________________
३३-५७)
मृगः प्रविष्टवे शन्तंवंशस्तम्बोपगैर्गजैः । सच्यते हरिणाक्रान्तं वनमेतद्भयानकम् ॥ ५० वनप्रवेशिभिनित्यं नित्यं स्थण्डिलशायिभिः । न मुच्यतेऽयमद्रीन्द्रो मृगैर्मुनिगणैरपि ॥ ५१ इति प्रशान्तो रौद्रश्च सर्वथायं धराधरः । सन्निधानाज्जिनेन्द्रस्य शान्त एवाधुना पुनः ॥ ५२ गजैः पश्य मृगेन्द्राणां संवासमिह कानने । नखरक्षत मार्गेषु स्वैरमास्पृशतामिमान् ॥ ५३ चारणाध्युषितानेते गुहोत्सङ्गानशङ किताः । विशन्त्यनुगताः शावैः पाकसत्त्वैः समं मृगाः ॥ ५४ अहो परममाश्चर्यं तिरश्चामपि यद्गणैः । अनुयातं मुनीन्द्राणामज्ञातभयसम्पदाम् ॥ ५५ सोऽयमष्टापदैर्जुष्टो मृगैरन्वर्थनामभिः । पुनरष्टापदख्याति पुरैति त्वदुपक्रमम् ॥ ५६ स्फुरन्मणितटोपान्तं तारकाचक्रमापतत् । न याति व्यक्तिमस्यास्तद्रोचिच्छन्नमण्डलम् ॥ ५७
महापुराण
इकडे लहान लहान तलावात मृग घुसून बसले आहेत व वेळूच्या जाळ्यांचा हत्तीनी आश्रय घेतला आहे म्हणून हे भयानक वन सिंहाने आक्रमिले आहे असे वाटते ।। ५० ।।
( २३३
नेहमी वनात प्रवेश करणारे अर्थात् वनात राहणारे व नेहमी जमिनीवर झोपणारे अशा हरिणाकडून व मुनिसमूहाकडून ही हा महापर्वत केंव्हाही त्यागला गेला नाही ॥ ५१ ॥
याप्रमाणे हा पर्वत नेहमी प्रशान्त व रौद्रही पूर्वी राहिला होता पण आता तो आदि जिनेन्द्राच्या सान्निध्याने फक्त शान्तच झाला आहे. आता त्याचा रौद्रपणा नाहीसाच झाला आहे ।। ५२ ।।
आता येथील वनात हत्तीबरोबर सिंह राहत आहेत हे भरतेश आपण पाहा. या हत्तींच्या ज्या तीक्ष्ण जखमा सिंहानी केल्या होत्या त्याना हे सिंह स्वच्छंदाने - शांतपणाने स्पर्श करीत आहेत ॥ ५३ ॥
जे सिंह व्याघ्रादिक निर्दय दुष्ट प्राणी आहेत त्यांच्या बच्चांना अनुसरून हे हरिण निर्भय होऊन चारणमुनि जेथे राहत आहेत. अशा गुहांच्या मध्यभागी प्रवेश करीत आहेत. हे राजेन्द्रा पाहा ॥ ५४ ॥
ज्याना वनाची भीति वाटत नाही आणि ज्याना संपत्तीची अभिलाषा नाही अशा मुनींच्या पाठीमागे हे पशूंचे समूह जात आहेत. हा मोठ्या आश्चर्याचा विषय आहे ।। ५५ ।।
अष्टापद या सार्थक नावाला धारण करणाऱ्या अष्टापदनामक पशूनी हा पर्वत युक्त असल्यामुळे पूर्वी हा पर्वत अष्टापद या नावाने युक्त झाला आहे व आता तो पर्वत तुझ्या चढण्याने पुनः अष्टापद या नावाला प्राप्त होईल ॥ ५६ ॥
Jain Education International
जेव्हा या पर्वताच्या चमकणाऱ्या रत्नानी युक्त असलेल्या तटाजवळ तारकासमूह येतो तेव्हा या पर्वताच्या मण्यांच्या कान्तीनी तो आच्छादित झाल्यामुळे तो व्यक्त होत नाही. अर्थात् हा मण्यांचा समूहच आहे तारकांचा समूह त्यापासून वेगळा जाणला जात नाही ।। ५७ ।।
म. ३०
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org