Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३३-९०)
महापुराण
(२३७
ततोऽन्तः प्रविशन्वीक्ष्य द्वितयं नाटयशालयोः । प्रीति प्राप परां चत्री शक्रस्त्रीनर्तनोचितम् ॥ ८२ स धूमघटयोर्युग्मं तत्र वीथ्युभयान्तयोः । सुगन्धीन्धन सन्दोहोद्गन्धिधूपं व्यलोकयत् ॥ ८३ कक्षान्तरे द्वितीयेऽस्मिन्नसौ वनचतुष्टयम् । निदध्यौ विगलत्पुष्पैः कृतार्घमिव शाखिभिः ॥ ८४ प्रफुल्लवनमाशोकं साप्तपर्णं च चाम्पकम् । आम्रेडितं वनं प्रेक्ष्य सोऽभूदास्म्रेडितोत्सवः ॥ ८५ तत्र चैत्यद्रुमांस्तुङ्गाजिनबिम्बैरधिष्ठितान् । पूजयामास लक्ष्मीवान्पूजितान्नसुरेशिनाम् ॥ ८६ तत्र किन्नरनारीणां गीतैरामन्द्रमूर्च्छनैः । लेभे परां धृतिं चकी गायन्तीनां जिनोत्सवम् ॥ ८७ सुगन्धिपवनामोदनिःश्वासा कुसुमस्मिता । वनश्रीः कोकिलालापैः सञ्जञ्जल्पेव चक्रिणा ॥ ८८ भृङ्गसङ्गीत सम्मूर्च्छत्कोकिलानकनिःस्वनैः । अनङ्गविजयं जिष्णोर्वनानीवोदघोषयन् ॥ ८९ त्रिजगज्जनताजत्र प्रवेशरभसोत्थितम् । तत्राशृणोन्महाघोषमपां घोषमिवोदधेः ॥ ९०
यानंतर त्या भरतेशाने आत प्रवेश करून इन्द्राच्या स्त्रिया नृत्य करण्यास योग्य असलेल्या दोन नाट्यशाला पाहिल्या. त्या पाहून त्याला फार संतोष वाटला ॥ ८२ ॥
तेथे मार्गाच्या दोन्ही बाजूंचे स्थानी चक्रवर्तीने दोन धूपघट पाहिले. सुगंधयुक्त लाकडांच्या समूहानी ज्यांच्यातून सुगंधित धूम वर पसरत आहे असे ते होते ।। ८३ ।।
याच्याच दुसऱ्या विभागात भरतेशाने चार वने पाहिली. ज्यांच्यापासून फुले गळत आहेत अशा वृक्षांच्याद्वारे प्रभु जिनेशाला ती जणु अर्घ्य देत आहेत अशी दिसली ॥ ८४ ॥
जी फुलानी गजबजली आहेत अशी अशोकवन, सप्तपर्णवन, चंपकवन व आम्रफलांनी प्रशंसनीय असे आम्रवन अशी चारवने पाहून भरतचक्रीचा उत्सव आनंद द्विगुणित झाला ॥ ८५ ॥
त्या चार वनात जे मनुष्य व देवांचे अधिपति अशा राजे व इन्द्रानी पूजिले आहेत व जिनबिम्बानी युक्त आहेत अशा चैत्यवृक्षांना लक्ष्मीसंपन्न भरताने पूजिले ।। ८६ ।।
तेथे श्रीजिनाच्या जन्मादिकल्याणांचे गायन थोड्या गंभीर अशा तानानी युक्त असे ज्या गात आहेत अशा किन्नरींच्या गायनानी चक्रवर्तीला फार आनंद झाला ॥ ८७ ॥
जिचा निश्वास सुगंधी वान्याच्या गंधाने युक्त आहे. फुले हेच जिचे हास्य आहे. अशी वनश्री कोकिलांच्या आलापानी जणु चक्रवर्तीशी बोलू लागली ॥ ८८ ॥
भ्रमरींच्या संगीताचे मिश्रण ज्यात झाले आहे अशा कोकिलारूपी नगान्यांच्या शब्दानी दुमदुमलेली ती वने आदिभगवंतानी मदनावर जो विजय मिळविला आहे त्याचे जणु वर्णन चक्रवर्तीच्या पुढे करीत आहेत अशी दिसली ।। ८९ ।।
त्रैलोक्यातील जनांचा सतत होत असलेला जो प्रवेश त्यामुळे उत्पन्न झालेला जो मोठा ध्वनि तो जणु समुद्राची गर्जना आहे असा भासला ।। ९० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org