Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१६८).
महापुराण
(२४७
धूलीसालपरिक्षेपो मानस्तंभाः सरांसि च । खातिका सलिलैः पूर्णा वल्लीवनपरिच्छदः ॥ १६० सालत्रितयमुत्तुङ्गचतुर्गोपुरमण्डितम् । मङ्गलद्रव्यसन्दोहो निधयस्तोरणानि च ॥ १६१ नाटयशालाद्वयं दो लसद्भपघटीद्वयम् । वनराजिपरिक्षेपश्चैत्यद्रुमपरिष्कृतः ॥ १६२ वनवेदीद्वयं प्रोच्चलजमालाततावनिम् । कल्पद्रुमवनाभोगः स्तूपहावलीत्यपि ॥ १६३ सदोऽवनिरियं देव नसुरासुरपावनी । त्रिजगत्सारसन्दोह इवैकत्र निवेशितः ॥ १६४ बहिविभूतिरित्युच्चराविष्कृतमहोदयाः । लक्ष्मीमाध्यात्मिकी व्यक्तं व्यनक्ति जिन तावकीम् ॥ सभापरिच्छदः सोऽयं सुरैस्तव विनिर्मितः । वैराग्यातिशयं नाथ, नोपहन्त्यप्रकितः ॥ १६६ इत्यत्यद्भुतमाहात्म्यस्त्रिजगद्वल्लभो भवान् । स्तुत्योपतिष्ठमानं मां पुनीतात्पूतशासनः॥१६७ अलं स्तुतिप्रपञ्चेन तवाचिन्त्यतमा गुणाः । जयेशान नमस्तुभ्यमिति सडक्षेपतः स्तुवे ॥१६८
हे प्रभो हा धूलिसाल सर्व बाजूनी घेरून राहिला आहे व मानस्तम्भ, सरोवरे, पाण्यानी भरलेला खंदक, वल्लीवनाचा समूह, उंच चार गोपुरानी शोभित असे तीन तट, छत्रादि अष्टमंगलद्रव्यांचा समूह, नऊ निधि, तोरण समूह ।। १६०-१६१ ॥
प्रकाशयुक्त दोन नाट्यशाळा व शोभणारे दोन धूपघट, चैत्यवृक्षाने शोभणारा असा वनपंक्तींचा सभोवती घेर ।। १६२ ॥
दोन वनवेदिका व अतिशय उंच अशा ध्वजसमूहानी व्याप्तपृथ्वी, कल्पवृक्षांच्या वनाचा विस्तार, अनेक स्तूप व अनेक प्रासाद-पंक्ति ।। १६३ ॥
हे जिनदेवा ही आपली समवसरणसभा मनुष्य, देव व असुर यांना पवित्र करणारी आहे. या आपल्या सभेत त्रैलोक्यातील सारयुक्त पदार्थांचा समूह एके ठिकाणी आढळून येत आहे ।। १६४ ॥
हे जिनदेवा, या बाह्य ऐश्वर्याने आपला महान् उत्कर्ष प्रकट केला आहे व ते आपल्या आत्म्याच्या अन्तरंग लक्ष्मीला स्पष्टपणे व्यक्त करीत आहे ॥ १६५ ॥
हे प्रभो, ज्याच्या विषयी कोणाला बिलकुल तर्क करता येत नाही अशी ही देवानी निर्माण केलेली आपली समवसरणाची लक्ष्मी आपल्या वैराग्याच्या माहात्म्याला नष्ट करीत नाही. हे समवसरणाचे वैभव पाहून आपल्या हृदयातील वीतरागता तिळमात्रही कमी होत नाही ॥ १६६ ॥
हे जिननाथा, आपण अत्यन्त अद्भुत माहात्म्याने युक्त आहात. आपण सर्व त्रैलोक्याला अतिशय आवडते आहात. आपले शासन ( उपदेश ) अत्यंत पवित्र आहे. आपली स्तुति करण्यासाठी उद्युक्त झालेल्या मला आपण पवित्र करा ॥ १६७ ॥
हे नाथ, मी आता आपली स्तुति विस्ताराने करीत नाही कारण आपले गुण अत्यंत अचिन्त्य आहेत. हे प्रभो, आपण महासामर्थ्यशाली आहात; आपला जय होवो व आपणास नमस्कार असो एवढीच मी आपली संक्षेपाने स्तुति करतो ।। १६८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org