________________
२४८)
महापुराण
(३३-१६९
जयेश जय निर्दग्धकर्मेन्धन जयाजर । जय लोकगुरो सार्व जयताज्जय जित्वर ॥१६९ जय लक्ष्मीपते जिष्णो जयानन्तगुणोज्ज्वल । जय विश्वजगद्वन्धो जय विश्वजगद्धित ॥ १७० जयाखिलजगद्वेदिन जयाखिलसुखोदय । जयाखिल जगज्ज्येष्ठ जयाखिल जगद्गुरो ॥ १७१ जय निजितमोहारे जय निजितमन्मथ । जय जन्मजरातङ्कविजयिन्विजितान्तक ॥ १७२ जय निर्मद निर्माय जय निर्मोह निर्मम । जय निर्मल निर्द्वन्द्व जय निष्कल पुष्कल ॥ १७३ जय प्रबुद्धसन्मार्ग जय दुर्मागरोधन । जय कर्मारिमर्माविद्धर्मचक्र जयोद्धर ॥ १७४ नयाध्वरपते यज्वन् जय पूज्य महोदय । जयोद्धर दयाचिह्न सद्धर्मरथसारथे ॥ १७५
हे ईशा, आपण कर्मरूपी लाकडे जाळून टाकली आहेत. आपण जरादिक दोषानी रहित आहात, आपण लोकगुरु आहात, सार्व-सर्वाचे हितकर्ते आहात व सर्वकर्माना जिंकणारे आहात. आपला नेहमी जयजयकार असो ।। १६९ ॥
हे लक्ष्मीपते, आपण सर्व कामादिक विकार जिंकले आहेत, आपण अनन्त ज्ञानादि गुणानी नेहमी उज्ज्वल आहात, आपण सगळ्या जगाचे बन्धु आहात व आपण सर्व जगाचे हित करणारे आहात. यास्तव आपला सर्वदा जयजयकार असो ॥ १७० ॥
सर्व जगाला जाणणाऱ्या हे जिनदेवा, तुझा जय असो. सर्व सुखांची ज्याच्यापासून उत्पत्ति आहे व जो सर्व सद्गुणांनी जगात सर्वापेक्षा ज्येष्ठ आहे, मुक्तिमार्गाचा उपदेश करणारा असल्यामुळे जो सर्व जगाचा गुरु आहे अशा हे जिनेश्वरा, तुझा नेहमी जयजयकार असो ।। १७१ ॥
मोहशत्रूला जिंकणान्या हे प्रभो, आपण मदनाला जिंकले आहे, आपण जन्म, वृद्धावस्था, रोग, यांना जिंकले आहे व आपण मृत्यूचा नाश केला आहे म्हणून आपला नेहमी जयजयकार असो ॥ १७२ ॥
हे मदरहित जिनवरा, आपणाला माया-कपट नाही, आपण मोहरहित, ममतारहित, आहात, निर्मल आहात, रागद्वेषादिद्वन्द्वाने रहित आहात, आपण शरीररहित व पुष्कळ-पूर्णज्ञानी आहात, आपला वारंवार जय असो ।। १७३ ।।
आपण आत्महिताचें खरें मर्म जाणले आहे, आपण संसारात फिरविणाऱ्या मार्गाला प्रतिबंध केला आहे, आपण कर्मशत्रूच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यास घायाळ केले आहे व धर्मचक्राच्या प्राप्तीने आपण जय मिळवून महान् झालेले आहात ॥ १७४ ॥
हे जिनदेव, आपण यज्ञाचे स्वामी आहात, कर्मरूपो लाकडे जाळून टाकण्यास आपण भग्नि आहात अर्थात् आपण ज्ञानावरणादिकर्माचा होम केला आहे. सर्व पूज्य लोकाकडून आपण आदरणीय आहात. आपला केवलज्ञानरूपी मोठा उत्कर्ष झाला आहे. आपल्या ठिकाणी असलेली उत्कट दया हे आपणास ओळखण्याचे चिह्न आहे व आपण उत्कृष्ट अहिंसा धर्मरूपी रथाला चालविणारे सारथी आहात, आपला नेहमी जयजयकार असो ॥ १७५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org