________________
३२-२६)
महापुराण
(२०५
परिसिन्धनदीस्रोतः प्राक्पश्चाच्चोभयोः पथोः। बलं प्रायाज्जलं सिन्धोरुपयुज्योपयुज्य तत् ॥१८ पथि वैधे स्थिता तस्मिन्सेनानण्यनियन्त्रिता । सा चमः संशयद्वैधं तदा प्रापद्दिगाश्रयम् ॥ १९ ततः प्रयाणकः कैश्चित्प्रभूतयवसोदकः । गुहार्धसम्मितां भूमि व्यतीयाय पतिविशाम् ॥ २० यत्रोन्मग्नजला सिन्धुनिमग्नजलया समम् । प्रविष्टा तिर्यगुद्देशं तं प्राप बलमीशितुः ॥ २१ तयोरारात्तटे सैन्यं निवेश्य भरतेश्वरः । वैषम्यमुभयो द्योः प्रेक्षाञ्चक्रे सकौतुकम् ॥ २२ एकाधः पातयत्यन्या दाद्युित्प्लावयत्यरम् । मिथो विरुद्धसाङ्गत्ये सङ्गते ते कथञ्चन ॥ २३ नद्योरुत्तरणोपायः को नु स्यादिति तर्कयन् । द्रुतमाह्वापयामास तत्रस्थ स्थपति पतिः ॥ २४ स तन्नदीद्वयं पश्यनुत्पतनिपतज्जलम् । दृष्टयैव तुलयामास जलाञ्जलिमिव क्षणम् ॥ २५ उपर्युच्छ्वासयत्येनां महान्वायुः स्फुरन्नधः। वायुस्तदन्यथावृत्तिरमुष्यां च विजृम्भते ॥ २६
ती सेना सिन्धुनदीच्या प्रवाहाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन मार्गातून जात होती व त्या नदीच्या पाण्याचा वारंवार उपयोग करीत करीत ती चालली होती ॥ १८ ॥
त्या गुहेतील दोन मार्गावर आलेले व सेनापतीने ज्याचे चांगले नियंत्रण केले आहे असे ते सैन्य दिशासंबंधी दोन संशय मनात उत्पन्न झाल्यामुळे गोंधळात पडले. पूर्व कोणती व पश्चिम दिशा कोणती अशा दोन संशयानी युक्त झाले ॥ १९ ॥
यानंतर ज्यात गवत व पाणी पुष्कळ आहे अशा गुहेच्या अर्ध्या भागापर्यंत सर्व मानवांचा पति अशा त्या चक्रवर्तीने अनेक प्रयाण करून ती भूमि ओलांडली ॥ २० ॥
जेथे 'उन्मग्नजला' नदी व निमग्नजला' नदी पूर्व व पश्चिम अशा कुण्डातून निघून सिन्धुनदीला मिळालेल्या आहेत अशा स्थानी ती चक्रवर्तीची सेना पोहोचली ॥ २१ ॥
त्या दोन नद्यांच्या अलिकडच्या तटावर भरतेश्वराने आपल्या सेनेस ठेवले व कौतुकाने त्या दोन नद्यांचा उंच सखलपणा त्याने पाहिला ॥ २२ ॥
- त्यातील एक नदी लाकूड वगैरे वस्तु टाकली तर तिला खाली नेते व दुसरी जलदीने वर उसळून देते. अशा परस्परात विरुद्ध असलेल्या या नद्या येथे कशा तरी एकत्र झाल्या आहेत ॥ २३ ॥
या दोन नद्याना ओलांडून जाण्याचा उपाय काय याचा मनात विचार करणाऱ्या तेथेच असलेल्या भरतेश्वराने शीघ्र स्थपतीला-सुताराला बोलाविले ॥ २४ ॥
ज्यांचे पाणी वर उसळत आहे व खाली जात आहे अशा त्या दोन नद्याना राजा भरताने आपल्या दृष्टीनेच जणु आपल्या ओंजळीत असलेल्या पाण्याप्रमाणे मानले ।।२५।।
खालून स्फुरण पावणारा अर्थात् वर उसळणारा मोठा वायु या नदीला वर उसळीत आहे आणि याच्या उलट क्रिया करणारा वरून खाली घुसणारा वायु या नदीमध्ये वाढत आहे त्यामुळे या दोन नद्यांचे वेगळे वेगळे प्रवर्तन होत आहे ॥ २६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org