Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२-११४)
महापुराण
(२१५
स्थलाम्भोरुहिणीवास्य कीतिः माकं जयश्रिया। हिमाचलनिकुञ्जेषु पप्रथे दिग्जयाजिता॥१०६ हिमाचलस्थलेष्वस्य तिरासीत्प्रपश्यतः । कृतोपहारकृत्येषु स्थलाम्भोजैविकस्वरः ॥१०७ ।। तमुच्चैर्वृत्तिमाक्रान्तदिक्चक्रं विघृतायतिम् । स्वमिवानल्परत्नद्धिहिमाद्रि बह्वमस्त सः॥१०८ अत्रान्तरे गिरीन्द्रेऽस्मिन्व्यापारितदृशं प्रभुम्। विनोदयितुमित्युच्चैः पुरोधा गिरमभ्यधात्॥१०९ हिमवानयमुत्तुङ्गः सङ्गतः सततं श्रिया। कुलक्षोणीभृतां धुर्यो धत्ते युष्मदनुक्रियाम् ॥ ११० अहो महानयं शैलो दुरारोहो दुरुत्तरः । शरसन्धानमात्रेण राद्धो युष्मन्महोदयात् ॥ १११ चित्ररलङकृता रत्नरस्य श्रेणी हिरण्मयी। शतयोजनमात्रोच्चा टङ्कच्छिन्नेव भात्यसौ ॥ ११२ स्वपूर्वापरकोटिभ्यां विगाह्य लवणार्णवम्। स्थितोऽयं गिरिराभाति मानदण्डायितो भुवः॥११३ द्विविस्तृतोऽयमद्रीन्द्रो भरताद्धरतर्षभ । मूले चोपरिभागे च तुल्या विस्तारसम्मितिः ॥ ११४
सर्व दिशा जिंकल्यामुळे मिळविलेली या भरतराजाची कीर्ति जयलक्ष्मीला बरोबर घेऊन स्थलकमलिनीप्रमाणे हिमवान् पर्वताच्या लतागृहामध्ये चोहीकडे पसरली ॥ १०६ ॥
प्रफुल्ल झालेल्या स्थलकमालांचा जणु ज्यानी आपणास नजराणा दिला आहे अशा हिमवान् पर्वताच्या स्थलाना पाहून या भरतराजाला फार आनंद वाटला ॥ १०७ ।।
सर्वापेक्षा उंच असलेला, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत व जो अति विस्तीर्ण आहे व स्वतःप्रमाणे विपुल रत्नसंपत्ति ज्याने धारण केली आहे अशा हिमालयाला भरतेश्वराने फार मानले अर्थात् त्याला तो स्वतःप्रमाणे समजून आनंदित झाला ॥ १०८ ॥
___या प्रसंगी त्या पर्वताकडे ज्याने आपली नजर फेकली आहे अशा भरतराजाचे मन रमविण्याकरिता पुरोहिताने याप्रमाणे भाषण केले ॥ १०९ ।।
___ हा हिमवान् पर्वत अतिशय उंच आहे व नेहमी शोभेने युक्त आहे, संपत्तीने युक्त आहे व सर्व कुलपर्वतात श्रेष्ठ आहे व नेहमी उन्नत व नेहमी लक्ष्मीने शोभित व सर्व राजामध्ये श्रेष्ठ अशा तुझे अनुकरण करीत आहे ॥ ११० ॥
हा महापर्वत चढण्याला कठिण व उतरण्यालाही कठिण आहे. पण आपल्या विलक्षण पुण्योदयाने धनुष्याला बाण जोडण्यानेच हे राजन् हा आपल्या ताब्यात आला याचे आम्हाला आश्चर्य वाटते ॥ १११ ।।।
याची सुवर्णमय पंक्ति नानाविध रत्नानी शोभत आहे व शंभर योजने उंच आहे व टाकीने जणु घडविल्याप्रमाणे वाटत आहे ॥ ११२ ॥
याने आपल्या पूर्व व पश्चिम अशा दोन टोकानी लवणसमुद्रात प्रवेश केला आहे, असा हा पर्वत पृथ्वीला मोजण्यासाठी जणु काठीप्रमाणे भासत आहे ॥ ११३ ॥
हे श्रेष्ठ भरता हा पर्वत भरतक्षेत्रापेक्षा दुप्पट विस्ताराचा आहे व हा मूलभागी, मध्यभागी आणि वरच्या भागातही समान विस्ताराचा आहे ।। ११४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org