________________
२६२)
महापुराण
(३४-७२
जितजेतव्यतां देव घोषयन्नपि कि मुधा । जितोऽसि क्रोधवेगेन प्राग्जय्यो वशिनां हि सः ॥ ७२ बालास्ते बालभावेन विलसन्त्यपणेऽप्यलम् । देवे जितारिषड्वर्गे न तमः स्थातुमर्हति ॥ ७३ कोधान्घतमसे मग्नं यो नात्मानं समुद्धरेत् । स कृत्यसंशयद्वैधान्नोत्तरीतुमलं तराम् ॥ ७४ कि तरां स विजानाति कार्याकार्यमनात्मवित् । यः स्वान्तःप्रभवाजेतुमरीन्न प्रभवेत्प्रभुः ॥ ७५ तद्देव विरमामुष्मात्संरंभादपकारिणः । जितात्मानो जयन्ति क्षमा क्षमया हि जिगीषवः ॥ ७६ विजितेन्द्रियवर्गाणां सुश्रुतश्रुतसम्पदाम् । परलोकजिगीषूणां क्षमा साधनमुत्तमम् ॥ ७७ लेखसाध्ये च कार्येऽस्मिन्विफलोऽतिपरिश्रमः । तृणाङकुरे नखच्छेद्ये कः परश्वधमुद्धरेत् ॥ ७८ ततस्तितिक्षमाणेन साध्यो भ्रातृगणस्त्वया । सोपचारं प्रयुक्तेन वचोहरगणेन सः ॥ ७९ -----------------
हे प्रभो, जे जिंकण्यास योग्य होते त्याना आपण जिंकले अशी घोषणा आपण व्यर्थ करीत आहात. कारण आपण क्रोधाने यावेळी जिंकले गेलेले आहेत. खरे पाहिले असता जितेन्द्रिय लोकानी प्रथम क्रोधाला जिंकले पाहिजे ।। ७२ ।।
हे प्रभो, आपले भाऊ बाल-अज्ञानी आहेत. ते अज्ञानाने दुःखदायक मार्गात यथेच्छ क्रीडा करीत आहेत. परंतु आपण क्रोध, लोभादिक सहा अन्तरंग शत्रूना जिंकले आहे यास्तव आपल्या ठिकाणी हे तम-अज्ञान राहणे योग्य नाही. आपण क्रोधावश होऊ नका ।। ७३ ॥
जो मानव क्रोधरूपी दाट अंधारात बुडलेल्या स्वतःला वर काढू शकत नाही तो कार्याच्या संशयात सापडून द्विधा मनोवृत्तीचा होतो आणि मग तो त्या संशयाच्या मनोवृत्तीतून पार पडत नाही ॥ ७४ ।।
__ जो प्रभु, जो राजा आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामादिक शत्रूना जिंकण्यास समर्थ नाही त्या अविचारी प्रभूला कार्य करण्यास योग्य काय व अकार्य- करण्यास अयोग्य असे काम कोणते याचे स्वरूप समजते काय ? अर्थात् समजत नाही ॥ ७५ ।।
___म्हणन हे प्रभो, या अपकारी क्रोधापासून आपण दूर राहा. आपण शांत व्हा. जे जगाला जिंकण्याची इच्छा करतात ते जितेन्द्रिय पुरुष पृथ्वीला क्षमेने जिंकतात ।। ७६ ॥
ज्यानी स्पर्शनादि पाच इंद्रिये जिकली आहेत व ज्यांच्याजवळ आगमज्ञानाची संपत्ति उत्तम निर्दोष आहे व जे परलोकाला जिंकण्याची इच्छा करतात, त्यांना क्षमा हे उत्तम साधन आहे ॥ ७७ ॥
हे प्रभो, पत्र पाठवून जे कार्य करावयाचे त्याविषयी अधिक परिश्रम करणे व्यर्थ आहे. कारण गवताचा अंकुर नखाने तोडण्यास योग्य असता तो तोडण्यास कोण बरे कु-हाड उचलील ॥ ७८ ॥
म्हणून शांति धारण करून हे प्रभो, आपण आपल्या भावांच्या समुदायाला वश करा. अर्थात् आपला अभिप्राय सांगणाऱ्या दूताबरोबर भेटीचे पदार्थ पाठवून आपण आपल्या भावाना वश करा ॥ ७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org