________________
३२-९६)
महापुराण
स शरो दूरमुत्पत्य क्वचिदप्यस्खलद्गतिः । सम्प्रापद्धिमवत्कूटं तद्वेश्माकम्पयत्पतन् ॥ ८९ स मागधवदाध्याय ज्ञातचक्रधरागमः। उच्चचाल चलन्मौलिस्तनिवासी सुरोत्तमः ॥९० सम्प्राप्तश्च तमुद्देशं यमध्यास्ते स्म चक्रभृत् । दरोपरुद्धसंरम्भो धनुमिसकृत्स्पृशन् ॥ ९१ तुङ्गोऽयं हिमवानद्रिरलङध्यश्च पृथग्जनः । लङधितोऽद्य त्वया देव त्वद्वत्तमतिमानुषम् ॥ ९२ विप्रकृष्टान्तराः क्वास्मदावासाः क्व भवच्छरः । तथाप्याकम्पितास्तेन पततैकपदे वयम् ॥ ९३ त्वत्प्रतापः शरव्याजादुत्पतन्गगनाङ्गणम् । गणबद्धपदे कर्तुमस्मानाहृतवान्ध्रुवम् ॥ ९४ ।। विजिताब्धिः समाक्रान्तविजयागहोदरः। हिमाद्रिशिखरेष्वद्म जम्भते ते जयोद्यमः ॥ ९५ जयवादोऽनुवादोयं सिद्धदिग्विजयस्य ते । जयतानन्दताज्जिष्णो वद्धिषीष्ट भवानिति ॥ ९६
त्या बाणाची उर्ध्वगति कोठेही अडखळली नाही. अशारीतीने तो बाण दूरवर गेला आणि हिमवान् पर्वताच्या शिखरावरील त्या हिमवान् देवाच्या घराला कंपित करून तेथे पडला ॥ ८९ ॥
त्या हिमाचलवासी देवाने मागध देवाप्रमाणे विचार करून चक्रवर्तीचे आगमन झाले असे ओळखले व ज्याचा किरीट चंचल होत आहे असा तो तेथील निवासी उत्तम देव तेथून निघाला व आपला कोप थोडासा आवरून व धनुष्याच्या दोरीला वारंवार झटके देत चक्रवर्ती जेथे उभा राहिला होता तेथे तो आला ॥ ९०-९१ ॥
व भरतचक्रवर्तीला असे म्हणाला, " हे प्रभो, हा हिमवान् पर्वत उंच आहे व सामान्य माणसाना उल्लंघन करण्यास अशक्य आहे पण आपण आज तो ओलांडला आहे म्हणून आपले चरित्र मनुष्याला उल्लंघणारे अर्थात् लोकोत्तर आहे ॥ ९२ ॥
हे प्रभो, ज्याचे अन्तर फार दूर आहे असे आमचे राहण्याचे प्रदेश कोणीकडे व आपला हा बाण कोणीकडे तथापि आमच्या ठिकाणात अकस्मात् येऊन पडणाऱ्या आपल्या बाणाने आम्हाला एकदम कंपित केले आहे ॥ ९३ ॥
हे प्रभो, आपला पराक्रम बाणाच्या मिषाने आकाशात उंच वर जाऊन त्याने आम्हाला गणबद्ध अमरामध्ये प्रविष्ट करण्यासाठी येथे निश्चयाने आणले आहे असे वाटते ॥९४॥
हे प्रभो, आपल्या जयोद्योगाने प्रथमतः समुद्राला जिंकिले. यानंतर विजयार्द्ध पर्वताच्या गुहेचा आतील सर्व भाग त्याने व्याप्त केला आणि आज या हिमवान् पर्वताच्या शिखरावर तो वृद्धिंगत होत आहे ।। ९५ ॥
हे प्रभो, आपण विजयी व्हा, आपला आनंद वृद्धिंगत होवो, हे जयशालिन् आपण सर्व संपदानी खूप वृद्धिंगत व्हा असे आशीर्वाद आपणास देणे म्हणजे आपण प्राप्त करून घेतलेला जो संपूर्ण दिग्विजय त्याचा आम्ही अनुवाद करणेच होय असे आम्हाला वाटते ॥९६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org