Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१५०)
महापुराण
(२४५
सुरैरुच्छ्रितमेतत्ते छत्राणां त्रयमूजितम् । त्रिजगत्प्राभवे चिह्नं न प्रतीमः कथं वयम् ॥ १४२ चामराणि तवामूनि वीज्यमानानि चामरैः । शंसन्त्यनन्यसामान्यमश्वयं भुवनातिगम् ॥ १४३ परितस्त्वत्सभां देव वर्षन्त्येते सुराम्बुदाः । सुमनोवर्षमुद्गन्धि व्याहूतमधुपव्रजम् ॥ १४४ सुरदुन्दुभयो मन्द्रं नदन्त्येते नभोऽङ्गणे । सुरकिङ्करहस्ताग्रताडितास्त्वज्जयोत्सवे ॥ १४५ सुरैरासेवितोपान्तो जनताशोकतापनुत् । प्रायस्त्वामयमन्वेति तवाशोकमहीरुहः ॥ १४६ स्वदेहदीप्तयो दीप्राः प्रसरन्त्यभितः सभाम् । धृतबालातपच्छायास्तन्वाना नयनोत्सवम् ॥ १४७ दिव्यभाषा तवाशेषभाषाभेदानुकारिणी। निरस्यति मनोध्वान्तमवाचामपि देहिनाम् ॥ १४८ प्रातिहार्यमयी भतिरियमष्टतयी प्रभो। महिमानं तवाचष्टे विस्पष्टं विष्टपातिगम् ॥ १४९ त्रिमेखलस्य पीठस्य मेरोरिव गरीयसः । चूलिकेव विभात्युच्चैः सेव्या गन्धकुटी तव ॥ १५०
ही उत्कृष्ट तीन छत्रे आपल्यावर देवांनी उंच अशी धारण केली आहेत व आपले त्रैलोक्यावर स्वामित्व आहे याचे चिह्न आहे हे आम्ही कसे बरे जाणणार नाही ? ।। १४२ ॥
देवाकडून आपल्यावर वारली जाणारी जी चामरे आहेत ती आपले ऐश्वर्य इतरांना प्राप्त होणाऱ्या सामान्य ऐश्वर्यासारखे नाही अर्थात् हे असामान्य आहे व त्रैलोक्यात कोठेही आढळून येणार नाही ॥ १४३ ॥
हे जिनदेवा, हे देवरूपी मेघ आपल्या सभेच्या सभोवती जिने भुंग्यांच्या समूहाला बोलाविले आहे व जिचा सुगंध आकाशात पसरला आहे अशी पुष्पवृष्टि करीत आहेत ॥ १४४ ॥
हे प्रभो, आपण ज्ञानावरणादि कर्मांचा नाश करून विजय मिळविलेला असल्यामुळे त्या उत्सवप्रसंगी आकाशाङगणात देवांच्या सेवकानी आपल्या हातांच्या अग्रभागानी ताडलेले हे देवनगारे गंभीरस्वराने वाजत आहेत ।। १४५ ।।।
हे प्रभो हा तुझा अशोकवृक्ष देवाकडून सेविला जात आहे व हा लोकांचा शोक व ताप नाहीसा करणारा असल्यामुळे बहुतांशी तुझे अनुकरण करीत आहे ।। १४६ ॥
हे जिनप्रभो, ज्यांनी प्रातःकालच्या कोवळ्या उन्हाची कान्ति धारण केली आहे व ज्या लोकांच्या नेत्राना आनंदित करतात अशा तुझ्या देहाच्या उज्वल कान्ती सर्व सभेत पसरल्या आहेत ॥ १४७ ॥
हे जिनप्रभो, तुझी दिव्य भाषा सर्वभाषांच्या भेदांचे अनुकरण करीत आहे व ज्याना बोलता येत नाही अशा प्राण्यांच्या (पशु पक्षी इत्यादिकांच्या ) मनातील अंधार-अज्ञान दूर करीत आहे ।। १४८ ।।
__ हे जिननाथ, हे आठ प्रतिहार्यरूप ऐश्वर्य तुझा महिमा त्रिलोकाला मागे टाकणारा आहे असे स्पष्ट सांगत आहे ॥ १४९ ॥
हे प्रभो, आपले तीन कट्टयानी सहित जसे सिंहासन मेरुप्रमाणे विशाल आहे व त्यावर आपली गन्धकुटी ही उंच शिखराप्रमाणे शोभत असून भव्यजनांनी सेव्य आहे आदरणीय आहे ॥ १५० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org