Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१३६)
महापुराण
(२४३
वक्तृप्रामाण्यतो देव वचःप्रामाण्यमिष्यते । न ह्यशुद्धतराद्वक्तुः प्रभवन्त्युज्ज्वला गिरः ॥ १३४ सप्तभडग्यात्मिकेयं ते भारती विश्वगोचरा । आप्तप्रतीतिममलां त्वय्यद्भावयितुं क्षमा ॥ १३५ स्यावस्त्येव हि नास्त्येव स्यादवक्तव्यमित्यपि । स्यादस्ति नास्त्यवक्तव्यमिति ते सार्वभारती ॥१३६
हे जिनदेवा वक्त्याच्या खरेपणावरून त्याच्या वचनाचा खरेपणा मानला जातो. कारण अत्यन्त अशुद्ध वक्त्यापासून उज्ज्वल अशी वाणी उत्पन्न होणे शक्य नाही ॥ १३४ ॥
हे जिनदेवा, आपल्या मुखातून जी सप्तभङगात्मक वाणी निघते ती सगळ्या विश्वाला विषय करिते-जाणते व ती वाणी आपल्यामध्ये निदोष आप्तता सर्वज्ञता आहे अशी प्रतीति उत्पन्न करण्यास समर्थ आहे ।। १३५ ।।
__ सर्वजीवांचे हित करणा-या हे जिनदेवा, आपली सप्तभंगात्मक वाणी याप्रमाणे आहे. १ जीवादिक पदार्थ कथंचित् आहेतच, व २ कथंचित् नाहीतच ३ कथंचित् क्रमाने दोन्ही प्रकारचेही आहेतच, ४ कथंचित्, अवक्तव्यही आहेतच ५ कथंचित् अस्तित्वरूप असून अवक्तव्य आहेत ६ कथंचित् नास्तित्वरूप होऊन अवक्तव्य आहेत व ७ क्रमाने अस्तित्व नास्तित्वरूप होऊन अवक्तव्य आहेत. यांचे स्पष्टीकरण- जगातील सर्व पदार्थ स्वचतुष्टयाने- स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव यांच्या अपेक्षेने अस्तित्व स्वरूपच आहेत. पण परचतुष्टयांच्या अपेक्षेनेपरद्रव्य, परक्षेत्र, परकाल व परभाव यांच्या अपेक्षेने नास्तिस्वरूपच आहेत. पण एकावेळी दोन धर्म सांगणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक वस्तु अवक्तव्यरूप देखिल आहे. याप्रमाणे प्रत्येक पदार्थात मुख्यत्वाने अस्तित्व, नास्तित्व आणि अवक्तव्य हे तीन धर्म आढळून येतात. या मुख्य धर्माच्या संयोगाने सात सात धर्म होतात. ते याप्रमाणे जसे ‘जीवोऽस्ति' जीव आहे. येथे जीव व त्याची अस्तित्व क्रिया यात विशेषणविशेष्यभावसंबंध आहे. विशेषण विशेष्यातच राहते म्हणून जीवाचे अस्तित्व जीवातच आहे ते अन्यत्र असत नाही. याच प्रकारे जीवो नास्ति' जीव नाही यात देखिल जीव व नास्तित्व यात विशेषण विशेष्यत्वभाव-संबन्ध आहे. म्हणून वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे जीवाचे नास्तित्व जीवातच आहे ते इतर ठिकाणी नाही. जीवाच्या या अस्तित्व व नास्तित्व धर्माला एकदम सांगणे शक्य नाही. म्हणून अवक्तव्य नांवाचा धर्मही यात आहे. या तीन धर्मापैकी जेव्हा जीवाच्या फक्त अस्तित्व धर्माची विवक्षा असते तेव्हां स्यात् अस्त्येव जीवः' असा पहिला भंग उत्पन्न होतो. जेव्हा नास्तित्व धर्माची विवक्षा असते तेव्हां 'नास्त्येव जीव:' हा दुसरा भंग होतो. या दोन धर्माची जेव्हां क्रमाने विवक्षा होते तेव्हा 'स्यादस्ति च नास्त्येव जीवः' हा तिसरा भंग उत्पन्न होतो. पण या दोन धर्मांची जेव्हां युगपत् विवक्षा असते तेव्हां दोन विरुद्ध धर्म एकेवेळी सांगणे शक्य नसल्यामळे स्यादवक्तव्यमेव असा चौथा भंग उत्पन्न होतो. जेव्हा अस्तित्व व अवक्तव्य या दोन धर्माची विवक्षा असते तेव्हां 'स्यादस्ति अवक्तव्य' हा पाचवा भंग उत्पन्न होतो. यानंतर जेव्हां नास्तित्व आणि अवक्त धर्माची विवक्षा असते तेव्हां 'स्यान्नास्ति च अवक्तव्यम्' हा साहवा भंग उत्पन्न होतो आणि जेव्हा अस्तित्व, नास्तित्व व अवक्तव्य या धर्मांची विवक्षा असते तेव्हां सातवा धर्म उत्पन्न होतो. अर्थात् ' स्यात् अस्ति नास्ति च अवक्तव्यं' हा सातवा धर्म होय. संयोगाच्या अपेक्षेने प्रत्येक
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org