Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२३०)
महापुराण
(३३-३४
क्वचित्सितोपलोत्सङ्गचारिणीरमराङ्गनाः । बिभ्राणं शरदभ्रान्तर्वतिनीरिव विद्युतः ॥ २६ तमित्यद्भुतया लक्ष्म्या परीतं भूभृतां पतिम् । स्वमिवालङध्यमालोक्य चक्रपाणिरगान्मदम् ॥ २७ गिरेरधस्तले दूराद्वाहनादिपरिच्छदम् । विहाय पादचारेण ययौ किल स धर्मधीः ॥ २८ पद्भ्यामारोहतोऽस्याद्रि नासीत्खेदो मनागपि । हितार्थिनां हि खेदाय नात्मनीनः क्रियाविधिः ॥२९ आररोह स तं शैलं सुरशिल्पिविनिर्मितैः । विविक्तर्मणिसोपानः स्वर्गस्येवाषिरोहणः॥ ३० अधित्यकासु सोऽस्याद्रः प्रस्थाय वनराजिषु । लम्भितोऽतिथिसत्कारमिव शीतैर्वनानिलः ॥ ३१ क्वचिदुत्फुल्लमन्दारवनवीथीविहारिणीः । विविक्तसुमनोभूषाः सोऽपश्यद्वनदेवताः ॥ ३२ क्वचिद्वनान्तसंसुप्तनिजशावानुशायिनीः । मृगीरपश्यदारब्धमदुरोमन्थमन्थराः ॥ ३३ क्वचिन्निकुञ्जसंसुप्तान्बृहतः शयुपोतकान् । पुरीतन्निकरान।रिवापश्यत्स पुञ्जितान् ॥ ३४
कोठे कोठे या पर्वताच्या शुभ्रपाषाणांच्या उंचवट्यावरून देवांगना चालत असता शरत्कालच्या शुभ्र मेघांच्या आंत संचार करणाऱ्या विजाप्रमाणे त्या वाटल्या ॥ २६ ॥
अनेक पर्वतांचा स्वामी असलेला हा कैलासपर्वत माझ्याप्रमाणेच अद्भुत लक्ष्मीने युक्त आहे असे चक्री भरताला वाटले व त्याला पाहून तो आनंदित झाला ।। २७ ।।
• या पर्वताच्या खालच्या तळभागी दूर अंतरावर आपले वाहनादिक परिवार भरतेशाने ठेविले आणि तो धर्मबुद्धीचा राजा पायानीच त्या पर्वतावर चालत गेला ।। २८ ।।
वाहनावाचून दोन पायानी पर्वतावर चढत असता या भरतेश्वराला थोडासा देखिल खेद वाटला नाही. जे हितार्थी लोक असतात त्यांचे धर्माचार आत्मकल्याण करणारे असल्यामुळे त्याना ते खेदाला कारण होत नाहीत ॥ २९ ॥
देवांच्या शिल्पकारानी रचलेल्या ज्या रत्नांच्या पाय-या त्या जणु स्वर्गावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत की काय अशा दिसत होत्या. अशा त्या पवित्र पाय-यानी तो भरतचक्री त्या कैलासपर्वतावर चढला ।। ३० ।।
त्या पर्वताच्या वरील भूमीवर चढ़न तेथे असलेल्या वनपंक्तीमध्ये जेव्हा भरतेश पोहोचला तेव्हा तेथील शीत अशा वनवायूनी त्याचा जणु पाहुणचार केला असे वाटले ॥ ३१॥
त्या भरतेशाने तेथे काही ठिकाणी ज्यांच्या अंगावर वेगळ्या वेगळ्या फुलांचे अलंकार आहेत व ज्या प्रफुल्ल मंदारवनाच्या पंक्तीमध्ये विहार करीत आहेत अशा वनदेवताना पाहिले ॥ ३२ ॥
त्या पर्वतावर कोठे वनाच्या मध्यभागी आपल्या पाडसाबरोबर झोपलेल्या व सावकाश रवंथ करणाऱ्या हरिणींना त्याने पाहिले ।। ३३ ॥
त्या पर्वतावरील काही लतागृहामध्ये अजगरांच्या मोठ्या मोठ्या बच्चांना भरतेशाने पाहिले. जणु ते बच्चे या पर्वताची एके ठिकाणी गोळा झालेली जणु आतडीच आहेत असे भरतप्रभूला वाटले ।। ३४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org