Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३२-७९)
महापुराण
(२११
कुरुराजस्तवा स्फूर्जत्पर्जन्यस्तनितोजितः । गजितनिर्जयन्मेघमुखान्ख्यातस्तदाख्यया ॥ ७२ तोषितैरवदानेन घोषितोऽस्य जयोऽमरैः । दध्वनदुदुन्दुभिध्वानबधिरीकृतदिङमुखः ॥ ७३ ततो दृष्टावदानोऽयं तुष्टुवे चक्रिणा मुहुः। नियोजितश्च सत्कृत्य वीरो वीराग्रणीपदे ॥ ७४ इन्द्रजाल इवामुष्मिन्व्यतिक्रान्तेऽहिविप्लवे । प्रत्यापत्तिमगाद्भूयो बलमाविर्भवज्जयम् ॥ ७५ विध्वस्ते पन्नगानीके विवलौ म्लेच्छनायकौ । चक्रिणश्चरणावेत्य भयभ्रान्तौ प्रणेमतुः॥ ७६ धनं यशोधनं चास्मै कृतागःपरिशोधनम् । दत्वा प्रसीद देवेति तो भूत्यत्वमुपेयतुः ॥ ७७ निःसपत्नां महीमेनां कुर्वनर्वाजनिधीश्वरः । आहिमाद्रितटाद्भूयः प्रयाणमकरोदलैः ॥ ७८ सिन्धुरोधोभुवः अन्दन् प्रयाणे जयसिन्धुरैः । सिन्धुप्रपातमासीदन् सिन्धुदेव्या न्यषेचि सः ॥७९
----------
__त्यावेळी वीज पाडण्याच्या पूर्वी मेघ जशी भयंकर गर्जना करितो त्याप्रमाणे तेजस्वी गर्जना करून नागमुख व मेघमुखनामक देवाना जिंकून जयकुमार मेघेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला ॥ ७२ ॥
___ या जयकुमाराच्या पराक्रमाने देव आनंदित झाले आणि पुनः पुनः वाजवणाऱ्या नगान्यांच्या आवाजानी ज्यानी सर्व दिशांची मुखे बधिर केली आहेत अशा त्या देवानी या जयसेनापतीचा जय सर्वत्र घोषित केला ॥ ७३ ।।
यानंतर जयकुमाराचा पराक्रम चक्रवर्तीच्या दृष्टीस सापडला व त्याने त्याची वारंवार स्तुति केली आणि त्याचा सत्कार करून श्रेष्ठ वीराच्या पदावर-वीराग्रणीच्या पदावर त्याला नियुक्त केले ॥ ७४ ॥
इन्द्रजालाप्रमाणे त्या नागदेवांचा उपद्रव जेव्हां शान्त झाला तेव्हां ज्याला जय प्राप्त झाला आहे असे ते सैन्य पुनः स्वस्थ झाले अर्थात् सुखानुभव घेऊ लागले ।। ७५ ॥
जेव्हा नागांचे सैन्य पळून गेले त्यावेळी ते दोन म्लेच्छराजे बलरहित झाले. भीतीने घाबरे होऊन चक्रवर्तीच्या दोन चरणाकडे ते आले व त्यानी त्यांना नमस्कार केला ।। ७६ ॥
केलेल्या अपराधापासून मुक्तता व्हावी म्हणून त्या दोन राजानी आपले धन आणि यज्ञरूपी धन भरतचक्रीला दिले व हे देवा आमच्यावर प्रसन्न व्हा. असे म्हणून ते भरतेशाचे सेवक झाले ॥ ७७ ॥
___या निधिपति भरताने येथपर्यन्तची पृथ्वी शत्रुरहित केली आणि नंतर आपल्या सैन्यासह त्याने हिमाचलाच्या तटापर्यन्त पुनः प्रयाण केले ।। ७८ ॥
प्रयाण करीत असताना जयशाली अशा हत्तींच्या द्वारे सिन्धुनदीच्या तटभूमीचे चूर्ण करणारा भरतराजा सिंधुनदी जेथून खाली पडत आहे अशा ठिकाणी आला तेव्हा सिन्धुदेवीने त्याला स्नान घातले ॥ ७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org