________________
३२-१४७)
महापुराण
(२१९
--------..--
जयलक्ष्मीमुखालोकमङ्गलादर्शविभ्रमाः । तत्तटीभित्तयो जहुर्मनोऽस्य स्फटिकामलाः ॥ १३९ अधिमेखलमस्यासोच्छिलाभित्तिषु चक्रिणः । स्वनामाक्षरविन्यासे धृतिविश्वक्षमाजितः ॥ १४० काकिणीरत्नमादाय यदा लिलिखिषत्ययम् । तदा राजसहस्राणां नामान्यत्रक्षताधिराट् ॥ १४१ असङख्यकल्पकोटीषु येऽतिक्रान्ता धराभुजः । तेषां नामभिराकोणं तं पश्यन्स विसिष्मिये ॥ १४२ ततः किञ्चित्स्खलद्गो विलक्षीभूय चक्रिराट् । अनन्यशासनामेनां न मेने भरतावनिम् ॥ १४३ स्वयं कस्यचिदेकस्य निरस्यन्नामशासनम् । स मेने निखिलं लोकं प्रायःस्वार्थपरायणम् ॥ १४४ अथ तत्र शिलापट्टे स्वहस्ततलनिस्तले । प्रशस्तिमित्युदात्तार्था व्यलिखत्स यशोधनः ॥ १४५ स्वस्तीक्ष्वाकुकुलव्योमतलप्रालेयदीधितिः । चातुरन्तमहीभर्ता भरतः शातमातुरः ॥ १४६ श्रीमानानम्रनिःशेषखचरामरभूचरः । प्राजापत्यो मनुर्मान्यः शूरः शुचिरुदारधीः ॥ १४७
या वृषभाचलाच्या तटभिती स्फटिकाप्रमाणे अतिशय निर्मल होत्या. त्यामुळे जयश्रीला आपले मुख पाहण्यास मंगल दर्पणाप्रमाणे त्या भासत असत. त्या तटभितीनी या भरतराजाचे मन आकर्षिले होते ॥ १३९ ॥
सर्व पृथ्वीला जिंकणाऱ्या या भरतराजाला या पर्वताच्या तटावर असलेल्या शिलारूपी भितीवर आपल्या नांवाची अक्षरे खोदण्याविषयी मोठा आनंद वाटला ।। १४० ॥
जेव्हा काकिणीरत्न घेऊन या चक्रवर्तीला आपली प्रशस्ति लिहिण्याची इच्छा झाली तेव्हा या अधिराजाला या तटावरच्या शिलावर हजारो राजांची नावे दिसली ।। १४१ ॥
असंख्यातकोटिकल्पकालात जे चक्रवर्ती होऊन गेले त्यांच्या नावानी तो सगळा तट कोरला गेला आहे असे भरतराजाला आढळून आले व त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले ।।१४२।।
त्यामुळे त्याचा थोडासा गर्वही गळून गेला. तो भरतचक्री खिन्न झाला व ही भरत पृथ्वी इतरांच्या शासनाखाली नांदत नाही अर्थात् माझेच शासन या सर्व पृथ्वीवर आहे अशी त्याची कल्पना गळून गेली व असंख्य चक्रवर्तीनी हिच्यावर आपले शासन चालविले होते असे त्याला वाटू लागले ।। १४३ ॥
यानंतर स्वतः कोणाच्या तरी नावाचे शासन त्याने पुसून टाकले व तो सर्व लोक प्रायः स्वार्थ परायण असतात असे मानू लागला. त्या तटावर स्वतःची प्रशस्ति लिहिण्यास जागा नसल्यामुळे त्याने दुसऱ्याची प्रशस्ति मोडून टाकली ॥ १४४ ।।
यानंतर कीति हेच धन आहे असे समजणाऱ्या त्या भरतचक्रीने आपल्या हाताच्या तळव्याप्रमाणे स्निग्ध गुळगुळीत असलेल्या त्या शिलापट्टावर गंभीर अर्थाने अभिप्रायाने युक्त अशी प्रशस्ति लिहिलो ।। १४५ ।।
स्वस्ति- जो इक्ष्वाकु कुलरूपी आकाशात चन्द्र आहे व जो चार जिचे शेवट आहेत. अशा पृथ्वीचा पति आहे. शंभर जिला पुत्र झाले अशा मातेचा जो पुत्र आहे अशा त्याचे भरत. असे नांव आहे. तो लक्ष्मीसंपन्न आहे व सर्व विद्याधर, देव आणि सर्व भूमिगोचरी राजे यांना त्याने वश केले आहे, तो प्रजापति श्रीवृषभ जिनेश्वराचा पुत्र आहे, तो सोळावा मान्य मनु आहे, तो शर, पवित्र व उदार बुद्धिधारक आहे ।। १४६-१४७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org