Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३३-५८
ज्वलत्यौषधिजातेऽपि निशि नाभ्येति किन्नरः । तमोविशङ्कयास्याद्रेरिन्द्रनीलमयीस्तटीः ॥ ५८ हरिन्मणितटोत्सर्पन्मयूखानत्र भूघरे । तृणाङ्कुरधियोपेत्य मृगा यान्ति विलक्ष्यताम् ॥ ५९ सरोजरागरत्नांशुच्छुरिता वनराजयः । तताः सन्ध्यातपेनेव पुष्णन्तीह परां श्रियम् ॥ ६० सूर्यांशुभिः परामृष्टाः सूर्यकान्ता ज्वलन्त्यमी । प्रायस्तेजस्विसम्पर्कस्तेजः पुष्णाति तादृशम् ॥ ६१ इहेन्दुकरसंस्पर्शात्प्रक्षरन्तोऽप्यनुक्षपम् । चद्रकान्ता न हीयन्ते विचित्रा पुद्गल स्थितिः ।। ६२ सुराणामभिगम्यत्वात्सिहासनपरिग्रहात् । महत्त्वादचलत्वाच्च गिरिरेष जिनायते ॥ ६३ शुद्धस्फटिकसङ्काशनिर्मलोदारविग्रहः । शुद्धात्मेव शिवायास्तु तवायमचलाधिपः ॥ ६४
२३४)
महापुराण
रात्री या पर्वतावर वनस्पतींचा समूह दिव्याप्रमाणे प्रज्वलित होत असताही किन्नरदेव अंधाराच्या शंकेने या पर्वताच्या इन्द्रनीलमण्यांनी युक्त असलेल्या तटावर प्रवेश करीत नाहीत ॥ ५८ ॥
हिरव्या पाचनामक रत्नानी युक्त अशा या पर्वताच्या तटापासून पाचूंचे हिरवे किरण वर पसरत असल्यामुळे हरिणांना हे गवताचे अंकुर आहेत असे वाटून जवळ येतात परंतु नंबर तेथे गवत न मिळाल्याने ते खिन्न होतात ।। ५९ ।।
या पर्वतावरील पद्मरागमण्यांच्या किरणानी व्याप्त झालेल्या येथील वनभूमि जणु सम्ध्याकालच्या लाल प्रकाशांच्या उत्कृष्ट शोभेला त्या पुष्ट करीत आहेत असे वाटते ॥ ६० ॥
सूर्याच्या किरणानी ज्यांना स्पर्श केला आहे असे हे सूर्यकान्तमणि प्रज्वलित होत आहेत. बरोबरच आहे की, तेजस्वी पदार्थाचा सम्पर्क झाला असता बहुत करून तशाच प्रकारची तेजाची पुष्टि तो करीत असतो असे दिसून येते ।। ६१ ।।
येथे चन्द्राच्या किरणांचा स्पर्श झाल्यामुळे चन्द्रकान्तमणि दररोज रात्री झिरपतात पण ते झिरपून देखिल मुळीच कमी होत नाहीत. यावरून पुद् गलद्रव्याची स्थिति फार विचित्र आहे असे म्हणावयास हरकत नाही ।। ६२ ।।
हा पर्वत बिलकुल जिनेश्वराप्रमाणे आहे. जसे जिनेश्वर देवाकडून सेवनीय पूजनीय आहेत, देव प्रभुकडे जसे येतात तसे ह्या पर्वताकडेही येतात, प्रभूनी सिंहासनाचा परिग्रह जसा केला आहे तसा हा पर्वत सिंहांचा व असणा नावाच्या वृक्षांचा आश्रय झाला आहे. जिनेश्वर सर्वज्ञपणामुळे महान् आहेत व हा पर्वत आपल्या विस्ताराने व उंचीने महान् आहे. जिनेश्वर स्वरूपात अनन्त ज्ञानादिस्वरूपात निश्चल आहेत तसे हा पर्वतही स्वस्थानापासून कधी ढळत नाही म्हणून जिनेश्वराप्रमाणे निश्चल भासतो ॥ ६३ ॥
हे राजेन्द्रा, शुद्ध स्फटिकाप्रमाणे निर्मल व फार विशाल आकार धारण करणारा हा सर्वपर्वतांचा राजा शुद्धात्म्याप्रमाणे-कर्मरहित सिद्धपरमात्म्याप्रमाणे हे राजश्रेष्ठा तुला सुख प्राप्ति करून देणारा होवो ॥ ६४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org