Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२२८)
महापुराण
(३३-१७
पादातकृतसम्बाधात् पथःपर्यन्तपातिनः । हया गजा वरुथाश्च भेजुस्तिर्यक्प्रचोदिताः ॥९ पर्वतोदनमारूढो गजं विजयपर्वतम् । प्रतस्थे विचलन्मौलिश्चक्री शक्रसमद्युतिः ॥ १० अनुगङ्गातट देशान्विलडध्य स सरिगिरीन् । कैलासशैलसानिध्यं प्राप तच्चक्रिणो बलम् ११ कैलासाचलमभ्यर्णमथालोक्य रथाङ्ग भत् । निवेश्य निकटं सैन्यं प्रययौ जिनर्माचतुम् ॥ १२ प्रयान्तमनुजग्मुस्तं भरतेशं महाद्युतिम् । रोचिष्णुमौलयः क्षमापाः सौधर्मेन्द्रमिवामराः ॥ १३ अचिराच्च तमासाद्य शरदम्बरसच्छविम् । जिनस्येव यशोराशिमभ्यानन्द द्विशाम्पतिः ॥ १४ निपतन्निर्झरारावैराह्वयन्तमिवामरान् । त्रिजगद्गुरुमेत्यारात्सेवध्वमिति सावरम् ॥ १५ मरुदान्दोलितोदग्रशाखाग्रस्तटपादपैः । प्रतोषादिव नृत्यन्तं विकासिकुसुमस्मितैः ॥ १६ तटनिर्झरसम्पाततुिं पाद्यमिवोद्यतम् । वन्दारो व्यवृन्दस्य विष्वगास्कन्दतो जिनम् ॥ १७
पायदळांच्या शिपायांच्या गर्दीने सर्व रस्ते व्यापल्यामुळे हत्ती, घोडे आणि रथ थोडे अन्तरापर्यन्त काही वेळपर्यन्त तिरपे चालून नंतर ते रस्त्यावरून प्रयाण करू लागले ॥ ९ ॥
ज्याचा किरीट थोडासा हालत आहे व ज्याची कान्ति इन्द्राप्रमाणे आहे असा चक्री भरत पर्वताप्रमाणे उंच अशा 'विजयपर्वत' नामक हत्तीवर आरूढ होऊन प्रयाण करू लागला ॥ १० ॥
चक्रवर्तीच्या सैन्याने गंगातटाला अनुसरून असलेल्या अनेक देशाना, अनेक नद्याना व अनेक पर्वताना उल्लंघिले आणि तें कैलास पर्वताच्या जवळ येऊन पोहोचले ॥ ११ ।।
कैलास पर्वताजवळ आपण आलो आहोत हे चक्रवर्तीने पाहिले आणि त्याने त्या पर्वताजवळ आपल्या सैन्याचा तळ दिला व आपण जिनेश्वराचे पूजन करण्यासाठी निघाला ॥ १२ ॥
अतिशय तेजस्वी भरतेश जात असता सौधर्मेन्द्राला देव जसे अनुसरतात तसे ज्यांचे मुकुट चमकत आहेत असे इतर राजे त्याला- भरतेशाला अनुसरले ॥ १३ ॥
शरत्कालाच्या आकाशाप्रमाणे निर्मल कान्तीचा जणु जिनेश्वराचा यशःसमूह अशा कैलासपर्वताजवळ भरतेश्वर लौकरच पोहोचला आणि अतिशय प्रसन्न झाला ॥ १४ ।।
त्रिलोकगुरु भगवान् वृषभजिनाकडे येऊन त्यांची आदराने सेवा करा असे जणु पडणान्या झन्यांच्या शब्दानी तो पर्वत देवाला बोलावित आहे असा भासला ॥ १५ ॥
विकसित झालेली फुले हीच ज्यांचे हास्य आहे व वाऱ्याने ज्यांच्या उंच शाखा हालत आहेत अशा वृक्षानी तो पर्वत जणु आनंदाने नृत्य करीत आहे असे भरतेश्वराला वाटले ॥१६॥
चोहीकडून जिनेश्वराना वंदण्यासाठी येणाऱ्या भव्यजीवाना तटावरून पडणान्या झयांच्या मिषाने जणु तो पर्वत पाय धुण्यासाठी पाणी देत आहे असा भासला ॥ १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org