Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-१०९)
महापुराण
(२३९
वनवेदी ततोऽतीत्य चतुर्गोपुरमण्डनाम् । प्रासादरुद्धामनि स्तूपांश्च प्रभुरक्षत ॥ १०० प्रासादा विविधास्तत्र सुरावासाय कल्पिताः । त्रिचतुष्पञ्चभूम्याद्या नानाछन्दैरलङकृताः ॥१०१ स्तूपाश्च रत्ननिर्माणाः सान्तरा रत्नतोरणः । समन्ताज्जिनबिम्बैस्ते निचिताङ्गाश्चकाशिरे ॥१०२ तान्पश्यन्नर्चयंस्तांश्च तांश्च तांश्च स कोर्तयन् । तां च कक्षां व्यतीयाय विस्मयं परमीयिवान्॥१०३ नभःस्फटिकनिर्माणं प्राकारवलयं ततः । प्रत्यासजिनस्येव लब्धशुद्धि ददर्श सः ॥ १०४ तत्र कल्पोपगैर्देवैर्महादौवारपालकः । सादरं सोऽभ्यनुज्ञातः प्रविवेश सभां विभोः ॥ १०५ समन्ताद्योजनायामविष्कम्भपरिमण्डलम् । श्रीमण्डपं जगद्विश्वमपश्यन्मान्तमात्मनि ॥१०६ तत्रापश्यन्मुनीनिद्धबोधान्देवीश्चकल्पजाः । सायिका नपकान्ताश्च ज्योतिर्वन्योरगामरीः॥ १०७ भावनव्यन्तरज्योतिःकल्पेन्द्रान्पार्थिवान्मृगान् । भगवत्पादसम्प्रेक्षाप्रीतिप्रोत्फुल्ललोचनान् ॥ १०८ गणनातिकमात्पश्यन्परीयाय परन्तपः । त्रिमेखलस्य पीठस्य प्रथमां मेखलां श्रितः ॥ १०९
___ यानंतर चार गोपुरानी शोभणाऱ्या वनवेदीपासून भरतेश्वराने पुढे गमन केले व त्याने पुढे अनेक प्रासादानीं शोभत असलेली भूमि पाहिली आणि अनेक स्तूपही पाहिले ।। १०० ॥
तेथील ते प्रासाद अनेक आकाराचे होते. देवाना राहण्याकरिता त्यांची रचना केली होती. ते प्रासाद तीन, चार, पाच वगैरे मजल्यांचे होते आणि स्वस्तिक, सर्वतोभद्र, नन्द्यावर्त आदिक आकृतीनी शोभत होते ।। १०१॥
ज्यांच्यामध्ये रत्नांची तोरणे आहेत असे रत्ननिर्मित स्तूप आहेत. या स्तूपांच्या सभोवती जिनप्रतिमा आहेत व त्यानी युक्त असे ते स्तूप फार कान्तिसंपन्न आहेत ॥ १०३ ॥
त्यांना भरतप्रभूने पाहिले त्यांची पूजा केली, व त्यांचे त्याने वर्ण केले. या प्रमाणे करून त्याने त्या प्रदेशाचे उल्लंघन केले व तो अतिशय विस्मय पावला ॥ १०४ ।।
जिनेश्वराच्या जवळ निवास केल्यामुळे जणु ज्याला जिनेश्वराच्या सन्निध राहिल्यामुळे निर्मलता प्राप्त झाली आहे असा आकाशस्फटिकांनी ज्याची निर्मिति केली आहे अशा प्राकार वलयाला त्यांनी पाहिले ।। १०५ ।।
___ यानंतर महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या कल्पवासी द्वारपालांनी आदराने ज्याला मान्यता दिली आहे अशा भरतेश्वराने भगवंत आदिजिनाच्या सभेत प्रवेश केला ॥ १०६ ।।।
जिनेशाच्या सभेला श्रीमण्डप म्हणतात. तो श्रीमण्डप सर्व बाजूनी एक योजन लांब व एक योजन रुंद व गोल होता. व आपल्या आंत त्याने सर्व जगाला स्थान दिले होते. असा श्रीमण्डप भरतेश्वराने पाहिला ।। १०७-१०८ ।।
शत्रूना ताप देणान्या भरताने तेथे ज्यांचे ज्ञान वाढले आहे अशा मुनींना, कल्पवासी देवीना, आर्यिकासहित, राजांच्या स्त्रियांना, ज्योतिष्क देवस्त्रिया, व्यंतरदेवी, व नागदेवीभवनवासीदेवांगना, भवनवासी देव, व्यंतरदेव, ज्योतिष्क देव व स्वर्गवासी देव त्यांचे इन्द्र, याच प्रमाणे अनेक राजे व पशु या सर्वांना भरतेश्वराने पाहिले. हे सर्व भगवंताचे चरण पाहून
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org