________________
२१०)
महापुराण
(३२-६३
चक्ररत्नकृतोधोते रुखद्वावशयोजने । तत्राण्डके स्थितं जिष्णोनिराबाधमभूवलम् ॥ ६३ प्रविभक्तचतुरि सेनान्यान्तः सुरक्षितम् । बहिर्जयकुमारेण ररक्षे किल तलम् ॥ ६४ तदा पटकुटीभेदाः किटिकाश्च विशङ्कटाः । कृताः स्थपतिरत्नेन रवाश्चाम्बरगोचराः ॥ ६५ बहिः कलकलं श्रुत्वा किमेतदिति पार्थिवाः । करं व्यापारयामासुः क्रुखाः कोक्षेयकं प्रति ॥६६ ततश्चक्रधरादिष्टा गणबद्धामरास्तदा । नागानुत्सारयामासुरारुष्टा हुकृतः क्षणात् ॥ ६७ बलवान्कुरराजोऽपि मुक्तसिंहप्रजितः । दिव्यास्त्ररजयनागारयं दिव्यमधिष्ठितः ॥ ६८
तदारणाङ्गणे वर्षन्शरधारामनारतमः । स रेज धृतसन्नाहः प्रावृषेण्य इवाम्बुदः ॥ ६९ तन्मुक्ता विशिखा दीप्रा रेजिरे समराजिरे । द्रष्टुं तिरोहितानागान्दीपिका इव बोधिताः ॥७०
ततो निववृते जित्वा नागान्मेघमुखानसो । कुमारो रणसंरम्भात्प्राप्तमेघस्वरश्रुतिः ॥ ७१
.....................................
चक्ररत्नाचा बारा योजनपर्यन्त प्रकाश पसरला असता जयशाली भरतसैन्य त्या अंड्यात बाधारहित असे स्थिर झाले ॥ ६३ ॥
त्या अण्डाकृति अशा तंबूला चार दरवाजे होते व त्यात निवास केलेल्या सैन्याचे संरक्षण सेनापतीकडून केले जात होते व बाहेरून जयकुमार त्याचे रक्षण करीत होता ॥ ६४ ॥
त्यावेळी शिल्पशास्त्रज्ञ अशा स्थपतिरत्नाने अनेक त-हेची वस्त्रांची घरे, तंबू वगैरे आणि किटिका-रुंद मोठी अशी गवताची घरे तयार केली व आकाशात चालणारे रथ तयार केले ॥ ६५ ॥
__ यानंतर बाहेर मोठा गोंगाट होत असलेला ऐकून हे काय आहे असे म्हणून रागावलेल्या राजांनी आपल्या हातात तरवारी धारण केल्या ॥ ६६ ॥
यानंतर चक्रवर्तीने ज्यांना आज्ञा केली असे गणबद्ध नावाचे देव नागदेवावर अतिशय रागावले आणि त्यांनी हुंकारानी तत्काल नागदेवाना पिटाळले, तेथून हाकालून दिले ।। ६७ ॥
सामर्थ्यशाली कुरुराज जयकुमार दिव्य रथावर बसला व मुक्तकंठाने त्याने सिंहाप्रमाणे गर्जना केली व दिव्य अस्त्रानी त्या नागदेवाना जिंकले ॥ ६८ ।।
ज्याने अंगावर चिलखत धारण केले आहे असा जयकुमार सेनापति रणभूमीवर येऊन सतत बाणाची वृष्टि करू लागला तेव्हा तो सतत जलवृष्टि करणान्या पावसाळी मेघाप्रमाणे शोभू लागला ।। ६९ ॥
___ त्या जयसेनापतीने सोडलेले चमकणारे उज्ज्वल बाण रणभूमीत लपून बसलेल्या नागदेवाना हुडकण्यासाठी पाहण्यासाठी जणु दिवट्या पेटविल्या आहेत असे शोभले ।। ७० ॥
___ यानंतर त्याने नागमुख व मेघमुख या देवाना जिंकले. त्यामुळे त्याला 'मेघस्वर' हे पद मिळाले. नंतर तो युद्धापासून परतला ।। ७१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org