Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२४२)
महापुराण
(३३-१२६
कृतपूजाविधिर्भूयः प्रणम्य परमेष्ठिनम् । स्तोतुं स्तुतिभिरत्युच्चरारेभे भरताधिपः ॥ १२६ त्वां स्तोष्ये परमात्मानमपारगुणमच्युतम् । चोदितोऽहं बलाद्धक्त्या शक्त्या मन्दोऽप्यमन्दया ॥१२७ क्व ते गुणा गणेन्द्राणामप्यगम्याः क्व मादृशः । तथापि प्रयते स्तोतुं भक्त्या त्वद्गुणनिघ्नया ॥१२८ फलाय त्वद्गता भक्तिरनल्पाय प्रकल्पते । स्वामिसम्पत्प्रपुष्णाति ननु सम्पत्परम्पराम् ॥ १२९ घातिकर्ममलापायात् प्रादुरासन्गुणास्तव । धनावरणनिर्मुक्तमूर्तेर्भानोर्यथांशवः ।। १३० यथार्थदर्शनज्ञानसुखवीर्यादिलब्धयः । क्षायिक्यस्तव निर्जाता घातिकर्मविनिर्जयात् ॥ १३१ केवलाख्यं परं ज्योतिस्तव देव यदोदगात् । तदालोकमलोकं च त्वमबुद्धा विनावधेः ।। १३२ सार्वश्यं तव वक्तीश वचःशुद्धिरशेषगा। न हि वाग्विभवो मन्दधियामस्तीह पुष्कलः ॥ १३३
ज्याने पूजन केले आहे अशा भरतपति भरताने पुनः परमेष्ठि वृषभ जिनेशाला नमन करून अतिशय उच्चस्वराने याप्रमाणे स्तुतीनी स्तुति करण्यास आरंभ केला ॥ १२६ ।।
हे प्रभो, आपण घातिकर्माचा नाश करून अनन्तज्ञानादिगुणांचे धारक व स्वगुणापासून केव्हाही च्युत न होणारे, असे अत्यंत निर्मल परमात्मा बनलेले आहात. स्तुति करण्याची अत्यन्त मन्द माझी शक्ति आहे तरी ही मी फार मोठ्या भक्तीने बलात्काराने प्रेरित झालो आहे. म्हणून आपली स्तुति करीत आहे ।। १२७ ।।
___ हे प्रभो, तुझे गुण गणधारांनाही जाणता येणे शक्य नाही. मंग माझ्यासारखा मनुष्य त्या गुणांचे वर्णन कसे करू शकेल? तरीही माझी भक्ति तुझ्या गुणांच्या अधीन झाली आहे म्हणून तुझी स्तुति करण्याचा मी प्रयत्न करतो ॥ १२८ ॥
हे प्रभो, तुझ्या ठिकाणी भक्ति ठेवून मी तुझी स्तुति केली तर ती विपुल फल मला देण्यास समर्थ होईल. तूं त्रैलोक्याचा स्वामी आहेस. तुझे हे ऐश्वर्य आमच्या अनेक प्रकारच्या संपत्तीला कारण होईल ।। १२९ ।।
जसे मेघांच्या आवरणापासून मुक्त झालेल्या सूर्याचे किरण स्पष्ट प्रकट होतात तसे घातिकर्मरूपी मल नाहीसा झाल्याने हे प्रभो तुझ्या ठिकाणी सर्वगुण पूर्ण प्रकट झाले आहेत ।। १३० ॥
घातिकम-ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय व अन्तराय यांना हे प्रभो आपण जिंकले आहे म्हणून आपणास यथार्थ दर्शन, ज्ञान, सुख, वीर्य वगैरे क्षायिकलब्धि प्राप्त झाल्या आहेत ।। १३१ ॥
___जेव्हां हे प्रभो आपणास केवलज्ञानरूपी ज्योति प्राप्त झाली तेव्हां आपण लोक व अलोकाला मर्यादारहित व युगपत् जाणले. आधी दर्शन झाल्यानंतर ज्ञान होणे हा क्रम आपल्या ठिकाणी नाही ॥ १३२ ॥
हे प्रभो, सर्व जीवादिक विषयाविषयी तुझ्या वचनाची शुद्धि- खरा विषय समजावून देणे हा धर्म तुझ्या सर्वज्ञपणाला प्रकट करीत आहे. कारण मंदबुद्धीच्या लोकात असे वचनाचे वैभव- माहात्म्य असतच नाही ।। १३३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org