________________
३२-६२)
( २०९
तदास्तां समरारम्भः सम्भाव्यो दुर्गसंश्रयः । तदाश्रितैरनायासाज्जेतुं शक्यो रिपुर्महान् ॥ ५४ स्वभावदुर्गमेतन्नः क्षेत्रं केनाभिभूयते । हिमवद्विजयार्द्धाद्रिगङ्गासिन्धुतटावधि ॥ ५५ अन्यच्च देवताः सन्ति सत्यमस्मत्कुलोचिताः । नागमेघमुखा नाम ते निरुन्धन्तु शात्रवान् ॥५६ इति तद्वचनाज्जातजयाशंसौ नरेश्वरौ । देवतानुस्मृति सद्यश्चक्रतुः कृतपूजनौ ॥ ५७ ततस्ते जलदाकारधारिणो घनगर्जिताः । परितो वृष्टिमातेनुः सानिलामनिलाशनाः ।। ५८ तज्जलं जलवोद्गीणं बलमाप्लाव्य जैष्णवम् । अघस्तिर्यगयोध्वं च समन्तादभ्यद्रवत् ॥ ५९ न चेलवनोपमस्यासीच्छिबिरं वृष्टिरोशितुः । बहिरेकार्णवं कृत्स्नमकरोद्वयाप्य रोदसी ॥ ६० छत्ररत्नमुपर्यासीच्चर्मरत्नमधोऽभवत् । ताभ्यामावेष्ट्य तक्रुद्धं बलं स्यूतमिवाभितः ॥ ६१ मध्ये रत्नद्वयस्यास्य स्थितमासप्तमाद्दिनान् । जलप्लवे बलं भर्तुर्व्यक्तमण्डायितं तदा ॥ ६२
महापुराण
म्हणून या युद्धाचा आरंभ करणे बरोबर नाही. पण किल्ल्याचा आश्रय करणे योग्य आहे. किल्ल्यात राहिलेल्या तुम्हाकडून आयासावाचून मोठा शत्रूही जिंकणे शक्य आहे ॥५४॥ हिमवान् पर्वत, विजयार्ध पर्वत व गंगासिंधुतटापर्यन्तचा प्रदेश हे ज्याच्या मर्यादा आहेत असा हा आमचा देश स्वाभाविक किल्ल्यासारखा आहे व तो कोणाकडून जिंकला जाणार आहे बरे ? ॥ ५५ ॥
दुसरे असे पाहा की, आमच्या कुलाकडून पूज्य अशा आमच्या कुलदेवता आहेत. ज्यांची नांवे नागमुख व मेघमुख अशी आहेत. त्या शत्रूंना प्रतिबंध करतील ।। ५६ ।
याप्रमाणे मंत्र्यांच्या भाषणाने ज्यांना आपल्याला जयप्राप्ति होईल अशी अभिलाषा उत्पन्न झाली आहे अशा त्या दोघा राजानी आपल्या देवतांचे स्मरण केले व तत्काल त्यांचे ते दोघे पूजन करू लागले ।। ५७ ।।
यानंतर त्या देवतानी मेघांचा आकार धारण केला व त्या खूप गर्जना करू लागल्या. त्या नागमुख देवता वाऱ्यासह सभोवती जलवृष्टि करू लागल्या ॥ ५८ ॥
मेघानी वर्षिलेल्या त्या पाण्याने जयशाली अशा भरताचे सैन्य बुडले व खाली वर बाजूस आणि सभोवती ते पाणी वाहू लागले. चोहीकडे धावू लागले ।। ५९ ।।
भरतराजाच्या शिबिरात वस्त्र भिजण्याइतकीही वृष्टि झाली नाही पण त्या छावणीच्या बाहेर मात्र पृथ्वी व आकाशाला व्यापून वृष्टि झाली व ती समुद्राप्रमाणे पसरली ॥ ६० ॥
त्या चक्रवर्तीच्या सैन्यावर छत्ररत्न होते व खाली चर्मरत्न पसरले होते. त्या दोन रत्नांनी सर्व बाजूनी वेढलेले ते चक्रिसैन्य सर्व बाजूनी शिवल्याप्रमाणे रोघले गेले होते ॥ ६१॥ त्या जलप्रलयात चर्मरत्न व छत्ररत्न या दोघांच्यामध्ये सात दिवसपर्यन्त राहिलेले ते जयशाली भरताचे सैन्य त्यावेळी स्पष्टरीतीने अण्डाकर झाले होते ।। ६२ ।।
म. २७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org