Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२-१२९)
महापुराण
(२१७
महापगाभिरित्याभिरलङध्याभिविभात्ययम्। तिसृभिःशक्तिभिः स्वंवा भूभृद्भाव विभावयन्।।१२४ शिखरैरेष कुत्कोलः कीलयन्निव खाङ्गणम् । सिद्धाध्वानं रुणद्धीद्धैः पराद्धर्चेरुद्धदिङमुखैः ॥ १२५ परश्शतमिहाद्रीन्द्रे सन्त्यावासाः सुधाशिनाम् । येऽनल्पां कल्पजां लक्ष्मी हसन्तीव स्वसम्पदा ॥१२६ इत्यनेकगणेऽप्यस्मिन् दोषोऽस्त्यको महान् गिरौ। यत्पर्यन्तगतान्धत्ते गुरुरप्यगुरुदुमान् ॥ १२७ अलाध्यमहिमोदनो गरिमाक्रान्तविष्टपः । जगद्गुरोः पुरोराभामयं धत्ते घराधरः ॥ १२८ इत्यस्याद्रेः परां शोभा शंसत्यच्चैः पुरोधसि । प्रशशंस तमद्रीन्द्र सम्प्रीतो भरताधिपः ॥ १२९
हा पर्वत ज्याचे उल्लंघन कोणी करू शकत नाही अशा तीन महानद्याना धारण करीत असल्यामुळे प्रभुशक्ति-सामर्थ्य धारण करणे, उत्साहशक्ति-खूप धैर्य धारण करणे व मन्त्रशक्ति-सल्लामसलत करण्याची बुद्धि अशा तीन शक्तीना धारण करणाऱ्या राजाप्रमाणे हा पर्वत आपला भूभृद्भाव- राजेपणा व दुसरा अर्थ पर्वतपणा लोकाना दाखवीत आहे असा जणु शोभत आहे ।। १२४ ।।
सर्व दिशाना ज्यानी अडविले आहे अशा अतिशय उत्कृष्ट प्रकाशमान रत्नसमूहानी युक्त अशा आपल्या शिखरानी आकाशाच्या अंगणास खिळून टाकणारा हा पर्वत सिद्धदेवांच्या मार्गाला जणु अडवित आहे ॥ १२५ ।।
या पर्वतराजावर देवांची शेकडो निवासस्थाने आहेत व ती आपल्या सम्पदेने विपुल अशा स्वर्गीय लक्ष्मीला जणु हसत आहेत असे वाटते ।। १२६ ॥
याप्रमाणे हा महापर्वत अनेक गुणानी युक्त असूनही एक मोठा दोष यात आहे तो असा- हा पर्वत गुरु मोठा असूनही आपल्याजवळ अगुरु-लहान-द्रुमान् झाडाना धारण करीत आहे. हा विरोध आहे. विरोधपरिहार असा- हा पर्वत आपल्या चोहोबाजूनी अगुरुनामक चन्दनाची झाडे धारण करतो ।। १२७ ॥
हा पर्वत जगताचे गुरु अशा वृषभजिनेश्वराची शोभा-धारण करीत आहे. त्यांच्याशी सारखेपणा धारण करीत आहे. भगवान् वृषभजिनेश्वर आपल्या अलङध्य माहात्म्याने युक्त आहेत व हा पर्वतही आपल्या अलंध्य मोठेपणामुळे उदग्र-उंच आहे. भगवान् वृषभ जिनेश्वरानी आपल्या गरिमेने- अतिशय पूज्य गुरुपदाने सर्व जगाला व्याप्त केले आहे. या पर्वतानेही आपल्या गरिमेने अतिशय वजनदारपणाने सगळ्या जगाला व्याप्त केले आहे. भगवंताचा गुरुपणा सर्व जगात प्रसिद्ध आहे तसा या पर्वताचा वजनदारपणाही प्रसिद्ध आहे. याने आपल्या विस्ताराने लोकाचा बराच मोठा भाग व्याप्त केला आहे ।। १२८॥
याप्रमाणे पुरोहिताने या पर्वताच्या मोठ्या शोभेचे खूप वर्णन केलेले ऐकून आनंदित झालेल्या भरतेश्वराने त्या हिमवान् पर्वताची खूप प्रशंसा केली ॥ १२९ ॥
म. २८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org