Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
त्रयस्त्रिंशत्तमं पर्व |
श्रीमानानमिताशेषनृपविद्याधरामरः । सिद्धदिग्विजयश्चक्री न्यवृतत्स्वां पुरीं प्रति ॥ १ नवास्य निषयः सिद्धा रत्नान्यपि चतुर्दश । सिद्धा विद्याधरैः सार्द्धं षट्खण्डधरणीभुजः ॥ २ जित्वा महीमिमां कृत्स्नां लवणाम्भोधिमेखलाम् । प्रयाणमकरोच्चक्री साकेतनगरं प्रति ॥ ३ प्रकीर्णकचलद्वी चिकल्लसच्छत्रबुदबुदा । निर्ययौ विजयार्द्धाद्रितटाद्गङ्गेव सा चमूः ॥ ४ करिणीनौ भिरश्वीयकल्लोले जनतोमिभिः । दिशो रुन्धन्बलाम्भोषिः प्रससर्प स्फुरद्ध्वनिः ॥ ५ चलतां रथचक्राणां चीत्कारैर्हयहेषितः । बृंहितैश्च गजेन्द्राणां शब्दाद्वैतं तदाभवत् ॥ ६ भेर्यः प्रस्थानशंसिन्यो नेदुरामन्द्रनिःस्वनाः । अकालस्तनिताशङ्कामातन्वानाः शिखण्डिनाम् ॥७ तदाभूदुद्धमश्वीयं हास्तिकेन प्रसर्पता । न्यरोधि पत्तिवृन्दं च प्रयान्त्या रथकयया ॥ ८
ज्याने सर्व राजे, विद्याधर व देव नम्र केले आहेत व ज्याने दिग्विजयाचे कार्य पूर्ण तडीस नेले आहे असा श्रीमान्- लक्ष्मीपति, चक्रीभरत आपल्या नगरीकडे जाण्यास परतला ॥ १ ॥
या भरतराजाला नऊ निधि मिळाले आणि चौदा रत्ने प्राप्त झाली व विद्याधर राजासह षट्खण्डातले सर्व राजेही वश झाले ॥ २ ॥
लवणसमुद्र हा जिचा कमरपट्टा आहे अशा या सगळ्या पृथ्वीला जिंकून चक्रवर्ती भरताने आपल्या साकेत नगराकडे प्रयाण केले || ३ ||
चवऱ्या ह्याच जिच्यात तरंग आहेत व शोभणारी छत्रे हीच जिच्यात बुडबुडे आहेत, अशी ती सेना विजयार्द्धपर्वताच्या तटापासून वहाणाऱ्या गंगानदीप्रमाणे पुढे प्रयाण करू लागली ।। ४ ।।
हत्तिणी ह्याच नावानी युक्त, घोड्याचे समूहरूपी लाटानी उसळणारा आणि पायदळ हेच लहान तरङ्ग ज्यात आहेत असा सैन्यसमुद्र गर्जना करीत व सर्व दिशात व्यापून पुढे प्रयाण करू लागला ॥ ५ ॥
त्यावेळी वेगाने चालणाऱ्या रथाचे चीत्कार शब्द होऊ लागले, घोडे खिंकाळू लागले व मोठे हत्ती गर्जना करू लागले त्यामुळे ते चक्रवर्तीचे सैन्य शब्दाद्वैतमय झाले अर्थात् चोहीकडे शब्दच शब्द ऐकू येऊ लागले ॥ ६ ॥
ज्यांचा गंभीर आवाज आहे असे नगारे पुढे प्रयाण करण्याची सूचना देऊ लागले. त्यामुळे मोरांच्या मनात अकालीच मेघांची गर्जना होत आहे अशी शंका उत्पन्न होऊ लागली ।। ७ ।।
त्यावेळी पुढे जाणान्या हत्तींच्या सैन्याने घोडयाच्या सैन्याला अडविले व रथाचा समूह चालू लागल्याने पायदळाच्या सैन्याला त्याने अडविले त्यामुळे ते थांबले ।। ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org