नुताय मेरुशैलाग्रस्नाताय सुरसत्तमः ॥ १८० नमस्ते मुकुटोपानलग्नहस्तपुटोद्भवः । लोकान्तिकरषीष्ठाय परिनिष्क्रमणोत्सवे ॥ १८१ नमस्ते स्वकिरीटाग्ररत्नग्रावान्तचुम्बिभिः । कराब्जमुकुलैः प्राप्तकेवलेज्याय नाकिनाम् ॥ १८२
हे प्रभो, आपण जन्म-जरा-मरणात्मक संसारसमुद्राला जिंकिले आहे व सर्वगुणांचा साठा आपण आहात. हे प्रभो, आपण संपूर्ण ज्ञानरूपी समुद्राला पिऊन टाकले आहे. अर्थात् आपण अनन्तज्ञानी आहात, आपला नेहमी जयजयकार असो ।। १७६ ।।
हे जिनदेवा, आपण लोकोत्तर उत्कृष्ट अनन्त सुख हेच स्वरूप धारण करीत आहात व आपण जगाचे पालन पोषण करणारे आहात. आपण परमानन्दानी पूर्ण भरलेले असे परमात्मा आहात. आपणास आमचे वंदन आहे ॥ १७७ ॥
हे जिनराज, सगळ्या जगाला साक्षात् जाणणारे व पाहणारे अशा ज्ञानाच्या कान्ति समूहाने प्रकाशणारे आहात व नेत्राना आनंदित करणारी परमौदारिकदेहाची कांति धारण करीत आहात, म्हणून आपणास आम्ही वारंवार नमस्कार करतो ॥ १७८ ॥
हे जिनेश्वरा, आपण जेव्हां सर्वार्थसिद्धि विमानातून जिनमातेच्या गर्भी आला त्यावेळी अर्थात् गर्भकल्याणाच्या वेळी स्वतःच्या मस्तकावर ज्यांनी आपल्या हातांची ओंजळ कमलकळीप्रमाणे ठेवली आहे अशा देवेन्द्रांनी आपली स्तुति केली होती अशा आपणास मी नमस्कार करतो ॥ १७९ ॥
ज्यांनी हलणान्या स्वमस्तकावर दोन हात जोडून ठेविले आहेत अशा देवश्रेष्ठ इन्द्रानी आपणास मेरुपर्वतावर स्नान घालून आपली स्तुति केली आहे अशा आपणास मी नमस्कार करतो ।। १८० ॥
किरीटाच्या अग्रभागावर ज्यांनी आपले दोन हात जोडून ठेवले आहेत व जे मोठे उत्साहयुक्त दिसतात अशा लौकान्तिकदेवानी आपल्या दीक्षामहोत्सवाच्या प्रसंगी आपला आदर केला म्हणून आपणास मी नमस्कार करितो ॥ १८१ ।।
आपल्या किरीटाच्या अग्रभागी बसविलेल्या रत्नांचे चुम्बन करणाऱ्या देवाच्या हातरूपी कमलांच्या कळ्यांनी ज्यांच्या केवलज्ञानाची पूजा केली अशा हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो॥ १८२ ॥ म. ३२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org