Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२४० )
महापुराण
( ३३-११०
तत्रानचं मुदा चत्री धर्मचक्रचतुष्टयम् । यक्षेन्द्रविघृतं मूर्ध्ना ब्रध्नबिम्बानुकारि यत् ॥ ११० द्वितीयमेखलायां च प्राचंदष्टौ महाध्वजान् । चक्रेभोक्षाब्जपञ्चास्य स्रग्वस्त्रगरुडाङ कितान् ॥ १११ मेखलायां तृतीयस्यामथैक्षिष्ट जगद्गुरुम् । वृषभं स कृती यस्यां श्रीमद् गन्धकुटी स्थिता ॥ १२२ तद्गर्भे रत्नसन्दर्भ रुचिरे हरिविष्टरे । मेरुशृङ्ग इवोत्तुङ्गे सुनिविष्टं महातनुम् ॥ ११३ छत्रत्रयकृत च्छामप्यच्छायमघच्छिदम् । स्वतेजोमण्डलाक्रान्तन सुरासुरमण्डलम् ॥ ११४ अशोकशाखिचिह्नेन व्यञ्जयन्तमिवाञ्जसा । स्वपादाश्रयिणां शोकनिरासे शक्तिमात्मनः ॥ ११५ चलत्प्रकीर्णकाकीर्णपर्यन्तं कान्तविग्रहम् । रुक्माद्रिमिव वप्रान्तपतन्निर्शरसडकुलम् ॥ ११६ तेजसां चक्रवालेन स्फुरता परितो वृतम् । परिवेषवृत्तस्यार्कमण्डलस्यानुकारकम् ।। ११७
तद्विषयक प्रीतीने अतिशय प्रफुल्ल नेत्राचे बनले होते. अर्थात् या सर्वांचे डोळे प्रभूला पाहून अतिशय हर्षित झाले होते. असंख्य अशा या सर्वांना पाहून भरतेशाने श्रीमण्डपाला तीन प्रदक्षिणा दिल्या. यानंतर तो तीन मेखला - कट्टयापैकी पहिल्या मेखलेवर उभा राहिला ॥ १०९ ॥
तेथे आनंदाने त्याने चार धर्मचक्राना पूजिले - ही चार चक्रे यक्षेन्द्रांनी आपल्या मस्तकावर धारण केली होती व ही सूर्यबिंबाप्रमाणे तेजस्वी होती ।। ११० ।।
दुसऱ्या मेखलेवर भरतेशाने चक्र, हत्ती, बैल, कमल, सिंह, पुष्पमाला, वस्त्र व गरुड या चिह्नानी युक्त अशा आठ महाध्वजांची पूजा केली ॥ १११ ॥
यानंतर तिसन्या मेखलेवर जी अतिसुंदर गन्धकुटी आहे तिच्यांत जगताचे गुरु अशा वृषभ जिनेश्वराला पुण्यवान् भरताने पाहिले ॥। ११२ ।।
या गन्धकुटीच्या आंत मेरुपर्वताच्या शिखराप्रमाणे उंच व रत्नाच्या रचनेनें सुंदर अशा सिंहासनावर बसलेल्या विशाल शरीरधारी वृषभ जिनाला भरतेशाने पाहिले. हे वृषभनाथ तीन छत्रांनी ज्यांच्यावर सावली केलेली असताही स्वतःच्छायारहित होते अर्थात् पूर्ण तेजस्वी होते, पापविनाशक होते व स्वतःच्या कान्तिमंडलाने त्यांनी सर्व मनुष्य, देव व दानव - भवनत्रिकदेव ( ज्यांना असुर म्हणतात ) यांच्या तेजाला पराभूत केले होते. अशा प्रभूला भरतेशाने पाहिले. हे प्रभु अशोकवृक्षाच्या चिह्नाने स्वतःच्या चरणांचा ज्यांनी आश्रय घेतला आहे त्यांच्या शोकाला दूर करण्याचे सामर्थ्य परमार्थपणाने आपणामध्ये आहे. हे जणु व्यक्त करीत होते ।। ११३ ते ११५ ।।
हलणाऱ्या चवऱ्यानी ज्यांच्या सभोवतीचा भाग व्याप्त झाला आहे, व ज्यांचे शरीर सुंदर आहे, असे वृषभ जिनेश्वर तटावरून पडणाऱ्या निर्झरांनी व्याप्त झालेल्या मेरु पर्वताप्रमाणे जणु भासत होते ॥ ११६ ॥
स्फुरण पावणा-या कान्तिमण्डलाने ( भामण्डलाने ) प्रभु वृषभनाथ सर्व बाजूंनी घेरले गेले होते व त्यामुळे ते ज्याच्या सभोवती गोल तेजाचे मंडल पसरले आहे अशा सूर्यमंडलाचें अनुकरण करीत आहेत असे वाटले ।। ११७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org