________________
२१२)
महापुराण
(३२-८०
ज्ञात्वा समागतं जिष्णुं देवी स्वावासगोचरम् । उपेयाय समुदत्य रत्नाघं सारच्छदा ॥ ८० पुण्यैः सिन्धुजलैरेनं हेमकुम्भशतोद्धृतः । साभ्यषिञ्चत्स्वहस्तेन भद्रासननिवेशितम् ॥ ८१ कृतमङ्गलनेपथ्यमभ्यनन्दज्जयाशिषा । देव त्वद्दर्शनादद्य पूतास्मीत्यवदच्च तम् ॥ ८२ तत्र भद्रासनं दिव्यं लब्ध्वा तदुपढौकितम् । कृतानुव्रजनां किञ्चिसिन्धुदेवीं व्यसर्जयत् ॥ ८३ हिमाचलमनुप्राप्तस्तत्तटानि जयं जयम् । कश्चित्प्रयाणकः प्रापद्धिमवत्कूटसन्निधिम् ॥ ८४ पुरोहितसरवस्तत्र कृतोपवसनक्रियः। अध्यशेत शुचि शय्यां दिव्यास्त्राण्यधिवासयन् ॥ ८५ विधिरेष न चा शक्तिरिति सम्भावितो नृपः । स सज्यमकरोच्चापं वज्रकाण्डमयत्नतः ॥ ८६ तत्रामोघं शरं दिव्यं समधत्तोर्ध्वगामिनम् । वैशाखस्थानमास्थाय स्वनामाक्षरचिह्नितम् ॥ ८७ मुक्तसिंहप्रणादेन यदा मुक्तः शरोऽमुना । तदा सुरगणैस्तुष्टैर्मुक्तोऽस्य कुसुमाञ्जलिः ॥ ८८
जयशाली भरतराजा आपल्या प्रासादाच्या भूप्रदेशावर आला आहे असे जाणून ती देवता आपल्या परिवारासह अमूल्य रत्नांचा अर्घ्य घेऊन आली ॥ ८० ॥
तिने त्याला भद्रासनावर बसविले आणि सुवर्णाच्या शेकडो कुंभात भरलेल्या सिन्धुनदीच्या पवित्र पाण्यानी तिने त्याला आपल्या हाताने स्नान घातले ॥ ८१ ॥
__ ज्याने मंगलवेष धारण केला आहे अशा भरतप्रभूला तिने जयकारक आशीर्वादानी आनन्दित केले व हे प्रभो, आज तुझ्या दर्शनाने मी पवित्र झाले असे ती त्याला म्हणाली ॥८२॥
सिन्धुदेवीने आपल्या प्रासादात भरतेशाला देण्यासाठी दिव्य भद्रासन आणिले होते ते तिने त्याला दिले व ती त्याला काही मार्गापर्यन्त अनुसरली आणि नंतर त्याने तिचे विसर्जन केले अर्थात् घरी परत जाण्यास परवानगी दिली ॥ ८३ ॥ ।
जेव्हा भरतराजा हिमाचल पर्वताकडे आला तेव्हां त्याच्या तटाचे अनेक प्रदेश त्याने जिंकिले व असे जिंकीत तो काही ठिकाणी मुक्काम करीत करीत हिमवान् पर्वताच्या शिखरावर आला ॥ ८४ ॥
तेथे पुरोहित ज्याचा मित्र आहे अशा भरतेशाने उपवास केला व दिव्यास्त्रांची दीपधूपादिकांनी पूजा करून तो भाग्यशाली आपल्या पवित्र शय्येवर निजला ॥ ८५ ॥
शस्त्रांची पूजा करणे हा परंपरेने चालत आलेला विधि आहे तो असमर्थपणा नाही असे मानून भरतेशाचा राजानी आदर केला. यानंतर वज्रकाण्ड नावाचे धनुष्य भरतप्रभूने अनायासाने सज्ज केले त्याला त्याने दोरी लावली ॥ ८६ ॥
एकवितीचे अन्तर आपल्या दोन पायात ठेवून चक्रवर्ती उभा राहिला. त्याने आपल्या बाणावर आपले नाव लिहिले व तो अमोघ दिव्य बाण अवश्य कार्यसिद्धि करून देणारा व आकाशात वर जाणारा असल्यामुळे तो बाण त्याने आपल्या धनुष्याला जोडला ॥ ८७ ॥
सिंहाप्रमाणे गर्जना करून जेव्हां तो बाण चक्रवर्तीने सोडला त्यावेळी आनंदित झालेल्या देवसमूहानी त्याच्यावर पुष्पांची वृष्टि केली ॥ ८८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org