Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२--४४)
महापुराण
(२०७
व्यजनैरिव शाखा:जयन्वनवीरधाम् । गुहोष्मणा चिरं खिन्नां चमूमाश्वासयन्यरुत् ॥ ३७ तद्वनं पवनाधूतं चलच्छाखाकरोत्करैः । प्रभोरुपागमे तोषाननर्तेव धृतार्तवम् ॥ ३८ पूर्ववत्पश्चिमे खण्ड़े बलागण्या प्रसाधिते । विजेतुं मध्यमं खण्डं साधनैः प्रभुरुद्ययौ ॥ ३९ न करैः पीडितो लोको न भुवः शोषितो रसः । नार्केणेव जनस्तप्तः प्रभुणाभ्यु द्यताप्यदक् ॥४० कोबेरी दिशमास्थाय तपत्येकान्ततः फरः । भानुर्भरतराजस्तु भुवस्तापमपाकरोत् ॥४१ कृतव्यूहानि सैन्यानि संहतानि परस्परम् । नातिभूमि ययुजिष्णोर्न स्वरं परिबभ्रमः ॥ ४२ प्रसाधितानि दुर्गाणि कृतं चाशक्यसाधनम् । परचक्रमवष्टब्धं चक्रिणो जयसाधनैः ॥ ४३ बलवानभियोक्तव्यो रक्षणीयाश्च संश्रिताः । यतितव्यं क्षितित्राणे जिगीषोत्तमीदृशम् ॥ ४४
गुहेच्या उष्णतेने खिन्न झालेल्या सैनिकाना वनलतांचे शाखाग्र हे जणु पंखे त्यानी वारा घालून त्यांना वान्याने आनंदित केले ।। ३७ ।।
वाऱ्याने हलविलेले व ज्याला ऋतूतील फुलानी लकडलेले तें वन भरतप्रभूच्या आगमनामुळे आपल्या हलणान्या शाखारूपी हातांचे अभिनय करून आनंदाने जणु नृत्य करीत आहे असे भासले ॥ ३८ ॥
पूर्वीप्रमाणेच म्हणजे पूर्वखण्डाप्रमाणे पश्चिमखंड देखील सेनापतीने जिंकले असता मध्यम म्लेच्छखण्डाला भरतचक्री आपल्या सैन्याच्याद्वारे जिंकण्यास उद्युक्त झाला ॥ ३९ ॥
__ उत्तरदिशेकडे निघालेल्या अशाही भरतचक्रीने सूर्याप्रमाणे करांनी-किरणानी दुसरा अर्थ राजास द्यावयाच्या करानी लोक त्रस्त केले नाहीत. भूमीचा रस सूर्य शोषून घेतो पण भरतप्रभूने पृथ्वीचा रस-आनन्द शोषला नाही नष्ट केला नाही. सूर्य लोकाना संताप देतो पण भरतेशाने कोणाला संतप्त केले नाही ॥ ४० ॥
सूर्य कौबेरी दिशेला-कुबेराच्या उत्तरदिशेला राहून आपल्या किरणानी अतिशय त्रस्त करितो परंतु भरतराजाने उत्तरदिशेकडे प्रयाण करून पृथ्वीला होणारा ताप शान्त केला ॥ ४१ ॥
__ ज्यात अनेक व्यूह-नाना प्रकारच्या गरुडव्यूहादि रचना केल्या आहेत अशी सैन्ये एकमेकाशी संलग्न होती, फुटून वेगळी झाली नव्हती व भरतराजाकडून ती दूरही गेली नव्हती आणि ती स्वच्छंदाने फिरतही नव्हती ॥ ४२ ॥
चक्रवर्तीच्या जयशाली सैन्यानी सर्व किल्ले हस्तगत केले होते. अजिंक्य असे देश जिंकिले. शत्रूच्या सैन्यास प्रतिबंधही केला ॥ ४३ ॥
बलवान शत्रुबरोबर लढावे, जे आपल्या आश्रयास आले आहेत त्यांचे रक्षण करावे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी यत्न करावा. ही विजेत्याची आचरणपद्धति आहे. विजेता याप्रमाणे वागत असतो ॥ ४४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org