Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२१६)
महापुराण
(३२-११५
अस्यानुसानु रम्येयं वनराजी विराजते । शश्वदध्युषिता सिद्धविद्याधरमहोरगैः ॥ ११५ तटाभोगा विभान्त्यस्य ज्वलन्मणिविचित्रिताः। चित्रिता इव सङक्रान्तः स्वर्वधूप्रतिबिम्बकैः॥११६ पर्यटन्ति तटेष्वस्य सप्रेयस्यो नभश्चराः । स्वरसम्भोगयोग्येषु हारिभिर्लतिकागृहैः ॥ ११७ विविक्तरमणीयेषु सानुष्वस्य धृतोत्सवाः । न ति दधतेऽन्यत्र गीर्वाणाः साप्सरोगणः ॥ ११८
पर्यन्तस्य वनोद्देशा विकासिकुसुमस्मिताः। हसन्तीवामरोद्यानश्रियमात्मीयया श्रिया ॥ ११९ स्वेन मूर्ना बिभत्र्येष श्रियं नित्यानपायिनीमास्मार्ताः स्मरन्ति यां शच्याः सौभाग्यमवर्षिणीम्।।१२०
मूनि पद्मह्रदोऽस्यास्ति धृतश्रीबहुवर्णनः । प्रसन्नवारिरुत्फुल्लहेमपङ्कजमण्डनः ॥ १२१ हृदस्यास्य पुरः प्रत्यक्तोरणद्वारनिर्गते । गङ्गासिन्धू महानद्यौ धत्तेऽयं धरणीधरः ॥ १२२ सरितं रोहितास्यां च दधात्येष शिलोच्चयः । तदुदक्तोरणद्वाराग्निःमृत्योदङमुखीं गताम् ॥१२३
याच्या प्रत्येक शिखरावर सुंदर वनपंक्ति शोभत आहे व तेथे नेहमी सिद्धजातीचे देव, विद्याधर आणि महोरय हे देव नेहमी राहतात ।। ११५ ॥
या पर्वताच्या विस्तृत तटप्रदेश चमकणाऱ्या मण्यानी चित्रविचित्र दिसतात व स्वर्गातील देवांगनांच्या प्रतिबिंबामुळे चित्रे काढल्याप्रमाणे वाटतात ॥ ११६ ॥
या पर्वताच्या तटप्रदेशावर आपल्या स्त्रियासह विद्याधर स्वच्छंदाने विहार करितात. याचे तटप्रदेश सुंदर लतागृहानी युक्त आहेत त्यामुळे ते स्वच्छंदाने क्रीडा करण्यास योग्य आहेत ॥ ११७ ।।
एकान्त रमणीय म्हणजे अत्यंत सुंदर अशा याच्या तटावर देव आपल्या देवांगनाच्या समूहासह आनंदित होऊन क्रीडा करितात. त्याना इतर ठिकाणी क्रीडा करण्यात मौज वाटत नाही ॥ ११८ ॥
या पर्वताच्या कड्यावरील प्रदेश प्रफुल्ल फुलानी युक्त असल्यामुळे आपल्या शोभेने ते देवाच्या उद्यान शोभेला जणु हसत आहेत असे दिसतात ॥ ११९ ।।
इन्द्राणीच्या सौभाग्यसंपत्तीचा गर्व हरण करणारी शोभा हा पर्वत आपल्या शिखरानी धारण करीत आहे व ही शोभा नित्य टिकणारी व कधीही नाश न पावणारी आहे असे विद्वान् लोक या शोभेचे स्मरण करितात-वर्णन करितात ।। १२० ॥
हा पर्वत आपल्या मस्तकावर अत्यंत शोभा धारण करणारा व ज्याचे वर्णन पुष्कळ केले जाते असे पद्मसरोवर धारण करीत आहे. त्याचे पाणी नेहमी स्वच्छच असते व ते पद्म सरोवर प्रफुल्ल सुवर्णकमलरूपी अलंकार धारण करीत आहे ॥ १२१ ॥
या सरोवराच्या पूर्व व पश्चिमेच्या कमानी दरवाज्यातून गंगा व सिन्धु या दोन नद्या निघालेल्या आहेत व त्याना हा पर्वत धारण करीत आहे ॥ १२२ ॥
याच सरोवराच्या उत्तर द्वारापासून निघून उत्तर मुखाने वाहत गेलेली रोहितास्या नावाच्या नदीलाही हा पर्वत धारण करीत आहे ।। १२३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org