Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२-१८२)
महापुराण
(२२३
प्रतिप्रयाणमानम्रा नपास्तद्देशवासिनः । प्रभुमाराधयाञ्चक्रुराकान्ता जयसाधनैः ॥ १७४ कृत्स्नामिति प्रसाध्यैनामुत्तरां भरतावनिम् । प्रत्यासीददथो जिष्णुविजयार्धाचलस्थलीम् ॥ १७५ तत्रायासितसैन्यश्च सेनान्यं प्रभुरादिशत् । अपावृतगुहाद्वारः प्राच्यखण्डं जयेत्यरम् ॥ १७६ यावदभ्येति सेनानीम्र्लेच्छराजजयोद्यमात् । तावत्प्रभोः किलातीयुर्मासाः षट्सुखसङ्गिनः॥ १७७ दक्षिणोत्तरयोः श्रेण्योर्निवसन्तोऽम्बरेचराः । विद्याधराधिपः सार्धं प्रभुं द्रष्टुमिहाययुः ॥ १७८ । विद्याधरधराधीशैरारादानम्रमौलिभिः । नरवांशुमालिकाव्याजादाज्ञास्य शिरसा धृता ॥ १७९ नमिश्च विनमिश्चैव विद्याधरधराधिपौ । स्वसारधनसामग्या प्रभुं द्रष्टुमुपेयतुः ॥ १८० विद्याधरधरासारधनोपायनसम्पदा । तदुपानीतयानन्यलभ्ययासीद्विभो तिः ॥ १८१ तद्दत्तकृतरत्नौधैः कन्यारत्नपुरःसरैः । सरिदोघेरिवोदवानापूर्यत तदा प्रभुः ॥ १८२
प्रत्येक प्रयाणाच्यावेळी जय मिळवून देणान्या सैन्यानी ज्यांच्यावर हल्ला केल्यामुळे नम्र झालेले त्या त्या देशाचे राजे या भरतराजाची सेवा करू लागले ॥ १७४ ॥
याप्रमाणे संपूर्ण उत्तरेकडची पृथ्वी जिंकून जयशाली भरतचक्री विजया पर्वताच्या जवळच्या प्रदेशात येऊन राहिला ।। १७५ ।।
त्याठिकाणी चक्रवर्तीने आपल्या सेनेला ठेवले व सेनापतीला त्याने अशी आज्ञा केली 'आता तूं गुहेचे द्वार उघडून पूर्वखंडाला लौकर जिंक' ॥ १७६ ।।
तो सेनापति म्लेच्छराजाना जिंकण्याची कामगिरी पूर्ण करून जोपर्यन्त येत आहे तोपर्यन्त सुखात आसक्त झालेल्या भरतराजाचे सहा महिने निघून गेले ॥ १७७ ॥
ज्या ठिकाणी चक्री राहिला होता तेथे दक्षिणश्रेणीमध्ये राहणारे विद्याधर लोक आपआपल्या राजासह प्रभूला पाहण्यासाठी येथे आले ॥ १७८ ॥
ज्यानी दूरूनच आपली मस्तके नम्र केली आहेत अशा विद्याधरराजानी या प्रभूच्या नखकिरणांच्या मिषाने याची आज्ञा आपल्या मस्तकाने धारण केली ॥ १७९ ॥
याठिकाणी विद्याधराचे दोन राजे नमि आणि विनमि आपल्या उत्कृष्ट धनसामग्रीला घेऊन प्रभूला पाहण्यासाठी आले ॥ १८० ॥
इतर राजाकडून केव्हाही प्राप्त न होणारी व विद्याधरांच्या भूमीत जी उत्पन्न झाली अशी साररूप संपत्ति या दोघा राजानी या भरताला नजराणा म्हणून दिली त्यामुळे भरतप्रभूला फार आनंद वाटला ॥ १८१ ॥
___ जसे नद्यांच्या समूहानी समुद्र परिपूर्ण केला जातो तसे कन्यारत्न ज्यात मुख्य आहे अशा अनेक रत्नांचे समूह त्या दोघा राजानी या चक्रवर्तीला अर्पण केले त्यामुळे प्रभु भरत द्रव्यसंपन्न झाला ।। १८२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org