________________
२०८)
महापुराण
(३२-४५
इत्यलयबलश्चक्री चक्ररत्नमनुव्रजन् । कियतीमपि तां भूमिमवाष्टम्भोत्स्वसाधन ॥ ४५ तावच्च परचक्रेण स्वचक्रस्य पराभवम् । चिलातावर्तनामानौ प्रभू शुश्रुवतुः किल ॥ ४६ अभूतपूर्वमेतन्नो परचक्रमुपस्थितम् । व्यसनं प्रतिकर्तव्यमित्यास्तां सङ्गती मिथः ॥ ४७ ततो धनुर्धरप्रायं सहाश्वीयं सहास्तिकम् । इतोऽमुतश्च सजग्मे तत्सैन्यं म्लेच्छराजयोः ॥४८ कृतोच्चविग्रहारम्भौ संरम्भं प्रतिपद्य तौ । विक्रम्य चक्रिणः सैन्यर्भेजतुर्विजिगीषुताम् ॥ ४९ तावच्च सुधियो धीराः कृतकार्याश्च मन्त्रिणः । निषिध्य तो रणारम्भावचः पथ्यमिदं जगुः ॥५० न किञ्चिदप्यनालोच्य विधेयं सिद्धिकाम्यता । अनालोचितकार्याणां दवीयस्योऽर्थसिद्धयः ॥५१ कोऽयं प्रभरवष्टम्भी कुतस्त्यो वा कियबलः । बलवानित्यनालोच्य नाभिषेण्यः कथञ्चन ॥५२ विजयार्षाचलोल्लङ्घी नैष सामान्यमानुषः । विध्यो दिव्यानुभावो वा भवेदेष न संशयः ॥ ५३
ज्याचे सामर्थ्य शत्र नष्ट करू शकत नाहीत असा हा भरतचक्री चक्ररत्नाला अनसरून प्रयाण करू लागला व त्याने आपल्या सैन्याच्याद्वारे बरीचशी किती तरी म्लेच्छभूमि व्यापून टाकली ॥ ४५ ॥ - इतक्यात चिलात व आवर्त या दोन म्लेच्छराजानी आपल्या सैन्याचा पराभव झाला ही वार्ता ऐकिली ।। ४६ ॥
शत्रूचे सैन्य हे आमच्यावर चालून आले असे पूर्वी कधी घडले नव्हते. यास्तव हे आलेले संकट दूर करावे असा विचार करून ते दोघे राजे एकत्र झाले ॥ ४७ ।।
नंतर ज्यात धनुर्धारी योद्धे पुष्कळ आहेत व ज्यात घोड्यांचे व हत्तींचे सैन्यही पुष्कळ आहे असे त्या दोन म्लेच्छ राजांचे सैन्य इकडून तिकडून येऊन एकत्र झाले ॥ ४८ ॥
ज्यानी फारच मोठ्या लढाईचा उद्योग प्रारंभिला आहे असे ते दोन म्लेच्छराजे क्रुद्ध झाले व चक्रवर्तीच्या सैन्याशी पराक्रम करून त्यानी विजयाची इच्छा धारण केली ॥ ४९ ॥
तितक्यात उत्तम बुद्धीचे, विचारी व पूर्वी ज्यांनी राज्यसंबंधी कार्ये केली आहेत अशा प्रधानानी या चिलात व आवर्त राजानी जो युद्धारंभ केला त्याविषयी त्या दोघांचा निषेध केला व त्या दोघाना त्यानी पुढे वर्णिल्याप्रमाणे हितकर भाषण केले ॥ ५० ॥
____आपली कार्यसिद्धि व्हावी अशी इच्छा करणान्याने कोणतेही कृत्य विचार न करता करू नये. कारण ज्यानी कार्याचा विचार केला नाही त्यांच्यापासून फलप्राप्ति फार दूर राहतात" ॥५१॥
हा आमच्या सैन्यास अडथळा करणारा राजा कोण आहे, कोठे राहणारा आहे, त्याचे सैन्य किती आहे, त्याचे सामर्थ्य केवढे आहे याचा विचार जर तुम्ही करीत नाही तर तुम्ही त्याच्यावर तुटून पडणे हे तुमचे कार्य बिलकुल योग्य नाही ॥ ५२ ॥
विजयार्धपर्वताला ज्याने उल्लंघिले आहे तो सामान्य मनुष्य नाही. तो देव असेल किंवा दिव्य सामर्थ्यवान् असेल यात आम्हाला संशय वाटत नाही ॥ ५३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org