Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१२५)
महापुराण
वियदुन्दुभिभिर्मन्द्रघोषैरुद्घोषितोदयम् । सुमनोर्वार्षाभिदिव्यजीमूतैरूर्जितश्रियम् ॥ ११८ स्फुरद्गम्भीरनिर्घोषप्रोणितत्रिजगत्सभम् । प्रावृषेण्यं पयोवाहमिव धर्माम्बुवर्षिणम् ॥ ११९ नानाभाषात्मिकां दिव्यभाषामेकात्मिकामपि । प्रथयन्तमयत्नेन हृद्ध्वान्तं नुदतीं नृणाम् ॥ १२० अमेयवीर्यमाहार्य विरहेऽप्यतिसुन्दरम् । सुवाग्विभवमुत्सर्पत्सौरभं शुभलक्षणम् ॥ १२१ अस्वेदममलच्छायम पक्ष्मस्पन्दबन्धुरम् । सुसंस्थानमभेद्यं च दधानं वपुजतम् ॥ १२२ इत्यप्रत माहात्म्यं दूरादालोकयन् जिनम् । प्रोऽभूत्स महीस्पृष्टजानुरानन्दनिर्भरः ॥ १२३ दूरानतचलन्मौलिरालोलमणिकुण्डलः । स रेजे प्रणमन्भक्त्या जिनं रत्नैरिवार्धयन् ॥ १२४ ततो विधिवदानर्च जलगन्धस्रगक्षतैः । चरुप्रदीपधूपैश्च सफलैःस फलेप्सया ॥ १२५
(२४१
ज्यांचा ध्वनि गंभीर आहे अशा आकाशांतील नगान्यांनी प्रभूचा उत्कर्ष सूचित केला होता व पुष्पवृष्टि करणाऱ्या दिव्यमेघांनीं प्रभूची शोभा वृद्धिंगत झाली होती ।। ११८ ॥
चोहीकडे पसरणारा जो गंभीर दिव्यध्वनि त्याने भगवंतानी त्रैलोक्यसभेला अतिशय आनंदित केले होते व धर्मरूपी जलाची वृष्टि प्रभु करीत होते त्यामुळे ते पावसाळी मेघाप्रमाणे वाटत होते ।। ११९ ।।
जी भव्यमनुष्यांच्या मनांतील अज्ञानान्धकारास दूर करिते, व जी एकस्वरूपाची असूनही दिव्यभाषारूप असल्यामुळे नानाभाषारूपाने परिणमन करिते व अयत्नाने-यत्न न करताही मुखातून बाहेर पडते. अशा भाषेला वृषभ प्रभूंनी धारण केले होते ।। १२० ।।
प्रभु वृषभनाथ अपरमित शक्तिधारक होते व आभूषणांनी रहित असूनही अतिसुंदर होते. उत्तम वाणीरूपी वैभवाने युक्त होते. त्यांचे शरीर ज्यापासून सुगन्ध चोहोकडे पसरत आहे असे होते व अनेक शुभलक्षणानी युक्त होते ।। १२१ ।।
त्यांचे शरीर अस्वेद-घाम रहित होते. त्यांची शरीरकान्ति मलरहित होती. त्यांच्या नेत्रांच्या पापण्या हालत नव्हत्या व नेत्र फार सुंदर होते. ते समचतुरस्र संस्थानाचे धारक होते. शरीर अतिशय बलयुक्त व अभेद्य होते ।। १२२ ॥
प्रभु वृषभनाथाचे माहात्म्य अतर्क्य होते. अशा प्रभूला भरतेशाने दुरून पाहिले व तो अतिशय नम्र झाला. अत्यानन्दित झाला व त्याने आपले दोन गुढघे भूमीवर टेकून प्रभूला नमस्कार केला ॥। १२३ ।।
लांबून नम्र झाल्यामुळे ज्याचा किरीट हालत आहे व ज्याची रत्नखचित कुण्डले हालत आहेत असा तो भरत भवतीने नमस्कार करीत असता श्रीजिनेशाला रत्नांनी जणु अर्ध्य अर्पण करीत आहे असा शोभला ॥ १२४ ॥
Jain Education International
यानंतर मोक्षफल मिळावे या इच्छेने त्या चक्रवर्तीने जल, गंध, पुष्पमाला, अक्षता, नैवेद्य, दीप, धूप, व फळे यांनी यथाविधि पूजा केली ।। १२५ ।।
म. ३१
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org