Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२३८)
( ३३-९१
अनवेदी मथापश्यद्वनरुद्धावनेः परम् । वनराजीविलासिन्याः काञ्चीमिव कनन्मणिम् ॥ ९१ तद्गोपुरावन क्रान्त्वा ध्वजरुद्धार्वान सुराट् । आजुहूषुमिवापश्यन्मरुद्धूतैर्ध्वजांशुकैः ॥ ९२ सावनिः सावनीवोद्यद्ध्वजमालातताम्बरा । सचक्रा सगजा रेजे जिनराजजयोजिता ॥ ९३ haat हरिवस्त्राजबहिणेभ गरुन्मनाम् । स्रगुक्षहंसचक्राणां दशधोक्ता जिनेशिनः ॥ ९४ तानेकशः शतं चाष्टौ ध्वजान्प्रतिदिशं स्थितान् । वरिवस्यन्नगाच्चक्री स तद्रुद्धावनेः परम् ॥ ९५ द्वितीयमार्जुनं सालं स गोपुरचतुष्टयम् । व्यतीत्य परतोऽपश्यन्नाट्यशालादिपूर्ववत् ।। ९६ तत्र पश्यन्सुरस्त्रीणां नृत्यं गीतं निशामयन् । धूपामोदं च सञ्जिघ्रन्सुप्रीताक्षोऽभवद्विभुः ॥ ९७ कक्षान्तरे ततस्तस्मिन् कल्पवृक्षवनावनिम् । स्रग्वस्त्राभरणादीष्टफलदां स निरूपयन् ॥ ९८ सिद्धार्थपादपांस्तत्र सिद्ध बिम्बैरधिष्ठितान् । परीत्य प्रणमन्प्राचदचिताना किनायकैः ।। ९९
महापुराण
वनानी व्यापिलेल्या प्रदेशांच्या पलिकडे वनपंक्तिरूपी स्त्रीचा चमकणाऱ्या मण्यानी युक्त असा जणु कमरपट्टा आहे अशी वनवेदी चक्रवर्तीने पाहिली ।। ९९ ।।
या वनवेदीच्या वेशीचा प्रदेश उल्लंघून सम्राट् भरताने ध्वजानी घेरलेला भूप्रदेश पाहिला. तो वाऱ्याने फडफडविलेल्या ध्वजवस्त्रानी आपणास जणु बोलावित आहे असे भरतेशाला वाटले ।। ९२ ।।
यज्ञाच्या भूमिप्रमाणे जिने उंच ध्वज व मालांनी आकाश व्याप्त केले आहे, अशी ती भूमि जिनराजानी घातिकर्मांचा नाश करून विजय मिळविल्यामुळे धर्मचक्र व गज-हत्ती या चिह्नांनी फार शोभली ।। ९३ ।।
श्रीजिनेन्द्राच्या ध्वजांचे दहा भेद आहेत ते याप्रमाणे सिंह, वस्त्र, कमळ, मोर, हत्ती, गरुड,, माला, बैल, हंस, व चक्र अर्थात् ध्वजावर ही चिह्न असतात ।। ९४ ।।
प्रत्येक दिशेत एकेक प्रकारचे एकशे आठ, एकशे आठ ध्वज होते या ध्वजांचे पूजन करीत करीत चक्रवर्ती ध्वजभूमींच्या प्रदेशाच्या पुढे गेला ।। ९५ ।।
यानंतर त्याने चार गोपुरानीसहित असलेल्या चांदीच्या तटाला उल्लंघिले व त्या तटाच्यापुढे असलेल्या दोन नाट्यशाला वगैरेना पूर्वीप्रमाणेच पाहिले ।। ९६ ।।
तेथे त्याने देवांगनांचे नृत्य पाहिले व गाणे ऐकिले व धूपघटांचा सुगंध हुंगून त्यांची इन्द्रिये प्रसन्न झाली ।। ९७ ।।
पुढे दुसऱ्या विभागात जाऊन भरतप्रभूने कल्पवृक्षवनभूमि पाहिली. ती पुष्पमाला, वस्त्रे अलंकार आदि आवडत्या पदार्थाना देणारी होती ॥ ९८ ॥
तेथे ज्यांची देवाचे नायक अशा इंद्राकडून नेहमी पूजा केली जाते अशा सिद्धबिंबानी अधिष्ठित झालेल्या सिद्धार्थवृक्षाना भरतेश्वराने प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार व पूजिले ।। ९९ ।।
केला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org